Haunted places in delhi- दिल्लीतील बहुतांश जागा या फिरण्यासाठी खुप प्रसिद्ध आहेत. पण काही ठिकाणं अशी आहेत तेथे तुम्हाला लोकांची गर्दी अजिबात दिसणार नाहीच.पण सकाळच्या वेळेस ही लोक तेथे येत-जाताना दिसत नाहीत. या ठिकाणांसंबंधित कथा या तेथील स्थानिकांकडून बहुतांश वेळा सांगितल्या जातात. कारण या ठिकाणांना त्यांनी भुताटकी जागा म्हणून घोषित केले असून येथे ६ वाजल्यानंतर कोणालाही जाण्यासाठी परवानगी दिली जात नाही. तर पाहूयात दिल्लीतील काही हॉंन्टेड ठिकाणं.
-दिल्ली कंटोनमेंट
या ठिकाणाला दिल्लीतील सर्वाधिक हॉंन्टेड ठिकाणं म्हटले जाते. काही लोक या ठिकाणाबद्दल असे सांगतात की. त्यांनी येथे एक सफेद रंगाच्या साडीतील महिलेला पाहिले आहे. ती महिला नेहमीच मदत मागत असते. पण तिला मदत न केल्यास ती गाडीचा पाठलाग करते ते सुद्धा गाडीच्या वेगाने.
-लोथियन सेमेट्री
लोथियन सेमेट्री हे ठिकाणं बहुतांश जणांना फिल्मी वाटते. काही लोकांचे असे मानणे आहे की, काही लोकांनी येथे भूत पाहिले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना भुताचे हसणे आणि रडम्याचा आवाज ऐकू येते. येथे एक स्मशान सुद्धा आहे अशात येथे भुतांच्या कथा अधिक सांगितल्या जातात.
-संजय वन
या ठिकाणाला जंगल असे म्हटले जाते ते चुकीचे नाही. कारण या ठिकाणी एका बाजूला हिरवळ आहे. सध्याच्या काळात लोकांना ती जागा आकर्षित करते. पण रात्रीच्या वेळी ती घाबरवून सोडते. कारण लोकांचे असे मानणे आहे की, येथे एक सफेद साडीतील वृद्ध महिला दिसते. अचानक धक्का देणे, जोरात कानशिलात लगावणे, उन्हाळ्याच्या दिवसात धुक दिसणं या सर्व गोष्टी एका सिनेमासारख्या वाटतात. पण हेच सत्यात असे घडतं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाण्याचे धाडस कराल का?
हे देखील वाचा- हत्तीला दिली सर्वांसमोर फाशी, त्याला कोणत्या गुन्ह्याची मिळाली होती शिक्षा?
-चोर मीनार
राजधानी दिल्लीतील सर्वाधिक पार्टी आणि नाइटलाफचा आनंद घेण्यासाठी हौज खास विलेज एक उत्तम जागा आहे. परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की ती दिल्लीतील हॉंन्टेड जागा आहे येथे चोर मीनार अशी एक इमारत आहे त्याबद्दल दीर्घकाळापासून विविध तर्कवितर्क लावले जातात. मीनारच्या वरच्या भिंतीवर होल्स आहेत. त्याबद्दल असे सांगितले जाते की, या होल्समध्ये चोरांची मुंडकी होती. त्यांना अला-उद-दीन खिलजीच्या शासन काळात शिक्षा दिली होती. लोकांना वाटते की, चोरांच्या आत्मा या ठिकाणी रात्रीच्या वेळेस भटकत असतात.(Haunted places in delhi)
-भूली भटियारी का महल
या ठिकाणाचे नाव त्या व्यक्तीच्या नावे ठेवले आहे जो तेथे काम करत होता. त्याचे नाव बू-अली भट्टी असे होते. महालाची बांधणी १४ व्या शतकात तुगलक शासकांकडून शिकारीच्या दरम्यान वापरण्यासाठी केली जात होती. येथे काळोख झाल्यानंतर लोक येथे जाणे टाळतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, येथे रात्रीच्या वेळेस रडण्याचा आवाज येतो. येथे उडाणाऱ्या पक्षांच्या पखांचा आवाज आणि किड्यांचा आवाज अगदी विचित्र वाटतो. सुर्यास्तानंतर या ठिकाणच्या परिसरात लोकांना जाऊ न देण्यासाठी खासकरुन पोलीसांचा येथे पहारा असतो.