जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी मोबाईल ठेवून विसरुन जाण्याची सवय असेल तर ती आताच बदला. कारण तुमच्या फोनमध्ये कितीही सिक्युरिटी असो तरीही तुमची ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. कारण फोनला लॉक असते पण सिम कार्डला नसते. अशातच तुमच्या स्मार्टफोनमधील सिम कार्ड एखाद्याच्या हाती लागल्यास टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि वेरिफिकेशन मेथड ही तुम्हाला कंगाल करु शकते.जेव्हा चोरट्यांच्या हाती तुमचे सिम कार्ड लागते तर अत्यंत सहजपणे ते बँकिंग डिटेल्स ते सोशल मीडियाच्या खात्यापर्यंत अगदी सहज एक्सेस करतात. त्यावेळी ऑथेंटिकेशन किंवा वेरिफिकेशन सुद्धा कामी येत नाही. सिम स्वॅप करण्याच्या दोन पद्धती असू शकतात. पहिला मार्ग असा की, तुमच्या स्मार्टफोन मधील सिम कार्ड काढून त्याची हेराफिरी करणे. दुसरे म्हणजे सिम डिलर सोबत संपर्क करुन तुमची खासगी माहिती चोरणे. (sim swapping)
तुमची लहानशी चुक तुम्हाला धोक्यात आणू शकते
सिम स्वॅपिंग अशा वेळी होते तेव्हा स्कॅमर तुमच्या मोबाईल फोन कंपनीच्या डिलर सोबत संपर्क करतात. त्याचसोबत सिम कार्ड अॅक्टिव्हेट करण्यासाठी फसवतात. एकदा का सिम कार्ड मिळाल्यानंतर फसवणूक ही तुमच्या क्रमांकाने केले जाते आणि तुमचे बँक खाते कंगाल करु शकतात. जसा सिम कार्डचा एक्सेस त्यांच्या हाती येतो तेव्हा स्कॅमर्स तुमच्या सिम कार्डचा पूर्णपणे कंट्रोल घेतात. तुमच्या क्रमांकावर फोन ते मेसेजची माहिती सिम हॅक करणाऱ्या व्यक्तीच्या हातात जाते.
ओटीपी ते ऑथेटिकेशन पर्यंतच्या सर्व गोष्टी डिवाइसवर दिसत नाही पण तुम्ही कंगाल होता. हॅकर्स तुमच्या फोन क्रमांकावर आपला पूर्णपणे कंट्रोल ठेवतात. मोबाईल क्रमांकाचा एक्सेस मिळाल्याने तुमच्या बँक खात्याची माहिती, ईमेल आयडी ते सोशल मीडिया अकाउंटसारख्या गोष्टींवर ही कंट्रोल करतात.
हे देखील वाचा- मुंबईतल्या चोर बाजाराला ‘चोर बाजार’ हे नाव कधी आणि कसं पडलं?
सिम स्वॅपिंग कसे होते?
स्विम स्वॅपिंग करणे हे सोप्पे काम नव्हे. फसवणूकदार प्रथम तुमच्या बँक खात्यासह पासवर्ड्स हॅक करतात. पण जर ते ट्रेस करु शकले तर ते तुमच्या खात्यापर्यंत अगदी सहजपणे पोहचू शकता. तुमच्या बँकेच्या वेबसाइटवर जाऊन बँकेच्या खात्यासंदर्भात तुमची फसवणूक करतात.(sim swapping)
खरंतर बहुतांश बँकांच्या खात्यांसाठी जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुम्हाला टू स्टेप वेरिफिकेशनला सामोरे जावे लादते. सिक्युरिटीसाठी तुमच्या मोबाईलवर एक कोड पाठवला जातो. तो योग्य दिल्यानंतर तुमच्या खात्यात लॉग इन होते. परंतु जेव्हा सिमचे कंट्रोल हे दुसऱ्याकडे असेल तर तो फसवणूकदार तुमचा कोड तेथे देऊन तुमच्या नावाने लॉग इन करतात. पण तुम्ही सिम स्वॅपिंगपासून सहज बचाव करु शकतात. तुम्ही तुमच्या बँक खात्याच्या माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच स्ट्राँग पासवर्ड तर असावच पण तो कालांतराने सुद्धा बदलत रहावा..