Home » नॉन-व्हेज खाल्ल्याने लठ्ठपणा येतो?

नॉन-व्हेज खाल्ल्याने लठ्ठपणा येतो?

by Team Gajawaja
0 comment
Obesity in Women
Share

सध्याच्या काळात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या निर्माण होत आहे. प्रत्येक वयातील लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या ही दिसून येत आहे. लठ्ठपणामुळे काही आजारांचा सुद्धा सामना करावा लागतो. तर लठ्ठपणा येण्याची अनेक कारण असू शकतात. परंतु असा प्रश्न विचारला जातो की, खरंच नॉन-व्हेज खाल्ल्याने लठ्ठपणा येतो का? काही जणांनी हे खरे असल्याचे मानले पण काहीजण त्याला चुकीचे विधान असल्याचे म्हणत आहेत. अशातच तुम्ही सुद्धा या गोष्टीवरुन गोंधळलात असाल तर याचे उत्तर तुम्हाला येथे मिळणार आहे. कारण आम्ही तुम्हाला याबद्दल रिसर्च आणि अभ्यास काय सांगतो हे अधिक सविस्तर पद्धतीने सांगणार आहोत.(Obesity Causes)

काय सांगतो अभ्यास?
PETA च्या एका रिपोर्टनुसार, अ‌ॅनिमल आधारित प्रोडक्टमध्ये प्लांट बेस्ड फूडपेक्षा अधिक फॅट असते. दीर्घकाळ वजन संतुलित राखण्यासाठी शाहाकारी फूडचे सेवन करावे. रिपोर्ट्सनुसा, काही अभ्यासातून असे समोर आले आहे नॉन-व्हेज खाणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणाचा दर शाकाहारी लोकांपेक्षा ३ पट अधिक असतो. धक्कादायक बाब अशी की, शाकाहारी डाएट करणाऱ्या लोकांचे वजन हे नॉन-व्हेज खाणाऱ्यांच्या तुलनेत जवळजवळ ४-८ किलो पर्यंत कमी होते. त्याचसोबत शाकाहारी फूड्स खाल्ल्याने तुम्ही बारीक होण्यास ही मदत मिळतेच पण तुम्हाला हृहयासंबंधित रोग, मधुमेह, कॅंन्सर आणि गाठ येणे अशा प्रकारच्या आजारांपासून लढण्यास ही मदत करेल.

Obesity Causes
Obesity Causes

लठ्ठपणाचे प्रमुख कारण काय असू शकते?
सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनच्या रिपोर्टनुसार, लठ्ठपणा हा एक गंभीर आजार आहे. ही अशी स्थिती आहे एखाद्याचे वजन हे उंचीपेक्षा अधिक असते. लठ्ठपणा हा लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या लोकांना होतो. खाण्यापिण्याची सवय, शारिरीक हालचाल, झोपण्याच्या अयोग्य वेळासह अन्य काही कारण ही लठ्ठपणा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. काही वेळेस जेनेटिक आणि काही औषध घेतल्याने सुद्धा लठ्ठपणा येऊ शकतो. वजन नियंत्रणात राहण्यासाठी तुम्ही दररोज शारिरीक व्यायाम, संतुलित डाएट आणि उत्तम लाइफ स्टाइल जगण्याची गरज आहे.(Obesity Causes)

हे देखील वाचा- व्यायामाची ही गरज न भासणारे Fist Diet नक्की आहे तरी काय?

लठ्ठपणामुळे कोणते गंभीर आजार होतात?

-लठ्ठपणामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता असते. शरिरात रक्तातील ग्लूकोजचा सर्वसाधारण स्तर हा ७०-१२० मिलीग्रॅम/डीएल पेक्षा अधिक नसावा. परंतु लठ्ठपणामुळे तो वाढू शकतो. अशातच तुम्हाला टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.

-जर तुमचे वजन सातत्याने वाढत असेलत तुम्ही उच्च रक्तदाबाने त्रस्त होऊ शकता. उच्च रक्तदाबाला हायपरटेंशन असे ही म्हटले जाते. जर तुमचा रक्तदाब १४०/९० एमएमएचजी किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला अलर्ट होण्याची गरज आहे. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तुम्हाला वारंवार रक्तदाब तपासावा लागणार आहे.

-जेव्हा तुमचे वजन अधिक वाढलेले असते तेव्हा तुम्हाला रात्रीच्या वेळेस उत्तम झोप सुद्धा येत नाही. आतड्यांमध्ये चरबी जमा झाल्याने रक्त वाहिन्या या सामान्य रुपात रक्ताचा पुरवठा करण्यास सक्षम नसतात. त्यामुळे झोपेदरम्यान श्वास घेण्याची समस्या उद्भवू शकते. जेव्हा तुम्ही पुरेशा प्रमाणात झोप घेत नाहीत तेव्हा तुम्हाला स्लीप एप्नियाची समस्या सुरु होऊ शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.