आपण सर्वजण विमानाने प्रवास करण्यासाठी फार उत्सुक असतो. त्यावेळी इतरांना दाखवण्यासाठी आपण आपल्या बोर्डिंग पासचे फोटो सोशल मीडियात ही शेअर करतो. परंतु याबद्दलची आपली ही कृती करणे अत्यंत चुकीचे आहे. कारण भले तुम्ही बोर्डिंग पास हा एक फोटो समजून शेअर केला तर तुमच्यासंदर्भातील माहिती कोणीही मिळवू शकतो. कारण या कागदावर खुप महत्वाची माहिती दिली असते. त्यावर तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी प्रवास करत आहात यासंदर्भातील सर्व माहिती दिलेली असते या गोष्टींचा वापर करुन लोक तुमचा पीएनआर ते तिकिट बुकिंग करण्यासाठी दिले गेलेले कार्ड आणि तुमची खासगी माहिती मिळवू शकतात. त्याचसोबत तुमच्या अकाउंटचा पिन ही बदलू शकतात. ऐवढेच नव्हे तर पुढील प्रवासादरम्यान तिकिट सुद्धा रद्द करु शकतात.(Boarding Pass)
-एअरपोर्टवर बोर्डिंग पास फेकून देऊ नका
फ्लाइटमध्ये प्रत्येक दिवशी हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. तसेच आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. आपण यापूर्वी सुद्धा पाहिले की, आपल्या बोर्डिंग पास मध्ये तुमची खासगी माहिती असते. त्यामुळे बोर्डिंग पास हा कधीच चुकून ही एअरपोर्टवर फेकून निघून जाऊ नका.
हे देखील वाचा- परदेशात स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
-फ्लाइटमध्ये विसरु नका
आपल्याला ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे ते ठिकाण आल्यानंतर तुमचा बोर्डिंग पास फ्लाइटमध्ये ठेवण्याची चूक करु नका. यामुळे तुमची खासगी माहिती सर्वांसमोर येऊ शकते. त्यामुळे तो जपून ठेवा. फ्लाइटच नव्हे तर अन्य कोणत्याही अज्ञात ठिकाणी सुद्धा आपला बोर्डिंग पास ठेवून निघून जाऊ नका. अज्ञात व्यक्तीच्या हाताला तुमचा बोर्डिंग पास लागल्यासच तुम्हाला माहितीच आहे काय होईल.
-सार्वजनिक ठिकाणी पास संभाळून ठेवा
तुम्हाला माहिती नसेल की. बोर्डिंग पासवर (Boarding Pass) दिल्या गेलेल्या बार कोडमध्ये खुप माहिती लपलेली असते. लोकांना आपल्या बारकोडचे एक्सेस देणे धोकादायक ठरु शकते. बारकोडचा वापर करुन कोणीही तुमची माहिती मिळवू शकतात.
-हॉटेलमध्ये फेकून देऊ नका
नेहमीच प्रवास करताना ज्या ठिकाणचे हॉटेल बुक करणार असाल तेथील कचरा डब्यात आपण आपला बोर्डिंग पास प्रवासानंतर फेकून देतो. ही एक सामान्य बाब आहेच. पण अज्ञात व्यक्तीला तो मिळाल्यास तुम्ही धोक्यात येऊ शकता. त्यामुळे आपला बोर्डिंग पास कचरा डब्यात टाकण्यापूर्वी दहावेळा विचार करा. अन्यथा भविष्यात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल.