गेल्या काही वर्षांत लोक अनेक प्रकारच्या गंभीर आजारांना बळी पडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यातील मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर समस्या तरुणांमध्येही आढळून येत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या समस्यांमागे एक गोष्ट सर्वात जास्त आढळून आली आहे, ती म्हणजे लठ्ठपणाची समस्या. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे.(yoga) त्यामुळेच लठ्ठपणावर नियंत्रण ठेवल्यास अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(yoga)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणामुळे लहान वयातच अनेक गंभीर आजारांचे निदान होत आहे. कोरोनाच्या या युगात आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लठ्ठ लोकांमध्ये कोविड-१९ ची समस्या अधिक गंभीर दिसून येत आहे. लठ्ठपणा आणि त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या योगाच्या माध्यमातून टाळता येतात. जाणून घेऊया त्या योगासनांविषयी, जे लठ्ठपणा कमी करण्यासाठी विशेष फायदेशीर मानले जातात.(yoga)
भुजंगासन योग
भुजंगासन योग प्रामुख्याने पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि पाठीच्या खालच्या बाजूस आराम देण्यासाठी ओळखला जातो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या योगाच्या सरावाने वजन कमी करण्यास देखील मदत होऊ शकते. भुजंगासन किंवा कोब्रा पोजचा नियमित सराव करणे, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.(yoga)
प्लँक पोज
चतुरंग दंडासन (प्लँक पोज) हे तुमच्या पोटाचा गाभा मजबूत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या योगाच्या सरावाने, पोटाच्या स्नायूंवर तीव्रता जाणवते, जे सहजपणे फॅट कमी करण्यात उपयुक्त ठरू शकते. प्लँक पोजचा सराव जितका जास्त असेल, तितक्या जास्त कॅलरीज बर्न होतात.(yoga)
=====
हे देखील वाचा – तुम्हाला ‘या’ वेदना होतायत ? सांभाळून असू शकतो ‘हार्ट अटॅक’ चा धोका
=====