पृथ्वी ग्रहावर सजीवसृष्टी कधीपासून आली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण सर्व सजीवांमध्ये मनुष्य प्राणी सर्वात हुशार प्राणी असल्याचे इतिहासा काळापासून सिद्ध हात आले आहे. मानवाने आजवर होमो सेपियन्स मानवापासून मनुष्य जीवापर्यंत खूप मोठी प्रगती केली आहे. पण आयुष्यात कधीतरी प्रत्येकाला हा प्रश्न नक्की पडत असेल की, “माणूस कुठून आला आणि त्याचे मूळ घर कोठे आहे?” (Humans are not from Earth)
मनुष्य जन्माबद्दल अनेक शास्त्रज्ञांनी तर्क वितर्क लावले आहेत. ‘डार्विन थेअरी ऑफ इवोल्युशन’ हा जगभरात प्रमाण मानलेला सिद्धांत आहे. पृथ्वीवरील सजीव जीवांच्या उत्पत्तीच्या बाबत हा सिद्धांत माहिती देतो. यामध्ये सर्व सजीवांचा जन्म एकाच ठिकाणी झाल्याचे सांगण्यात आले आहे. मानवाचे स्थित्यंतर हे काळानुसार होत गेले आहे.
माकडापासून मानवी जीवाची उत्पत्ती झाल्याचे दाखले देण्यात येतात. डार्विन सिद्धांताप्रमाणेच डॉ एलिस सिल्वर यांचा सिद्धांत प्रकाशित करण्यात आला आहे. त्या सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे मानव बाहेरच्या ग्रहावरून आलेला सजीव आहे. त्याला अंतरिक्षातुन एखाद्या ग्रहावरून परग्रहवासीयांनी आणले असल्याची शक्यता या सिद्धांतात वर्तवण्यात आली आहे. (Humans are not from Earth
मानव परग्रहावरून पृथ्वीवर आणल्याबद्दल काही तर्क वितर्क लावण्यात आलेले आहेत.
१. मानव परग्रहवासी: मानवाचे मूळ घर परग्रहावर असून त्याला पृथ्वीवर आणण्यात आले आहे.
२. चिंपांझी वंशज: मानवाचे वंशज चिंपांझी असल्याचे सांगण्यात येते. मात्र तेच आपले वंशज असल्याचा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही.
३. सूर्यप्रकाश: सूर्यप्रकाश माणसाला सहन होत नाही, त्याप्रमाणात बाकी पशु पक्षी त्यांच्या केसाळ शरीरामुळे तीव्र प्रकाशात तग धरून जीवन जगू शकतात.
४. पाठदुखी: मानवाला पृथ्वीवर पाठदुखीचा त्रास जाणवतो, बाकी कोणत्याही प्राणी किंवा पक्षाला हा त्रास होत नाही.
५. मानवी जीवाचे डोके: पृथ्वी ग्रहावर मानवाच्या जन्मलेल्या बाळाचे डोके जास्त मोठे असते कारण पृथ्वीवर आईचे प्रमाणापेक्षा जास्त पोषण झाल्यामुळे बाळाचे वजन वाढलेले असते. बाकी सजीवांच्या पुनरुत्पादनात जन्मलेल्या जीवाचे डोके बारीक असते.
====
हे देखील वाचा: International Space Station: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे जणू विज्ञानाचा आविष्कार!
====
६. डीएनए: जेव्हा मानवी डीएनएचा अभ्यास करण्यात आला तेव्हा त्यात मानवी डीएनएचा भाग केळी, फळे आणि फुलांवर बसणाऱ्या मधमाशी आणि चिंपाझीसारखा असल्याचे सांगण्यात आले आहे. सजीव जीवांच्या डीएनए अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मानवात २२३ जनुके बाकी सजीवांपेक्षा जास्त असतात.
७: प्रगतीचा चढता आलेख: ७००० वर्षांमध्ये मानवाने एवढी प्रगती केली आहे की, या ग्रहावरील माणूस दुसऱ्या ग्रहावर सहज जाऊ शकतो. याच कारणामुळे दुसऱ्या ग्रहावरही सजीव जीवन अस्तित्वात असण्याची शक्यता आहे.
८. संकटांची चाहूल: माणूस सोडून पृथ्वीवरील सर्व सजीवांना येणाऱ्या संकटाबद्दल आधीच चाहूल लागत असते. ते संकट येण्याच्या आधी त्या ठिकाणाला सोडून दुसरीकडे स्थलांतरित होतात. पण मनुष्याला या संकटाबद्दल माहिती कळत नाही. आकाशात उडणारे पक्षी मैलोन मैल अंतर पार करून घरी परततात. कारण त्यांच्यात लांब जाऊन परत येण्याची चुंबकीय शक्ती विकसित झालेली असते. तसेच माणसाला यासाठी जीपीएसचा वापर करावा लागतो.
====
हे देखील वाचा: या २० विचित्र गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
====
मानव पृथ्वीवरील रहिवासी नसेल, तर तो कोणत्या ग्रहावरून आला असावा, यावर तर्क वितर्क लावले जातात. अतिनील किरणांचा मानवाला त्रास होतो, म्हणून तो ज्या ग्रहावरून आला तेथील आकाश आभाळांनी भरलेले असण्याची शक्यता आहे. तसेच, त्या ठिकाणी नैसर्गिक संकट कमी प्रमाणावर येत असेल. कारण मानवाला संकटे येण्यापूर्वी बाकीच्या प्राण्यांप्रमाणे चाहूल लागत नाही. (Humans are not from Earth)
पृथ्वीपेक्षा त्या ग्रहावर गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असू शकेल. कारण पृथ्वीवरील कमी गुरुत्वाकर्षणामुळे पाठदुखीचा त्रास माणसाला उद्भवतो.
कदाचित परग्रहवासीयांनी एखाद्या लहान मुलाला त्यांच्या ग्रहावरून पृथ्वीवर आणले असेल आणि पृथ्वीवर येण्याचे अंतर जास्त असल्यामुळे त्याचे वय वाढले. त्यामुळे पृथ्वीवर आल्यावर त्याला मुले झाले असतील. माणसाच्या जीवाची उत्क्रांती नेमकी कशी आणि कधी झाली हे मात्र गूढच आहे. डॉ. एलिस सिल्वर यांच्या सिद्धांतावर कितपत विश्वास ठेवायचा, हे मात्र तुम्हीच ठरवा.
– विवेक पानमंद