Home » Maharashtra : ‘त्या’ चार बायका रोज १३ वाघांशी नडतात !

Maharashtra : ‘त्या’ चार बायका रोज १३ वाघांशी नडतात !

by Team Gajawaja
0 comment
Maharashtra
Share

सध्या महाराष्ट्र बिबट्यांच्या हल्ल्याने हादरलेला आहे. दर दोन दिवसात महाराष्ट्राच्या कोणत्या न कोणत्या गावात बिबट्या दिसल्याच्या किंवा हल्ल्याच्या घडतच आहे. सरकार आणि सामान्य माणूस दोघेही या गोष्टीमुळे त्रस्त आहेत. कारण तोडगाच निघत नाहीये. काही लोकं बिबट्यांना पूर्णपणे मारून टाकण्याचा सल्ला देत आहेत. काही त्यांना इतर ठिकाणी सोडण्याचा तर काही लोकं त्यांची नसबंदी करण्याचा पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे, जिथे तब्बल १३ वाघ आहेत. पण तिथल्या ४ महिलांनी सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय एक धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे त्या वाघांना नडायचा. आता नडायचा म्हणजे त्यांना नुकसान पोहोचवणं हा त्यांचा उद्देश नाही, तर उद्देश एकच की गावातल्या लहान मुलांना शिक्षण घेता यावं. (Maharashtra)

तर हे गाव आहे ताडोबामधलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व्हमधल्या मोहर्ली रेंजमध्येच मोडतं. गावाचं नाव सितारामपेठ. हा नेमका कोअर झोनमध्येच मोडतो. आता ताडोबा म्हटलं तर वाघांचच राज्य ! या भागात १३ वाघ आहेत. ताडोबामधल्या मोठ्या वाघांपैकी एक असलेला छोटा दढीयालसुद्धा याच भागात आहेत. आता वाघांची दहशत तर आहेच, गावकऱ्यांना वाघ सतत दिसतच असतात. त्यामुळे त्यांना सवय लागलेली आहे. त्यांना वाघांपासून रक्षण कसं करायचं याचा अनुभव आहे. पण लहान मुलांचं काय ? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या शिक्षणाचं काय ? कारण याच १३ वाघांच्या भीतीमुळे गावातल्या मुलांचं शाळेत जाणच बंद झालं. आता करायचं तरी काय ? असा प्रश्न सीतारामपेठच्या गावकऱ्यांनी पडला. पण याच वेळी गावातल्या ४ धाडसी महिलांनी एक निर्णय घेतला. (Social News)

खरतर मुलांना सितारामपेठ गावातून शाळेसाठी चंद्रपुरला जावं लागत होतं. आता ग्रामीण त्यात दुर्मिळ भाग  वाघांना प्राधान्य असलेला अशा ठिकाणी वाहनांचीही सोय नाही. शाळेत जाण्यासाठी जंगलात काळोखात बुडालेला रस्ता आणि प्रत्येक पावलावर वाघाचं सावट आणि भीती असायची, कारण कोणत्या क्षणी वाघ समोर येईल कोणीच सांगू शकत नव्हतं. याच वाघांची दहशत मनात घेऊनच गावतील मुलं जगत होती आणि या भीतीमुळेच मुलांनी शाळेत जाणं बंद केलं होतं. (Maharashtra)

आणि इथेच एंट्री झाली चार वाघीणींची त्या म्हणजे किरण चरण गेडाम, वेणू दिलीप रंदये, रिना मंसराम नाट आणि सीमा राजू मडावी. या सगळ्या गावतल्या साध्या बायका! त्यांनासुद्धा वाघांची भीती होती, पण यापेक्षा जास्त भीती होती ती मुलांच्या भविष्याची. गावातल्या एका छोट्या बैठकीत त्यांनी ठरवलं की या वाघांच्या भीतीमुळे गावातल्या मुलांचं शिक्षण असंच थांबू द्यायचं नाही. ताडोबा रिझर्वचे उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी पुढाकार घेतला. त्या महिलांकडे ना पद होतं, ना पदवी ना त्यांना काही मोबदला हवा होता. त्यांचं फक्त एकच ध्येय होतं. मुलं सुरक्षित राहिली पाहिजेत आणि शाळा सुरूच राहिली पाहिजे. (Social News)

मग सुरू झाली त्यांची रोजची मोहीम. दर सकाळी उजेड पडायच्या आधी या चौघी हातात काठी, टॉर्च आणि शिट्टी घेऊन निघतात. रस्त्याच्या मधोमध मुलांना रांगेत उभं करून कोणी पुढे उभं राहतं, कोणी सतत आजूबाजूचं जंगल न्याहाळत राहतं. सर्वांची कामं ठरलेली होती. अशा या ‘जिवंत सुरक्षा भिंती’मधे मुलांचा छोटासा ताफा निघतो सितारामपेठेतून चंद्रपूरच्या दिशेने  सकाळची एक फेरी आणि संध्याकाळची परतीची एक फेरी. असं ने-आण करून त्यांनी पोरांची शाळा सुरूच ठेवली. (Maharashtra)

दिवसामागून दिवस, आठवडे, महिने वाघ तिथेच आहेत, त्यांचा वावरही तसाच आहे; पण गावकऱ्यांच्या मनातली भीती आता थोडी कमी झालीये ती या चार धाडसी ताईंमुळेच! जे पालक आधी म्हणायचे “शाळा बंद ठेवू या”, तेच आता या ताईंसोबत आपल्या मुलांना पाठवतात. आतापर्यंत वाघाची किंवा वाघाच्या हल्ल्याची घटना कधीही घडली नाही. पण तरीही अशामुळे रिस्क कमी होऊन जात नाही. खरं तर मानव-वन्यजीव संघर्ष रोखण, ही केवळ सरकारची, वनविभागाची नाही, तर समाजाचीही एकत्रित जबाबदारी आहे, हे महिलांनी दाखवून दिलं आहे. (Social News)

========

हे देखील वाचा : Bihar Election : १५ वर्षे झगडूनही लालूंचा पोरगा का जिंकत नाही..

========

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही एक वाक्य म्हटलं आहे, शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखं आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, आपण शिकलेलो नसू पण आपली पिढी मात्र शिकावी यासाठी या महिलांचा हा संघर्ष खरच प्रेरणादायी आहे. असं असलं, तरीही आपण त्यांना सरकारकडून काहीतरी मदत मिळावी यासाठी सर्वांनी मिळून हा विषय सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. (Maharashtra)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.