Home » Honey Trapping : पाकिस्तानमधील हनी ट्रॅपचे विद्यापीठ !

Honey Trapping : पाकिस्तानमधील हनी ट्रॅपचे विद्यापीठ !

by Team Gajawaja
0 comment
Honey Trapping
Share

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनं मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षापासून सोशल मिडियाचा विस्तार एखाद्या समुद्रासारखा झाला आहे. त्यातच युट्यबर नावाचा सगळ्यात मोठा गट तयार झाला आहे. आता ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर असे अनेक युट्यूबर सुरक्षा यंत्रणांच्या रडावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून भारताच्या कानाकोप-याचे दर्शन जगाला दाखवणारे युट्यूबर संशयाच्या फे-यात सापडले आहेत. वास्तविक या सर्वातून हनी ट्रॅप ही हेरगिरी करणारी पद्धती बदलत चालल्याचेही स्पष्ट झाले आहे. (Honey Trapping)

ज्योती मल्होत्राही अशाच हनी ट्रॅपचा भाग आहे का, याची आता चौकशी होत आहे. पाकिस्तानमधून गेल्या काही वर्षात अशा प्रकारे हनी ट्रॅप लावून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि संरक्षण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पाकिस्तानमध्ये अधिकृत असे विद्यापीठ असल्याचीही माहिती आहे. हनी ट्रॅप पद्धतीमध्ये आता या युट्यूबरची भर पडली आहे. परदेशी दौरे आणि फाईव्हस्टार सुविधांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून भारत विरोधी काम करुन घेण्यात येत असल्याचे उघड होत आहे. भारतीय शास्त्रज्ञांपासून ते पोलीस अधिक्षकांपर्यंत अशा अनेकांना पाकिस्ताननं या हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आहे. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर हे सर्व रॉकेट कसं चालतं आणि या हनी ट्रॅपचे प्रशिक्षण कुठे दिले जाते, याबाबत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. (Latest News)

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी युट्यूबर ज्योती मल्होत्रा भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात आहे. ज्योतीच्या अटकेमुळे अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संघटना या युट्यूब चालकांचा वापर करुन भारत विरोधात माहिती गोळा करीत असल्याचाही संशय आहे. आत्तापर्यंत हनी ट्रॅपमध्ये पुरुषांना अडकवण्यात येत असे, मात्र ज्योतीच्या अटकेनंतर हनी ट्रॅप महिलांभोवतीही अडकवण्यात आल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानमध्ये यासाठी विशेष यंत्रणा असून त्यातून सोशल मिडियावर वावर असलेल्या व्यक्तिंना प्रलोभनात अडकविण्यात येत आहे. ज्योतीच्या अटकेनं पाकिस्तानी एजन्सी आयएसआयने बदललेल्या हनी ट्रॅपचे वास्तवही उघड झाले आहे. ब-याचवेळा हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी तरुणींचा वापर करण्यात येतो. पाकिस्तानी गुप्तचर संघटना या तरुणींना पाकिस्तानातील रावळपिंडी येथे असलेल्या फातिमा जिन्ना महिला विद्यापीठात शिक्षण देत असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त कराची आणि अन्य शहरांमध्येही महिलांना हनी ट्रॅपचे प्रशिक्षण दिले जाते. (Honey Trapping)

या प्रशिक्षणात सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लोकांना कसे फसवावे, यातील बारकावे शिकवले जातात. मात्र सोशल मिडियाचा व्याप वाढवल्यामुळे आता या हनी ट्रॅपची पद्धतही पाकिस्तानकडून बदलण्यात आली आहे. ज्योती पाठोपाठ एक अन्यही युट्यूबर महिला सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात अजूनही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. तसेच वारंवार परदेश वारी करणा-या युट्यूब चालकांना मोठ्या प्रमाणात फंडीग कोण देत आहे, याचा तपास सुरु झाला आहे. हे फंडीग, परदेश दौ-याचे अमिष आणि त्यातील फाईव्ह स्टार सुविधा हा एकप्रकारचा नवा हनी ट्रॅप असल्याचे भारतीय सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. गेल्या दोन वर्षापासून पाकिस्तानी गुप्तचर संघटनेनं भारतातील हे हनी ट्रॅपचे जाळे वाढवले आहे. 2023 मध्ये, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी एजंटसोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल अटक केली. ही बातमी धक्कादायक होती. (Latest News)

=======

हे देखील वाचा :  Uttar Pradesh : चला देशातल्या पहिल्या विस्टाडोम ट्रेनच्या प्रवासाला

Langada Mango : लंगडा चालला युरोपला !

=======

यामुळे हनी ट्रॅपचे जाळे खोलवर विणण्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला यश आल्याचे उघड झाले. त्यापूर्वी 2022 मध्ये राजस्थान मधील लष्कराच्या जवानालाही अटक करण्यात आली होती. तसेच भेलमधील वरिष्ठ अधिका-यालाही या हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचे उघड झाले आहे. सध्या या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. ज्योती मल्होत्रा अटकेत असून तिच्या चौकशीतून ती पाकिस्तानसह चीनलाही गेल्याचे स्पष्ट झाले आहे. युट्यूबर हा सध्याचा माहिती आणि मनोरंजनाचा सर्वात चांगला पर्याय आहे. घरी बसून जगभरातील माहिती त्याद्वारे बघितली जाते. पण याच माध्यमाचा वापर पाकिस्ताननं करुन भारतीय सुरक्षा यंत्रणेला हादरे देण्यासाठी केला आहे. आता या माध्यमावर नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र सोशल मिडियाचा फैलाव बघता हे शक्य नसल्याचे तज्ञांचे मत आहे. यासाठी नागरिकांनी वैयक्तिक काळजी घेणे, हा एकच योग्य उपाय असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे. (Honey Trapping)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.