केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित एक प्रसिद्ध मंदिर आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून या पद्मनाथ मंदिराचा उल्लेख होतो. मंदिरात एकून सात तळघरे असल्याची मान्यता आहे. त्यापैकी सहा तळघरे 2011 मध्ये उघडण्यात आली होती. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांहून अधिक मोठा खजिना मिळाल्याचे सांगितले जाते. सोने, चांदी, माणिक आणि मूल्यवान अशा रत्नांच्या अनेक वस्तू यात आहेत. या मंदिराचा सातवा दरवाजा मात्र उघडण्यात आला नव्हता. (Sri Padmanabhaswamy Temple)
या श्री पद्मनाभस्वामी मंदिरबाबत अनेक गुढ कथा आहेत, तशाच कथा या मंदिराच्या सातव्या तळघराबाबतही आहेत. तिरुअनंतपुरम येथील या मंदिराचा इतिहास 8 व्या शतकाचा आहे. भारतातील 108 दिव्य देशम मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिराची पुनर्बांधणी त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मा यांनी केल्याचे सांगितले जाते. या मंदिरात आजही भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी हजारो वर्षापूर्वीची परंपरा पाळली जाते. याच श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील चमत्काराची चर्चा सध्या केरळमध्ये सुरु आहे. महिन्यापूर्वी या मंदिरात सोन्याची चोरी झाली. मात्र चोरीला गेलेले सोने पुन्हा मंदिर परिसरातून मिळाले आहे. विशेष म्हणजे, या मंदिर परिसरात सीसीटीव्हीचे जाळे आहे. मात्र त्यात हे सोने आणतांना कोणीही दिसत नाही. त्यामुळेच या प्रकारानं श्री पद्मनाभस्वामी मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे. हा देवाचा चमत्कार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अर्थात याबाबत पोलीसात तक्रार करण्यात आली आहे. पोलीसांनी मंदिर परिसरातील सर्वच सीसीटीव्ही मधील फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. (Latest News)
केरळचे श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे भगवान विष्णुचे निवासस्थान म्हणून पुजले जाते. जगातील सगळ्यात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखल्या जाणा-या मंदिराच्या अनेक गुढ कथा प्रचलित आहेत. त्यात आणखी एका कथेची भर पडली आहे. ही कथा मंदिरातून झालेल्या चोरीची आहे. गेल्या महिन्यात श्री पद्मनाभस्वामी मंदिरातून सोन्याची चोरी झाली. मात्र हे सोने पुन्हा मंदिर परिसरात मिळाले. या मंदिरातील कुठलेही सोने बाहेर जाऊ शकत नाही, असे येथील स्थानिक सांगतात. मंदिराच्या तळघरात सात दरवाजे असून त्यातील सहा उघडण्यात आले आहेत. या तळघरात असलेल्या सोन्याची आणि अन्य दागिन्यांची किंमत अद्यापही ठरवता आलेली नाही. हे दागिने प्रत्यक्ष भगवान विष्णूचे असल्याची मान्यता आहे. येथील प्रत्येक वस्तू ही भगवान विष्णूची आहे, त्यामुळे त्याची चोरी होऊ शकत नाही, अशी श्रद्धा आहे. याच श्रद्धेला अनुसरुन ही घटना झाल्यामुळे स्थानिक याचा चमत्कार म्हणून उल्लेख करीत आहेत. (Sri Padmanabhaswamy Temple)
श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या दरवाज्यांची सध्या दुरुस्ती करण्यात येत आहे. या दरवाज्यांवर जे सोनं आहे, ते काढून त्यापासून नव्यानं रॉड आणि अन्य दरवाजावर लावण्याच्या वस्तू तयार करण्यात येत आहेत. हे सर्व काम करतांना मोठा बंदोबस्त आणि चोख तपासणी करण्यात येते. सोनारांनी सोन्याचे रॉड बनवण्याचे काम पूर्ण केल्यावर मंदिर व्यवस्थापनाने सर्व सोन्याच्या वस्तू ताब्यात घेतल्या आणि त्या मोजून कापडी पिशवीत भरून मंदिराच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे ठेवल्या. पण दुस-याच दिवशी या वस्तू भरलेली बॅग मिळाली. पण त्यात सोन्याचा रॉड आणि अन्य सोन्याच्या वस्तू गायब झाल्यानं खळबळ उडाली. (Latest News)
==============
हे देखील वाचा : Maharashtra : महाराष्ट्रातील असे गाव जिथे चक्क सापांना पाळले जाते
Vegetarian : ८०० वर्षांपासून शाकाहारी असलेले महाराष्ट्रातील एकमेव गाव
==============
पोलीस पथक आल्यावर मंदिराच्या संपूर्ण परिसराची तपासणी केल्यावर वाळूमध्ये हा रॉड पुरुन ठेवलेला आढळून आला. मात्र तो कोणी ठेवला हे शोधता आलेले नाही. स्थानिक आणि मंदिरातील पुजारी याला देवाचा चमत्कार म्हणत आहेत. पोलीसांना ही घटना परिचितांनी केल्याचा संशय असून तसा तपास सुरु आहे. श्री पद्मनाभस्वामी मंदिरबाबत असे चमत्कार नेहमी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. भगवान विष्णूला समर्पित या मंदिराच्या तळघरातील सातव्या दरवाज्याबाबतही अनेक कथा सांगितल्या जातात. असे मानले जाते की, हा दरवाजा उघडल्याने मोठा अनर्थ येण्याची शक्यता आहे. काहींच्या मते या दरवाजामागे भगवान विष्णूचे निवासस्थान असून हा दरवाजा थेट अरबी समुद्रात उघडतो. श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरातील आत्ताच्या या चमत्काराची चर्चा केरळमध्ये होत आहे. (Sri Padmanabhaswamy Temple)
सई बने