आजकाल सर्वच लोकं नॉन व्हेज खाताना दिसतात. घरात व्हेज खाणारे लोकं बाहेर सर्रास नॉन व्हेज खातात. नॉन व्हेज खाणे आजच्या आधुनिक काळात प्रेस्टिजचा विषय बनला आहे. नॉन व्हेज खाण्याचे करी अनेक फायदे असले तरी ते खाण्याचे तोटे अधिक आहेत. आजच्या काळात नॉन व्हेज खाण्याचे तोटे समजून अनेक लोकं व्हेज होताना दिसत आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात एक असे गाव आहे, जे मागील ८५० वर्षांपासून शाकाहारी आहे. संपूर्ण गावात कोणीही नॉन व्हेज खात नाही. जाणून घेऊया या अनोख्या गावाबद्दल. (Vegetarian)
हे गाव आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील ‘कनाशी’. कनाशी हे जवळपास तीन हजार लोकवस्तीचं गाव असून ते महानुभव पंथाचं पालन करणारं गाव आहे. महानुभव पंथाची उपासनापद्धत आणि शिकवण यामुळे शेकडो वर्षापासून या गावात मांसाहारावर बंदी आहे. गावात अनेक विचारांची माणसं राहतात. भिन्न आवडीची माणसं राहतात. मात्र शाकाहारावर या सर्व गावकरांचे एकमत असल्याचे पाहायला मिळते. (Marathi News)
महानुभाव पंथाच्या उपासनेची जवळपास आठशे वर्षांची मोठी परंपरा या गावाला आहे. आपल्या देशात कनाशी नावाची अजून किमान पाच ते सहा गावं असतील; परंतु या कनाशी गावाने आपली एक वेगळीच आणि अनोखी ओळख निर्माण तर केलीची पण ती जपली सुद्धा. बाराव्या शतकातील तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची एक आख्यायिका सांगितली जाते. (Marathi Latest News)
गिरणा नदी काठावर असलेल्या या कनाशी गावात साधारणतः १२ व्या शतकात चक्रधर स्वामी आल्याचा इतिहास आहे. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने या गावाची भूमी पवित्र झाली आहे. चक्रधर स्वामी म्हणजेच महानुभाव पंथाचे आचार विचार आणि हे विचार या गावातील संपूर्ण गावकऱ्यांनी विनातक्रार स्विकारले आहेत. या गावात चक्रधर स्वामीचे मोठे मंदीर आणि आश्रम आहे. देशभरातून महानुभव पंथांचे असंख्य अनुयायी दर्शनासाठी येतात. (Marathi Trending News)
ज्या दिवसांपासून गावात चक्रधर स्वामी येवून गेले आहे, गावात राहून गेले आहेत, त्या दिवसांपासून ते आजपर्यंत या गावात कोणत्याही गावकऱ्याने मांसाहार केलेला नाही आणि दारुलाही स्पर्श केलेला नाही. एवढेच नाही तर मांसाहाराला कारण असलेले प्राणी म्हणजेच कोंबडी व बकरी सुध्दा या गावात पाळली जात नाही. चक्रधर स्वामींना माणणारे हे संपूर्ण गाव आहे. तर चक्रधर स्वामींच्या विचारांचाही या गावातील ग्रामस्थांवर पगडा आहे. (Social News)
=======
हे देखील वाचा : डिमेंशियाची समस्या अनुवांशित असते का? घ्या जाणून
=======
या कनाशी गावातील दुकाने, विकास सोसायटी तसेच दूध डेअरी यांचे नाव सुध्दा चक्रधर स्वामी असे ठेवण्यात आल्याचे आपल्याला दिसते. या गावात लग्न करुन आलेल्या सूना जर मांसाहार करत असतील तर त्यासुध्दा सासरच्या परंपरेनुसार शाकाहारी होवून जातात आणि कायमचं शाकाहाराचं पालन करतात, असं गावातील नागरिक सांगतात. जर एखाद्या आजारावर डॉक्टरांनी नॉन व्हेज खाण्याचा सल्ला जरी दिला तरी येथील लोकं मांसाहार करत नाही. प्रत्यक्षात मांस कसे असते, कसे दिसते, अंडी कशी असतात, ते कसे दिसतात, हे पाहिलेले नसल्याचे जेव्हा येथील ग्रामस्थ सांगतात.