आधुनिक जीवनशैलीमुळे जरी आपले जीवन सुकर होत असले आणि आपल्याला अनेक बाबतीत आराम मिळत असला तरी याचा अतिशय चुकीचा आणि वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे. जिथे विविध टेक्नॉलॉजी, गॅझेट्स, मशिन्स आपले काम जलद आणि सोपे करत आहे. तिथे दुसरीकडे मात्र याचे दुष्परिणाम हळूहळू जाणवायला लागले आहेत. पूर्वी लोकांना वयाच्या ५० किंवा ६० नंतर आजार व्हायचे, मात्र आता हे प्रमाण २५ ते ३० या वयाशी येऊन थांबले आहे. हे खरंच खूपच धक्कादायक आणि विचार करण्यासारखे आहे. भविष्यातील धोका ओळखून आपण आजच सावध होऊन आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेणे गरजेचे आहे. (BP)
सध्या आपल्याला सतत कानावर येत असलेला एक शब्द म्हणजे रक्तदाब अर्थात बीपी. आजकाल अनेकांना मग वय जास्त असो किंवा कमी हा बीपी त्रास होताना दिसत आहे. बीपीच्या त्रासाचा आता वयाशी काहीही संबंध उरलेला नाही. हा आजार वाटतो तितका साधा अजिबातच नाहीये. रक्तदाब एक सायलेंट किलर असे देखील म्हटले जाते. यात दोन प्रकार पडतात एक तर लो बीपी आणि दुसरा म्हणजे हाय बीपी. यात लो बीपीचा त्रास जरा जास्त त्रासदायक असतो. म्हणून या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आज जागतिक हायपरटेन्शन डे आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया लो बीपी या आजाराबद्दल. (Marathi Top News)
रक्तदाब म्हणजे काय?
रक्तदाबाचा संबंध हृदयाशी आहे. आपल्या शरीरात हृदय हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाच्या आकुंचन पावणे आणि प्रसरण पावणे या तालबद्ध हालचालीमुळे शरीरभर रक्त फिरत असते. हे रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ असे म्हणतात. शरीरातील सर्व अवयवांचे कामकाज नीट चालण्यासाठी रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते. त्या त्या अवयवाला जितक्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता आहे. त्यानुसार हा रक्तपुरवठा होणे गरजेचे असते. (Marathi Latest NEws)
रक्तदाब (Low BP) म्हणजे काय कमी रक्तदाबाला हायपोटेन्शन असेही म्हणतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रक्तदाब ९०/६० mm Hg पेक्षा कमी असल्यास बीपी लो झाला आहे, असे म्हटले जाते. सामान्य रक्तदाब १२०/१८० mm Hg दरम्यान राहतो.
लो ब्लड प्रेशरची समस्या ही उच्च बीपीइतकीच धोकादायक आहे कारण बीपी कमी झाल्यावर मेंदू, यकृत आणि हृदयासह इतर अनेक अवयवांपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचत नाही, त्यामुळे या इंद्रियांवर परिणाम होऊ शकतो. कमी रक्तदाबाला वैद्यकीय भाषेत हायपोटेन्शन असेही म्हणतात. सामान्य रक्तदाब 120/80 मानला जातो. (Top Marathi News)
कमी रक्तदाबामुळे (Low BP) अशी लक्षणे दिसू शकतात
– उभे असताना बेशुद्ध होणे
– डोक्यात थंडी जाणवणे
– थकवा जाणवणे
– सर्दी आणि त्वचा पिवळी पडणे
– अस्वस्थता जाणवणे
– जास्त घाम येणे आणि अशक्तपणा जाणवणे
लो ब्लड (Low BP) प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय
मीठ : लो ब्लड प्रेशरची समस्या असेल तर डोकेदुखी, उलटी, मळमळ यासारखी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी त्वरित ब्लड प्रेशर चेक करावे आणि ते कमी असल्यास मीठाचे अथवा मीठयुक्त पदार्थाचे सेवन करावे. हा एक आयुर्वेदिक उपचार आहे.
आवळा : लो ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांना चक्कर येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये आवळ्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे.
खजूर : ज्या लोकांना वारंवार लो ब्लड प्रेशरचा त्रास होतो, त्यांनी दुधासह खजूर खाल्ला पाहिजे. एक ग्लास दुधामध्ये खजूर घालून ते दूध उकळावे आणि प्यावे. यामुळे त्रास कमी होईल. (Social News)
======
हे देखील वाचा : Beer : बिअरप्रेमींसाठी खुशखबर! २०० रुपयांची बिअर आता फक्त ५० रुपयांमध्ये
=======
द्रव पदार्थ : या रुग्णांनी किंबहुना अधिकाधिक द्रव पदार्थांचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे आपण हायड्रेटेड राहतो. खरंतर ज्या द्रव पदार्थांमध्ये पोटॅशिअम असेत, त्यांचे सेवन केल्याने लो बीपीचा त्रास कमी होऊ शकतो.
लो-ब्लड प्रेशरमध्ये कोणता आहार घ्यावा?
द्रवपदार्थांच जास्त सेवन करा. अंडी, मांस यासारख्या व्हिटॅमिन बी 12 असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. फॉलेट रिच फूड, म्हणजे डाळ, सोयाबीनचे, लिंबूवर्गीय फळं, पालेभाज्या, अंडी यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. (Marathi Trending News)