Home » Maharashtra : महाराष्ट्रातील असे गाव जिथे चक्क सापांना पाळले जाते

Maharashtra : महाराष्ट्रातील असे गाव जिथे चक्क सापांना पाळले जाते

by Jyotsna Kulkarni
0 comment
Maharashtra
Share

साप…नुसतं नाव जरी घेतलं तरी सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडून त्याची जागा भीती घेते. साप या प्राण्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच खूपच भीती वाटते. जर चुकून कधी कोणी कुठे साप पाहिला तर सर्रकन अंगावर काटा येतो. आपल्या मनुष्यच्या तुलनेत छोटा असणारा साप फक्त एकदाच चावून आपला खात्मा करू शकतो. सापाच्या विषाने मृत्यू होतो ते अटळ सत्य आहे. (Maharashtra)

मात्र असे असले तरी आपल्या हिंदू धर्मामध्ये सापाला देवाचे स्थान देण्यात आले आहे. भगवान शंकरांच्या गळ्यात विराजमान असलेला साप कायम पूजनीय आहे. दरवर्षी नागपंचमीच्या सणाला भारतीय शहरा-शहरांत गावांत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हजारो भक्त सापांची पूजा करतात त्यांना दूध-लाह्यांचा नैवेद्य चढवतात. अनेक गावांमध्ये शहरांमध्ये सापाची, नागाची मंदिरं देखील असतात. मोठ्या भावभक्तीने लोकं त्यांची पूजा करतात आणि आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली जाते. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितले की, भारतात एक असे गाव आहे, जिथे सापांना घरात पळाले जाते तर? (Marathi News)

ऐकून विचित्र वाटले असेल, विश्वास बसत नसेल. तुम्ही म्हणाल काहीही काय सांगता. साप काय पाळीव प्राणी आहे का? घरात पाळायला. गाय, कुत्रा, मांजर, पोपट आदी प्राणी ठीक आहे पण साप…? शक्यच नाही. जीवघेण्या सापाला कोणीच आपल्या घरात पाळू शकत नाही. मात्र हे खरे आहे. किंबहुना हे साप घरात पाळणारे गाव आपल्या महाराष्ट्रातच आहे. जाणून घेऊया याच गावाबद्दल आणि इथल्या या अनोख्या परंपरेबद्दल. (Marathi Latest News)

Maharashtra

महाराष्ट्रातील शेलापुर जिल्ह्यातील शेटफळ नावाचे एक गाव आहे. या गावात लोकं सापांसोबत राहतात. या गावात फक्त सापांची पूजाच केली जात नाही तर येथील लोकं त्यांना त्यांच्या घरात आसरा देखील देतात. शेटफळ हे एक असं गाव आहे जिथे साप अगदी लीलया फिरताना आपल्याला दिसतात. या गावात त्यांना कोणीही हटकत नाही की त्यांना मारत नाही. (Social News)

या गावाची मुख्य गोष्ट म्हणजे, या गावात २,६०० पेक्षा अधिक गावकरी आहेत. मात्र आजवर या सापांनी कोणलाही कोणत्या प्रकारचे नुकसान पोहोचवलेले नाही. या गावात अतिशय विषारी. जीवघेणे आणि भयंकर कोब्रा साप देखील सहज दिसतात आणि इथे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने वागवले जाते. इथले गावकरी ना सापांना घाबरतात ना नागांना. (Top Stories)

शेटफळमधील ग्रामस्थांना सापांसोबत राहण्याची जगण्याची इतकी सवय झाली आहे की ते या विषारी प्राण्यासोबत सहज राहतात. इथल्या जुन्या घरांमध्ये या सापांच्या निवाऱ्यासाठी एक वेगळी जागा देखील असते. इतकंच नव्हे तर, येथील स्थानिक नागरिक जेव्हा नवीन घर बांधतात तेव्हा घरात एक जागा अशी ठेवतात जिथे साप राहू शकतील. गावातील कोणताही रहिवाशी घर बांधत असेल तर सापांसाठी देखील व्यवस्था करतात. (Marathi Trending News)

Maharashtra

गावकरी सापाला पाळीव प्राणी मानतात. या गावातील लहान मुलं शाळेत जातानाही सापाला सोबत घेऊन जातात. लहानपणापासूनच सापांसोबत मोठे झालेल्या इथल्या मुलांना देखील सापांची भीती वाटत नाही. साप मुलांनाही डसत नाही. मात्र गावकऱ्यांव्यतिरिक्त जर या गावात कोणी नवीन बाहेरचा व्यक्ती आला तर त्याला या गावात फिरणे अवघड होऊ शकते. (Marathi NEws)

=======

हे देखील वाचा : Buddha Purnima : बुद्ध पौर्णिमा

Virat Kohli : किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

=======

नागपंचमी सण शेटफळ गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावातील कोब्रा नाग मंदिरात आणून त्यांची विशेष पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी आधी एक आठवडाभर नागोबाच्या मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून नागाची पूजा केली जाते. अशा या अनोख्या गावाची चर्चा कायम सगळीकडे होत असते. कधी संधी मिळाली तर नक्की या गावात जा आणि हा अनुभव घ्या. (Marathi Top News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.