सध्या उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला सुरुवात झालीये. अगदी १० दिवसांच्या आतच या कुंभमेळ्याद्वारे अनेक जण limelight मध्ये आले आहेत. त्यामुळे या महाकुंभात सतत चर्चेत येणाऱ्या नावांबद्दलच सगळीकडे चर्चा आहे. यंदाच्या महाकुंभमेळ्यात काही युनिक बाबा आले आहेत, जसं की IITअन बाबा, IAS बाबा, अनाजवाले बाबा ज्यांची यामध्ये प्रामुख्याने नाव घेतली जात आहेत. पण या सगळ्यात एका १६ वर्षाच्या मुलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती मुलगी म्हणजे मोनालिसा ! मोनालिसाने तिच्या सुंदरतेने आणि खास अंदाजाने महाकुंभ मध्ये कॅमेरा मॅन्सना आणि लोकांना भुरळ पाडली आहे. पण आता तिची सुंदरताच तिच्यासाठी महागात पडली आहे. करायचं होतं एक आणि झालं एक अशी तिची अवस्था झाली आहे. मध्यप्रदेशच्या छोट्याश्या गावातील रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालीसा रातोरात इंटरनेट sensation कशी बनली आणि त्याच्यामुळे तिलाचं कसा त्रास झाला? हे जाणून घेऊ. (Viral Monalisa)
लांबसडक केस, निळे-घारे डोळे, सावळा रंग आणि गोड़ बोलणं या सगळ्यांचा मिलाफ म्हणजे मोनालिसा भोसले ! सध्या सुरु असलेल्या महाकुंभामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव ! महाकुंभमध्ये रुद्राक्ष विकणारी मुलगी मोनालिसा कोण आहे ? याबद्दल सध्या सगळेचजण उत्सुक आहेत. अनेकांना ती परदेशातून इथे आल्याचं वाटतंय. पण तसं नसून ही मोनालिसा आहे मूळची मध्यप्रदेशच्या आर्थिक राजधानीमधली म्हणजेच इंदौर मधली. असं ती सगळ्यांना सांगते आहे, पण ती खरं म्हणजे आहे मध्यप्रदेशच्या महेश्वर गावातली. पण ती अचानक इंटरनेट सेंसेशन कशी ठरली ? तर एका इंस्टाग्राम user ने तिचा या कुंभमेळ्यादरम्यानचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि caption लिहलं की महाकुंभ दरम्यान दिसलेली सर्वात सुंदर तरुणी ! मग काय ? ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली आणि यात दिसणारी मोनालिसा रातोरात social media स्टार झाली. इतकी की कुंभमेळ्यात येणारी लोक तिला भेटण्यासाठी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी पागल झालेत. लोक तिला बॉलीवूड actresses सोबत compare करू लागली. काही जणांनी तर तिची मिस वर्ल्ड ठरलेल्या ऐश्वर्या राय सोबत तुलना केलीये.(Viral Monalisa)
पण तिच्या viral होण्यामुळे तिच्या business वर मोठा परिणाम झाल्याचं ती सांगतेय. तिचा संपूर्ण परिवार उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माळा विकतात. शिंपल्यातील मोती काढून त्याची माळ बनवणं, नेपाळमधून खरे रुद्राक्ष आणून त्याची माळा बनवणं आणि ते विकण्यासाठी मग मोठमोठ्या जत्रांमध्ये जाणं आणि महिनोंमहिने तिथेच राहणं हे मोनालिसाच्या कुटुंबाच काम. तसंच काम करण्यासाठी ते महाकुंभ मेळ्यात आले आहेत.
पण आता ती व्हायरल झाल्यामुळे या सगळ्याचा त्रास होत असल्याचं, तिने नुकतच कबूल केलय. त्याच झालं काय तिच्या natural beauty ने अनेकांना भुरळ घातली आणि आता लोक तिला फक्त बघण्यासाठी येतात. तिच्यासोबत फोटो काढून निघून जातात. न्यूज चॅनेलस सारखे तिची मुलाखत घेण्यासाठी तिच्या मागे असतात. या सगळ्यामुळे तिची कमाईच होतं नाहीये. एवढंच नाहीतर तिला अक्षरशः लोकांच्या धमक्या येऊ लागल्यात. ‘आम्ही तिला उचलून घेऊन जाऊ’ कोणाला कळणारही नाही अश्या प्रकारच्या धमक्या समोरून आल्यामुळे ती आता घाबरलीये. थोडक्यात काय तर सध्या तिची सुंदरताच तिला महागात पडलीये असं म्हणावं लागेल. कारण महाकुंभमध्ये दिसली नाही म्हणून अशा अफवा पसरल्या की ती महाकुंभ मेळा सोडून पुन्हा गावी परतली आहे. पण तिची तब्येत बिघडल्यामुळे ती घाबरली आहे आणि ती कुंभमेळ्यातच आहे. ती या सर्व गोष्टींना घाबरल्यामुळे तिच्या घरच्यांनी सर्वांना सांगितलं होतं की, ती मध्यप्रदेशला परतली आहे.(Viral Monalisa)
==============
हे देखील वाचा : Mahakumbhmela महाकुंभमेळ्यासाठी जाताय मग ‘हे’ अॅप डाऊनलोड कराच
==============
खर तर हा कुंभमेळा अनेकांसाठी वरदान ठरलाय असच म्हणावं लागेल. आधी iitian बाबा, मग viral साध्वी ठरलेली हर्षा रिछारिया आणि आता मोनालिसा ! त्यात गेल्या काही दिवसांपासून तिला विदेशातून स्थळं येत असल्याच्यासुद्धा चर्चा आहेत. दरम्यान या ३/४ दिवसांमध्ये अनेक मीडिया वाल्यांनी तिचे interview घेतले. यामध्ये तिला अनेकांनी विचारलेला कॉमन प्रश्न म्हणजे तुला एखाद्या मूवी मध्ये किंवा सिरीयल मध्ये काम करायला आवडेल का ? यावर तिचं उत्तर होत हो ! काही ठिकाणी असंही ऐकायला मिळतंय की तिला movies च्या ऑफरसुद्धा येऊ लागल्यात. (Marathi News)
आता या व्हायरल होण्याचा त्रास तिला होतो आहे. पण या movies च्या ऑफर खऱ्या असल्या तरच या त्रासाला अर्थ आहे. नाहीतर मीडियानेच फक्त तिच्या virality मुळे स्वत:च्या TRP च्या भाकऱ्या भाजून घेतल्या तर ते तिच्यासाठी अन्यायकारक ठरेल.