Home » Space Waste And Volcano : या ज्वालामुखीचा स्फोट झाला तर !

Space Waste And Volcano : या ज्वालामुखीचा स्फोट झाला तर !

by Team Gajawaja
0 comment
Space Waste And Volcano
Share

मानवजातीवर येऊ घातलेल्या दोन मोठ्या धोक्यांनी शास्त्रज्ञ चिंतेत सापडले आहेत. त्यातील एक धोका हा आइसलॅंड येथील बारदारबुंगा ज्वालामुखीपासून आहे. तर दुसरा धोका अंतराळातील कच-यापासून आहे. या दोन्हीही धोक्यांचा प्रकोप केव्हा होईल, हे सांगता येणार नाही. तसेच त्यांच्यापासून माणसाचा बचाव कसा करायचा याचाही उपाय अद्याप हाती लागला नसल्यामुळे शास्त्रज्ञ चिंतेत सापडले आहेत.
आइसलँडमधील सर्वात मोठ्या ज्वालामुखी प्रदेशांपैकी एक असलेल्या बारदारबुंगा ज्वालामुखीत 14 जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात भूकंप येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत 130 हून भूकंप येथे झाले आहेत. तज्ञांच्या मते ज्वालामुखीचा स्फोट येण्यापूर्वीची ही परिस्थिती आहे. हा स्फोट एवढा मोठा असेल की त्यामुळे हिमनदी फुटू शकते. असे झाले तर जमिनीतून कधीही आगीचा पूर येऊ शकतो. (Space Waste And Volcano)

यामुळे मोठा विनाश होण्याची भीती शास्त्रज्ञांना आहे. आइसलँडमधील बारदारबुंगा ज्वालामुखीभोवती भूकंपाशी संबंधित क्रियाकलापांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यात 5.1 रीक्टर स्केलचा भूकंपही असल्यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. बर्दारबुंगा ज्वालामुखी हा आइसलँडमधील सर्वात मोठ्या ज्वालामुखी प्रदेशांपैकी एक आहे. 2014-2015 दरम्यान सर्वात मोठा स्फोट येथे झाला होता. त्यावेळेही असेच भूकंप होत होते. तसेच भूकंप आता सुरु झाल्यामुळे हा स्फोट कधीही होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. बर्दारबुंगा हे सुमारे 190 किमी मध्ये पसरलेले क्षेत्र आहे. त्याचा एक भाग हा हिमनदीने भरलेला आहे. भूकंप असेच होत राहिले तर हिमनदीखाली अधिक उद्रेक होऊन ज्वालामुखीचा स्फोट होऊ शकतो. असे झाल्यास पूर आणि राख उत्सर्जनासारख्या गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात. असे झाल्यास हिमनदी वितळून समुद्राची पातळी वाढण्याची शक्यता आहे. (International News)

याचा फटका समुद्रशेजारी असलेल्या देशांना बसण्याची शक्यताही आहे. या ज्वालामुखीबरोबरच शास्त्रज्ञांना आणखी एक भीती आहे, ती अंतराळातून पडणा-या कच-याची. गेल्या काही महिन्यात अंतराळातून पडणा-या कच-याचे प्रमाण वाढले आहे. हा मानवजातीस सर्वात मोठा धोका असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. नुकतीच एरियन सेपरेशन रिंगसारखी वस्तू केनीयामध्ये पडली. अशी वस्तू घनदाट वस्ती असलेल्या शहरी भागात पडली तर अनेक घरं, आणि इमारती नष्ट होऊ शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानीही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवकाशातील वाढत्या कचऱ्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमधील अवकाश भौतिकशास्त्र तज्ज्ञ डॉ. इयान व्हिटेकर यांच्या मते, अवकाशातील कचरा वेगाने पृथ्वीभोवती फिरत असून तो मानवासाठी भविष्यातील सर्वात मोठा धोका आहे. डॉ. व्हिटेकर यांच्या मते, सध्या तरी अंतराळातील कचरा पडल्याने एखाद्याचा मृत्यू होण्याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु येत्या काळात ही शक्यता वाढणार आहे. (Space Waste And Volcano)

=============

हे देखील वाचा : Mahakhumbh 2025 : गंगा नदी लुप्त होणार !

America : बराक आणि मिशेल ओबामांच्या नात्यात आलाय दुरावा !

=============

कारण अवकाशातील कचरा वाढत आहे तशीच तो पृथ्वीवर पडण्याचे प्रमाणही वाढणार आहे. हा कचरा पृथ्वीकडे येतांना त्याचा वेग हा प्रचंड असतो. त्याचा आकार आणि वजन किती असेल हे सांगता येत नाही. त्याला वेगाची जोड मिळाल्यावर नुकसान हे मोठे असणार आहे. सध्या अंतराळ मोहीमांचे प्रणाण वाढले आहे. अंतराळ मोहिमांमुळे निर्माण होणारा हा कचरा इतका मोठा आणि धोकादायक आहे की तो पृथ्वीवर पडल्यानंतर मोठ्या इमारतींनाही उद्ध्वस्त करू शकतो. अवकाशात अनेक प्रक्षेपणे होत आहेत, ज्यामुळे अवकाशात कचऱ्याच्या तुकड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी स्पेसएक्स सर्वात जास्त जबाबदार असल्याचा आरोपही डॉ. व्हिटेकर यांनी केला आहे. उपग्रह आणि रॉकेट उत्पादक कंपन्यांनाही प्रक्षेपण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची जबाबदारी घ्यायला हवी. प्रत्येक देशांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अवकाश स्वच्छ ठेवणे ही सुद्धा प्रत्येक देशाची आणि अंतराळ मोहीमा करणा-या कंपन्यांची जबाबदारी आहे. पुढील काही वर्षात हा कचरा स्वच्छ झाला नाही, तर मानवी जीवनास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असेही डॉ. व्हिटेकर यांनी सांगितले आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.