पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक आजारांना किंवा शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय त्यांचे शरीर हे पुरुषांच्या तुलनेत जास्त नाजूक आणि संवेदनशील असते. महिलांना बहुतकरून हार्मोनल आजारांचा जास्त त्रास असतो. त्यातही बहुतकरून महिलांना त्यांच्या पाळीशी संबंधित अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. (Women Health)
पाळीशी संबंधित आजारांमुळे महिलांच्या शरीरावर आणि आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होताना दिसतो. मधल्या काही काळापासून अतिशय सामान्य होत चाललेला आजार म्हणजे पीसीओस (PCOS). तसे पाहिले तर पीसीओएस हा आजार नाही तर समस्या आहे. मात्र आपण जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर मग गंभीर आजार होऊ शकतो. (PCOS)
पीसीओस (Polycystic ovary syndrome) PCOS समस्या ही पूर्णपणे हार्मोनल असंतुलनाशी (Hormonal Imbalance) संबंधित आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीर समस्याही उद्भवू शकतात. आजच्या काळात अनेक मुली या समस्येला सामोरे जाताना दिसत आहे. मात्र पीसीओएस नक्की काय आहे? याची लक्षणे काय? याचे काय परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया.
PCOS ला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असे म्हणतात. ही समस्या म्हणजे स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल असंतुलन आहे. यामध्ये महिलांच्या शरीरातील पुरूष हार्मोन एंड्रोजनचे संतुलन बिघडते. अनियमित कालावधी आणि एक किंवा दोन्ही अंडाशयांमध्ये १२ अमॅच्युअर फॉलिकल्स विकसित होतात. (Top Marathi News)
PCOS ची लक्षणे कोणती?
PCOS चे लक्षणं प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळे असू शकतात. PCOS चे मुख्य लक्षण म्हणजे अनियमित मासिक पाळी. यासोबतच चेहऱ्यावर पुरळ येणे, वजन वाढणे, केस गळणे, काही महिलांमध्ये शरीराच्या इतर भागांवर केसांची अतिरिक्त वाढ होते. चिडचिडपणा वाढतो. PCOS असलेल्या महिलांना प्रजनन समस्या देखील येऊ शकतात. कारण Irregular ovulation मुळे गर्भधारणेत अडथळा येऊ शकतो. (Health News)
शिवाय कधी कधी काही महिलांमध्ये PCOS metabollism वर अर्थात आपल्या चयापचय क्रियेवर देखील परिणाम होतात, ज्यामुळे insulin resistance, टाईप 2 मधुमेह आणि हृदय आणि रक्त वाहिन्यांच्या संबंधीचे आजार होण्याचा धोका वाढतो. तसेच काही महिलांना अनेकदा पोट फुगण्याची तक्रार देखील असते. मात्र ही सर्व लक्षणं PCOS चीच असतात असे नाही. यापैकी अनेक लक्षणे इतर रोगांशी देखील संबंधित असू शकतात.
PCOS होण्याची कारणे कोणती?
काही महिलांमध्ये PCOS ची समस्या अनुवांशिक देखील दिसून येते. त्यामुळे जर एखाद्या घरामध्ये कोणाला PCOS असेल तर इतर महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण त्यांना देखील हा आजार होण्याची शक्यता असते. पीसीओएसची समस्या मधुमेहाने त्रस्त असलेल्या महिलांमध्येही दिसून येते.
=====================
हे देखील वाचा : America : श्रीमंतांचा अमेरिकेला धोका !
Maha Kumbha : हर हर महादेवच्या जयघोषात महाकुंभाचा प्रारंभ !
=====================
वजन आणि PCOS एकमेकांशी जोडलेले आहेत. जास्त वजन किंवा लठ्ठपणा किंवा शरीरात अचानक सूज येण्यामुळे देखील PCOS ची समस्या उद्भवू शकते. तसेच पीसीओएसच्या समस्येनंतर वजन वाढू शकते. एखाद्या महिलेच्या शरीरात एन्ड्रोजन मोठ्या प्रमाणात तयार होते, तेव्हा तिला PCOS ची समस्या उद्भवू शकते. याशिवाय बैठी जीवनशैली, अयोग्य आहार, मानसिक आणि शारीरिक ताण, व्यायामाचा अभाव, रात्री जागणे सुद्धा कारणीभूत ठरतात.
PCOS आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची?
PCOS हा आजार होऊ नये म्हणून महिलांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे. नियमित हार्मोनल तपासणी देखील करावी. सोबतच पौष्टिक अन्नाचे सेवन करावे. योग्य नियमित व्यायाम आणि योगासने करावी. जंक आणि बाहेर अन्न खाणे टाळावे. रात्रीचे जागरण देखील टाळावे.