महाकुंभ 2025 चालू असून प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी करोडो भाविकांची गर्दी झाली आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य रुपात वाहणा-या सरस्वती नदीच्या या संगमात स्नान करण्यासाठी महाकुंभच्या 45 दिवसात असाच जनसागर येणार आहे. हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये या स्नानाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या तिनही नद्यांना देवीचे रुप मानण्यात येते. त्यातील गंगा नदीतर प्रत्यक्ष भगवान शंकराच्या जटांमधून पृथ्वीतलावर आल्याचे सांगण्यात आले आहे. पौराणिक कथेनुसार, गंगा नदी पूर्वी स्वर्गात होती. राजा भगीरथ यांनी कठोर तपश्चर्या करून गंगा पृथ्वीवर आणले. (Mahakhumbh 2025)
गंगा नदीच्या जन्माबद्दल आणि पृथ्वीवर तिच्या आगमनाबद्दल अनेक कथा सांगण्यात आल्या आहेत. तशाच कथा गंगा नदी कथी लुप्त होणार याबद्दलही आहेत. आता प्रयागराजमध्ये महाकुंभ चालू असतांना पुन्हा अशा कथा नव्यानं सांगू लागल्या आहेत. यात कलियुगामध्ये गंगा नदी ही पृथ्वीवरुन स्वर्गात परत जाणार असल्याचा उल्लेख आहे. गंगा नदी ही भारताची ओळख आहे. या नदीला देवी म्हणून पुजण्यात येते. मात्र ही नदीच जर लुप्त झाली तर अर्थातच हा विचारही करण्यात येत नाही. महाकुंभ 2025 सुरु झाल्यापासून त्यासंदर्भात अनेक कथा सोशल मिडियामधून व्हायरल होत आहेत. तशीच एक कथा गंगा नदीसंदर्भात सांगितली जात आहे. यानुसार कलयुगाची सुरुवात होईल, तेव्हा गंगा नदी ही पृथ्वीवरुन लुप्त होणार आहे. गंगा नदी ही भारताची जीवनदायीनदी आहे. (Social News)
तिच्या काठी हजारो तिर्थस्थळे असून करोडे भारतीयांची भूक आणि तहान या नदीमुळे भागवली जात आहे. या नदीचे आगमन पृथ्वीवर राजा भगीरथाच्या कठोर तपश्चर्येतून झाल्याची कथा सांगण्यात येते. अन्य एका कथेनुसार, भगवान विष्णूने वामनाच्या रूपात आपले पाय आकाशाकडे उंचावले. मग ब्रह्मदेवाने त्याचे पाय धुतले आणि त्याच्या पाण्याच्या भांड्यात पाणी भरले. या पाण्यापासून गंगा नदीचा जन्म झाला, असेही सांगण्यात येते. अशात गंगा नदीच्या प्रवाहाचा वेग हा प्रचंड होता. तेव्हा भगवान शंकरानी आपल्या जटांमधून नदीला वाहण्यास सांगितले आणि गंगा नदीचा प्रवाह हा संथ झाला. या सर्व कथा गंगा नदीच्या उगम कसा झाला, यासाठी सांगण्यात येत असल्या तरी गंगा नदी पृथ्वीवरुन पुन्हा स्वर्गात जाण्याच्या काही कथाही आहेत. आता त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी करोडो भाविकांचा जनसागर प्रयागराज महाकुंभमध्ये असतांना याबाबत कथा पुन्हा सांगण्यात येत आहेत. (Mahakhumbh 2025)
त्यानुसार जेव्हा गंगा नदी पृथ्वीवर आली तेव्हात ती परत केव्हा स्वर्गात जाणार हेही सांगण्यात आले आहे. देवी भागवत पुराणामध्ये गंगा नदी स्वर्गात पुन्हा कधी जाणार याचे वर्णन आहे. यामध्ये भगवान विष्णूने नारद मुनींना सांगितले की, कलियुग सुरु झाल्यावर 5000 वर्षांनंतर जेव्हा पृथ्वीवर पाप आणि पाप खूप वाढेल, तेव्हा धर्माचा ऱ्हास होईल. या काळात माणसाची अंतःकरणे लोभ, लोभ आणि वासनेने भरलेली असतील. गंगा नदीत स्नान केल्यावरही पुण्य मिळणार नाही. अशा परिस्थितीत, गंगा माता पृथ्वीवर क्रोधित होईल आणि स्वर्गात परत जाईल. देवी भागवत पुराणामध्ये असलेल्या या गंगा नदीबाबतच्या उल्लेखाचा आता गंगोत्री हिमनदीवर होत असलेल्या ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध जोडण्यात येत आहे. गंगा नदीचा उगम हा गंगोत्री हिमनदीपासून होतो. हा भाग टोक गोमुख हिमनदी म्हणून ओळखला जातो. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका या भागालाही बसला आहे. ही हिमनदी हळूहळू वितळत आहे आणि आकुंचन पावत आहे. याबाबत भारतातील आणि परदेशातील अनेक वैज्ञानिक संशोधन करीत आहेत. (Social News)
=====================
हे देखील वाचा : Maha Kumbh : महाकुंभ पाहून भारावले परदेशी भाविक !
Maha Kumbha : हर हर महादेवच्या जयघोषात महाकुंभाचा प्रारंभ !
=====================
यातील काही वैज्ञानिक या परिस्थितीला वैज्ञानिक धोक्याची घंटा समजतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, भविष्यात गंगा नदीचा प्रवाह संपुष्टात येऊ शकतो. याआधी सरस्वती आणि पद्मा या नद्याही नाहीशा झाल्या आहेत. वैज्ञानिक त्यालाही भौगोलिक बदलांचे परिणाम मानतात. तसेच बदल गंगा नदीच्या उगम स्थानात झाले तर भविष्यात गंगा नदीचा प्रवाह हा कमी होत जाऊन काही वर्षांनी गंगा नदीचे अस्तित्व पुसले जाईल, अशी त्यांना भीती आहे. गंगा नदीला भारतात देवीसारखे पुजले जाते. या नदीच्या काठावरील करोडो नागरिकांचे आयुष्य तिच्या प्रवाहावर अवलंबून आहे. गंगा नदीचा हा प्रवाहच आटला तर काय होईल, ही कल्पनाही कोणताही भारतीय करु शकत नाही. त्यामुळे गंगा नदीला वाचवण्यासाठी नदीकाठावरील प्रदूषणाला लगाम लावावा अशी मागणी करण्यात येत आहे. (Mahakhumbh 2025)
सई बने