श्रीमंत लोक देशासाठी मोठा धोका आहेत, माध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात असून त्याला जपण्याची गरज असल्याचे मत अमेरिकेचे मावळते राष्ट्रध्यक्ष जो बिडेन यांनी व्यक्त केले. आपल्या कार्यकाळाच्या या शेवटच्या भाषणात बिडेन यांनी देशातील श्रीमंतांना लक्ष केल्यामुळे नवा वाद ओढवून घेतला आहे. मात्र याच भाषणात त्यांनी भारतासोबतचे आपले संबंध चांगले झाले असून यातून दोन्हीही देशांचा फायदा होत असल्याचे सांगितले. बिडेन यांच्या या भाषणावर आता वाद सुरु झाले आहेत. देशातील श्रीमंत व्यक्तींवर त्यांनी अप्रत्यक्षरित्या टिका करत, त्यांचा हस्तक्षेप हा सरकारी कामकाजात वाढत असल्याची खंत व्यक्त केली. त्यांच्यामुळेच माध्यमांचेही स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे सांगितले. बिडेन यांचा हा रोख एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांच्याकडे आहे. त्यामुळे बिडेन यांच्या या वक्त्यव्यावर मस्क काय उत्तर देणार आहेत, याकडे लक्ष लागले आहे. (America)
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा कार्यकाळ संपण्यासाठी अगदी काही दिवसांचा अवघी राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचे कार्यक्रम होत आहेत. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे, त्यांनी व्हाईट हाऊसमधून अमेरिकेतील जनतेला शेवटचे संबोधन केले. या शेवटच्या भाषणातूनही बिडेन यांनी त्यांच्यावरील टिकाकारांना अनेक मुद्दे दिले आहेत. कारण त्यांनी थेट अमेरिकन समाजात अतिश्रीमंत लोकांचा वाढता हस्तक्षेप देशासाठी धोकादायक असल्याचे सांगितले. बिडेन यांच्या मते मूठभर श्रीमंत लोकांच्या हातात सत्तेचे केंद्रीकरण होत आहे. ही गोष्ट देशाच्या लोकशाहीला घातक ठरु शकते. यामुळे सामान्य लोकांच्या मूलभूत हक्कांनाही धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय अशा मूठभर शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांच्या तावडीतून देश लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेचे असून याशिवाय अमेरिकेतील प्रत्येकाला योग्य संधी मिळू शकणार नाही. अमेरिकन नागरिक कठोर परिश्रम करतील, यातूनच तुम्हाला या श्रीमंत माणसांच्या तावडीतून सुटका मिळेल. असेही बिडेन यांनी सांगितले. याशिवाय बिडेन यांनी माध्यम स्वातंत्र्यावरही आपले मत व्यक्त केले. बिडेन म्हणाले की, आज एक मोठी समस्या म्हणजे प्रेसवर प्रचंड दबाव आहे. (International News)
स्वतंत्र माध्यमे नाहीशी होत असून देशासाठी मत व्यक्त करणारे संपादकही नाहीसे होत आहेत. हे चुकीचे नाही. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्याप्रमाणे अमेरिकेची कल्पना ही केवळ एका व्यक्तीची निर्मिती नाही तर जगभरातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोकांनी ती जोपासली असल्याचे मत व्यक्त केले. अमेरिकन असणे म्हणजे लोकशाहीचा आदर करणे आहे. आपल्या निरोपाच्या भाषणात बिडेन यांनी व्यक्त केलेल्या या मतांवर आता अमेरिकेत चर्चा सुरु झाली आहे. गेल्या चार वर्षापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या बिडेन यांना आत्ताच माध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात असल्याचे दिसले का, असा उलटा प्रश्न विचारण्यात येत आहे. अमेरिकेचे भावी अध्यक्ष ट्रम्प आणि बिडेन यांच्या मतांमध्ये प्रचंड तफावत आहे. ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट हा नारा दिला आहे. मात्र ट्रम्प यांनी आपल्या शेवटच्या भाषणातून याच ट्रम्प यांच्या भूमिकेवर टिका केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवाय एलॉन मस्क यांच ट्रम्प सरकारवर असलेल्या प्रभावही त्यांना खटकल्याचे मत व्यक्त होत आहे. एलॉन मस्क यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे व्हाईट हाऊसमधील अनेक कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. (America)
=====================
हे देखील वाचा : Saudi Arabia : तेलाचे साठे संपल्यावर मग देशाचे काय ?
Maha Kumbha : हर हर महादेवच्या जयघोषात महाकुंभाचा प्रारंभ !
=====================
हे कर्मचारी बिडेन आणि माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या मर्जीतील असल्याची माहिती आहे. त्यांना नाहक भरती केल्याचे मस्क यांचे म्हणणे असून यापैकी अनेकांना व्हाईट हाऊस सोडण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. ट्रम्प यांनी प्रत्यक्ष राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर अन्य कर्मचा-यांनाही कमी करण्यात येणार आहे. याबाबत बिडेन आणि ट्रम्प यांच्यामध्ये अनेकवेळा वाद झाले आहेत. मात्र ट्रम्प यांनी मस्क यांना यासाठी पाठिंबा दिल्यानं त्याची कसर बिडेन यांनी आपल्या शेवटच्या भाषणात टिका करुन भरुन काढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अर्थात या शेवटच्या भाषणात बिडेन यांनी भारताबद्दल मैत्रीच्या नात्यानं अमेरिकेचा फायदा झाल्याचे सांगितले. बिडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या भेटीचाही उल्लेख करत भारत अमेरिका संवाद हा प्रगतीपथावर नेणारा असल्याचे सांगितले आहे. (International News)
सई बने