सध्या जगभरात कोणत्या ना कोणत्या जंगलाला भीषण आग (huge forest fire) लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. २०१९ साली ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या बुशफायरमध्ये तर लाखो एकरचं नुकसान झाल. ३३ जणांचा मृत्यू झाला, तर जवळपास 3 अब्ज..हो ३ अब्ज प्राण्यांचा जीव गेला. काही जणांनी या आगीला नैसर्गिक म्हटलं, तर काहींनी ही आग जाणीवपूर्वक लावली गेली अस म्हटलं. त्यातच आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस अँजेलेस (Los Angeles) येथील जंगलांना प्रचंड वणवा लागला असून ही आग आतापर्यंत १७ एकर परिसरात पोहोचली आहे. यामध्ये १० जणांचा जीव गेला. हॉलिवूड स्टूडियो खाक झाले. सहा जंगल आगीमुळे नष्ट झाले आहेत आणि कोट्यवधी डॉलर्सची हानी अमेरिकन सरकारला झाली आहे. हानी जरी वगळली तरी या अशा प्रकारचा वणवा नेमका लागतो तरी कसा आणि वातावरणावर याचा काय परिणाम होत आहे… ग्लोबल वार्मिंगचा धोका वाढत आहे का ? अशा सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ. (America Fire)
सुरुवातच धक्कादायक गोष्टीपासून करूया, ती म्हणजे २०२४ हे वर्ष इतिहासातलं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. आजपर्यंत इतकी उष्णता कधीही रेकॉर्ड केली गेली नव्हती. त्यामुळे आगीचा प्रश्न तर आहेच पण दुसरीकडे ग्लोबल वार्मिंगचं वादळसुद्धा पृथ्वीवर घोंघावतंय. या उष्णतेची नोंद युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या माध्यमातून होते असते. आता जाणून घेऊया की, अमेरिकेतली ही आग लागली कशी ? 7 जानेवारीपासून लॉस एंजेलेसमधल्या पॅसिफीक पॅलिसेड्स इथून ही आग सुरू झाली. सुरुवातीला फक्त १० एकरमध्येच लागलेली ही आग बघता बघता ३००० एकरपर्यंत पोहोचली आणि आतापर्यंत १७ हजार एकरचा भाग आगीत जाणून खाक झाला आहे. कॅलिफोर्निया राज्याच्या इतिहासामध्ये ही आग आतापर्यंतची सर्वांत भीषण आग मानली जातेय.(America Fire)
ही आग आता कॅलिफोर्नियाच्या हॉलिवूड हिल्सपर्यंत पसरली आहे. मुंबईतलं बांद्रा जसं सेलिब्रिटी लोकांच्या बंगल्यांचं स्पॉट… तसच अमेरिकेत हॉलीवूड हिल्सला जवळपास सर्वात हॉलीवूड सेलेब्रिटी (Hollywood Celebrities) राहतात. इथे अनेक फिल्म स्टार्सची (Movie Stars) घरही या आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत आणि जाळून खाक झाली आहे. या आगीच्या बाबतीत कॅलिफोर्निया फायर सर्व्हीसचे प्रमुख डेव्हीन अकुना यांनी असं म्हटलं आहे की, “आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सर्व प्रयत्न जवळपास अपुरे पडत आहेत. हवेचा वेग पण प्रचंड वाढला आहे. ज्यामुळे ही आग सर्वत्र पसरत आहे. मुळात इथेच जंगल असल्यामुळे सर्वांनाच त्याचा धोका आहे. या आगीमध्ये बिली क्रिस्टल आणि पॅरिस हिल्टन या सेलिब्रिटींचीही घरं जळाली आहेत.(America Fire)
नुकतेच डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले. मात्र जो बायडन यांचा कार्यकाळ अजूनही संपला नसल्यामुळे तेच या आगीच्या घटनेची शहानिशा करत आहेत. बायडन यांनी म्हटलं की, “ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. यासाठी थोडा वेळ लागेल. पण आम्ही ही समस्या लवकरच दूर करू. आपले फायर फायटरदेखील जोमाने काम करत आहेत. फायर ब्रीगेडलाही आता पाणीटंचाईची समस्या भेडसावतेय. त्यामुळे आम्ही लोकांना पाणी वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
================
हे देखील वाचा : HMPV : चीनपाठोपाठ अमेरिका आणि इंग्लडच्या रुग्णालयेही हाऊसफुल…
===============
आता ही आग नेमकी लागली कशी ते जाणून घेऊया. याचे दोन मुख्य कारण काही तज्ञांनी सांगितले आहेत. एक म्हणजे याठिकाणी जोरदार वाहणारी हवा आणि दुसरा म्हणजे पावसाचा अभाव… या दोन कारणांमुळे दक्षिण कॅलिफोर्निया आगीच्या विळख्यात सापडलं आहे. मुळात गेल्या १० वर्षांपासून कॅलिफोर्निया दुष्काळ झेलत आहे. मात्र, याव्यतिरिक्त या आगीच्या घटना क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वार्मिंगमुळेही घडत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलियाच्या आगीमुळे पृथ्वीच्या वातावरणावर खूप मोठा impact पडला होता. या आगीतून 400 मेगाटन कार्बन डायओक्साइडची निर्मिती झाली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या आग पृथ्वीच्या वातावरणासाठी प्रचंड हानिकारक ठरत आहेत.(Marathi Info)
वरती सांगितल्याप्रमाणे २०२४ हे सर्वात हॉटेस्ट वर्ष ठरलं. याचं कारण नव्याने सांगायची गरज नाही. २०१५ साली झालेल्या पॅरिस करारानुसार जगाचं तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानापेक्षा 2 अंशांपेक्षा खाली ठेवायचं आणि ही वाढ 1.5 अंशांवर जाऊ द्यायची नाही, असं १९४ देशांनी एकत्र येऊन ठरवलं होतं. पण तरीही 1.5 अंशांची ती मर्यादा आता पहिल्यांदा मोडली गेली आहे. आणि याचा परिणाम म्हणजे लॉस अँजेलेसची ही भीषण आग… त्यामुळे पृथ्वीचं, मनुष्याचं रक्षण करण्यात मनुष्यच असमर्थ ठरत आहेत का? हा सर्वात मोठा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.