भारतात अनेक मंदिरं आहेत, आणि प्रत्येक मंदिराचा इतिहास, महत्व आणि वैशिष्ट्य अतिशय खास, वैविध्यपूर्ण आहेत. आपण जर दक्षिण भारतामध्ये गेलो तर इथले मंदिरं, त्यांच्या रचना, भव्यता पाहून आपले डोळे दिपून जातील. या दक्षिण भारतमध्ये अशी अनेक मंदिरं आहेत, ज्यांना मोठा इतिहास आणि महत्व आहे. (Indias Temple)
संपूर्ण भारतामध्ये चर्चा होणारे आणि गाजणारे अनेक मंदिरं या भागात आपल्याला पाहायला मिळतील. यासोबतच इथे असे देखील मंदिरं आहेत ज्यांची खासियत पाहून केवळ सामान्य मनीसच नाही तर मोठमोठे वैज्ञानिक देखील चक्रवतात. याच दक्षिण भारतात भगवान शंकराचे असे एक मंदिरं आहे, ज्याच्या खासियतबद्दल ऐकाल तर तोंडात बोटं घालाल. (Yaganti Temple)
भगवान शंकराची भारतात अगणित मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिर हे वेगळे आहे. अनेकांची विशेषतः शंकराच्या पिंडीमध्ये किंवा मूर्तीमुळे असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला भगवान शंकराच्या अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत, ज्या मंदिराची खास बाब ही शंकरचे वाहन नंदी हे आहे.
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यात असलेल्या कुरनूल जिल्ह्यात श्री यंगती उमा महेश्वर (Yaganti Uma Maheshwar Temple) नावाचे एक अनोखे मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. भारतातील शिव शंकराच्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध मंदिरापैकी एक मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार हे मंदिर अगस्त्य ऋषींनी बांधले असल्याचे सांगितले जाते. यामागे देखील एक कथा सांगितली जाते.
एका मान्यतेनुसार, अगस्त्य ऋषींना या ठिकाणी वेंकटेश भगवानांचे मंदिर स्थापन करण्याची इच्छा होती. मात्र, बांधकाम करताना मूर्तीचा अंगठा भंग पावला आणि हे काम थांबवण्यात आले. अगस्त्य ऋषी निराश झाले आणि त्यांनी शिवशंकराची तपस्या केली. मोठ्या तपश्चर्येनंतर भोलेनाथ प्रसन्न झाले. या ठिकाणी शिवमंदिर बांधणे योग्य ठरेल असे सांगितले. त्यानुसारच अगस्त्य ऋषींनी शिवमंदिराची उभारणी केली, अशी एक कथा सांगितली जाते. (Yaganti Temple History)
यागंती उमा महेश्वराच्या मंदिराच्या अनेक दंतकथा आहेत. हिंदू धर्मातील दोन महत्त्वाच्या ग्रह देवता राहू आणि केतू यांचा समावेश आहे. असे मानले जाते की दोन्ही देवतांनी या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली आणि त्यांना अपार शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त झाले. (Marathi News)
यागंती मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात असलेले भगवान शंकराचे वाहन नंदी. आता तुम्ही म्हणाला यात काय वैशिष्टय? प्रत्येक शंकरच्या मंदिरात नंदी असतोच. त्यात काय विशेष? हेच तर खास आहे या मंदीराचे. या मंदिरातील नंदीची मूर्ती आता पण पाहिली तर ती खूप मोठी आहे. या शिवमंदिरातील नंदीचा आकार गेली अनेक वर्षे वाढत चालला आहे. (nandi statue growing mystery)
नंदीच्या वाढत चाललेल्या आकारामुळे मंदिरातील काही खांबही हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, या मंदिरातील नंदीची मूर्ती ही पूर्वी छोट्या स्वरुपात होती. मात्र, आता तिने भव्य रुप धारण केले आहे. पुरातत्त्व खात्याने या ठिकाणी संशोधन केले असता, त्यांनाही ही गोष्ट मान्य केली आहे. पुरातत्त्व खात्यानेही बाब मान्य केली आहे. शास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक २० वर्षांनी या नंदीचा आकार एक इंचाने वाढतो. (Latest News)
================
हे देखील वाचा : George Soros : सोरोस खरचं प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमसाठी पात्र होता का ?
================
या मंदिर परिसर आपल्याला कधीच कावळे दिसत नाही. इथल्या लोकांनी देखील इथे कधी कावळे पाहिले नसल्याचे सांगितले आहे. यामागे देखील एक कथा आहे. अगस्त्य ऋषी तपश्चर्येला बसलेले असताना वारंवार कावळे येऊन त्यांना त्रस्त करीत असत. त्यामुळे अनेकदा अगस्त्य ऋषींच्या साधनेत व्यत्यय आला. शेवटी क्रोध अनावर झाल्याने अगस्त्य ऋषींनी कावळ्यांना या परिसरात कधीही न फिरकण्याचा शाप दिला. (Shiva Temple Of Andhra Pradesh)
दरम्यान मंदिराबद्दल सांगायचे झाल्यास, या मंदिराचे बांधकाम वैष्णव परंपरेनुसार केल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जाते. तसेच या मंदिराची उभारणी १५ व्या शतकात करण्यात आली आहे. विजयनगर साम्राजाचे संगमवंशीय राजा हरिहर बुक्का यांच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. हैदराबादपासून सुमारे ३०८ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. तर विजयवाडापासून याचे अंतर ३५९ कि.मी. आहे. प्राचीन काळातील पल्लव, चोला, चालुक्य आणि विजयनगर संस्कृतीचे प्रतीक म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.