समजा तुम्ही जेवण बनवायला घेतलं आहे आणि तुम्ही कारल्याची भाजी बनवत आहात. तुम्ही पूर्ण भाजी बनवता खाता. पण खाताना तुम्हाला कारल्याच्या भाजीची चव कडू न लागता पाव भाजी, पिझ्झा, पास्ता बर्गर यांच्या पेक्षा भारी लागते आहे. आता याच तुम्हाला सुद्धा आश्चर्य होईलच ना की, बनवली होती कारल्याची भाजी मग त्याची चव इतकी वेगळी कशी लागते आहे आणि तीसुद्धा चांगली. अशीच गोष्ट घडली आणि जन्म झाला एका गोळीचा. ज्या गोळीमुळे आज अनेक पुरुष खुश आहेत. या गोळीमुळे त्यांची sexual लाइफ मस्त सुरू आहे. ती गोळी म्हणजे ‘वायग्रा’ आता sexual power वाढवण्यासाठी या गोळीचा वापर केला जातो. पण ही गोळी या साठी बनवलीच नव्हती. बनवायला केले एक आणि झालं एक अशी या गोळीची निर्मिती झालीये. काय कथा आहे वायग्रा गोळीच्या निर्मितीची जाणून घ्या ! (Viagra)
९० च्या दशकात वेगवेगळे शोध लागले, जग वेगाने बदलत होतं. तसंच मेडिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रोगांवर, आजारांवर औषध शोधले आणि तयार केले जात होते. याचवेळी एका आजाराचं संक्रमण होत होतं. हा आजार झालेल्या लोकांच्या छातीत असहनीय वेदना आणि त्रास व्हायचा. angina pectoris असं या आजाराच नाव. त्यावेळी फाइज़र नावाची फार्मा कंपनी या आजारावर उपाय शोधण्यासाठी एक नवं औषध सिल्डेनाफिलवर प्रयोग करत होती. या औषधाकडून त्यांना एक्सपेक्टेड रिजल्ट असा होता की, या गोळीमुळे छातीपर्यंत रक्त प्रवाह वाढेल आणि त्यामुळे हृदयविकार आणि angina pectoris या आजारांचा त्रास कमी होईल. (Health Tip)
औषध तयार झालं की ते डायरेक्ट मार्केटमध्ये उतरवता येतं नाही. त्याची अनेकदा चाचणी करावी लागते. फाइज़र कंपनीने या औषधाच्या प्राथमिक चाचण्या या इंग्लंडमधील मॉरिस्टन हॉस्पिटलमध्ये केल्या. या चाचणीचे प्रमुख होते Ian Osterloh. त्यांनी अनेक चाचण्या केल्या पण या चाचणीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. त्या उलट या चाचणीचा निकाल असा लागला ज्याची अपेक्षा ना Ian Osterloh करत होते, ना फाइज़र कंपनी. (Viagra)
हे औषध शरीरातील रक्तप्रवाह वाढवत होतं, पण फक्त शरीराच्या खालच्या भागात. हे औषध घेतल्यावर पुरूषाच्या शरीरात उत्तेजना निर्माण होत होती. सुरवातीला प्रयोग फसला असं फाइज़र कंपनीच्या रीसर्च टीमला वाटलं. पण हा अनेक पुरुषांसाठी युरेका मोमेंट होता. अशा परिणामांनंतर, संशोधकांनी हृदयाच्या आजारांसाठी सुरू असलेल्या ट्रायल्सला थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या औषधाला एक वेगळी दिशा दिली. असं म्हणण्यापेक्षा या औषधानेच या टीमला एक वेगळी दिशा दिली. angina pectoris या आजारासाठी बनवण्यात आलेल्या औषधाला पुरुषांचा लैंगिक समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात आलं. या औषधामुळे पुरुषांच्या सेक्सुअल हेल्थमध्ये अक्षरश: क्रांती घडवली आणि अनेक पुरुषांच जीवन बदललं. (Health Tip)
पण पहिले म्हंटल्याप्रमाणे औषध बनवून ते डायरेक्ट मार्केटमध्ये आणता येत नाही त्यासाठी चाचण्या आणि फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) कडून मंजूरी मिळवावी लागते. या मंजूरी साठी फाइज़र कंपनीने अर्ज खल केला आणि अखेर 27 मार्च 1998 रोजी FDA ने वायग्राच्या वापराला मंजूरी दिली. नंतर मार्केटमध्ये वायग्राने धुमाकूळच घातला. वायग्राची लोकप्रियता इतकी वाढली की, ही गोळी अनेक देशांमध्ये ब्लॅकने विकली जाऊ लागली. मार्केटमध्ये आल्यानंतर पहिल्या आठवड्यातच अमेरिकेत डॉक्टरांकडून 1.5 लाख प्रिस्क्रिप्शनमध्ये या गोळीला suggest केलं गेलं. आजही ही गोळी जगभरातील पुरुषांची पहिली पसंती आहे. (Viagra)
================
हे देखील वाचा :
HMPV व्हायरस भारतात पोहोचला, कोविडसारखी परिस्थिती होणार ?
Google Map : बायको सोबत भांडण झालं आणि त्याने गूगल मॅप तयार केलं!
==================
आता एका शोधनात असं कळालं आहे की वायग्रा केवळ लैंगिक समस्याच नाही, तर अल्झायमर सारख्या मानसिक आजाराच्या उपचारासाठीही वायग्रा उपयुक्त ठरू शकते. पण यावर अजून संशोधन सुरू आहे. (Health Tip)