आपले शरीर हे खूपच चांगले आणि लाभदायक आहे. आपल्या शरीरातील आपल्या टाकाऊ वाटणारी गोष्ट देखील खूपच उपयुक्त आणि लाभदायक असते. आपण अनेकदा ऐकले असेल की, आपली लाळ आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यातही जर लाळ शिळी असेल तर अधिक लाभदायक आहे. आपल्या लाळेचे कसे आणि किती फायदे आहेत हे आपल्या जुन्या आणि अतिशय महत्वाच्या अशा आयुर्वेदात सांगितले आहे. आयुर्वेदामध्ये लाळेला खूपच महत्व दिले आहे.
तोंडाची आणि दाताची स्वच्छता करणारी लाळ ही अन्नपचनाच्या कामामध्ये देखील मदत करते. मात्र ही बहुगुणी लाळ आपल्या शरीरातील दुर्लक्षित घटक आहे. लाळेचे कार्य बंद झाले किंवा थंडावले की अनेक आजार होतात. लाळेमध्ये अनेक बॅक्टेरिया, अँटीबॉडीज आणि एंजाइम असतात जे आरोग्य निरोगी ठेवतात. नक्की या लाळेचे फायदे कोणते ते जाणून घेऊया.
सकाळची शिळी लाळ त्वचेच्या अनेक समस्यांवर फायदेशीर आहे. सामान्यपणे त्वचेच्या ज्या समस्या असतात ज्यात डाग, पुरळ, फोड आणि पिंपल्स यांसारखे त्रास होतात. यामध्ये शिळी लाळ फायदेशीर आहे. मुरुमांची समस्या असल्यास शिळी लाळ चेहऱ्यावर लावल्याने ही समस्या दूर होते. फोड किंवा जखमा बरे झाल्यानंतर जे डाग राहतात ते दूर करण्यासाठीही सकाळची लाळ खूप उपयुक्त आहे. कापलेले किंवा चिरलेले असल्यास किंवा जखम झाली असल्यास त्यावर सकाळची शिळी लाळ लावावी.
पोटाच्या समस्यांमध्ये आराम
पोटाशी संबंधित समस्या, जसे की वारंवार पोटदुखी, पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लाळ खूप उपयुक्त आहे. सकाळी उठल्यावर रोज एक ग्लास पाणी प्यायल्याने लाळेमध्ये असलेले एंजाइम पोटात जातात आणि पचनाच्या समस्या दूर होतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर
जर डोळ्यांखाली काळे डाग पडले असतील किंवा दृष्टी कमी झाली असेल तर सकाळी शिळी लाळ काजळासारखी डोळ्यात लावणे उपयोगी ठरते. डोळ्यांच्या सभोवताली ही लाळ चोळल्याने डार्क सर्कल्स दूर होतील. डोळ्यांखालील काळे डाग दूर करण्यासाठी हा सोपा आणि लाभदायक उपाय आहे.
तोंडाचे आरोग्य सुधारते
लाळ अन्नाची चव जाणून घेण्यास मदत करत नाही तर तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यास देखील मदत करते. लाळेमध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि पोटॅशियम हे घेत असतात जे दातांसाठी संरक्षणात्मक कवच बनवतात. यामुळे दात किडणे थांबते आणि संक्रमण दूर राहते. यामुळे हिरड्याही मजबूत होतात. लाळेमुळे श्वासाची दुर्गंधीही येत नाही. लाळ अन्नाचे कण आणि खराब बॅक्टेरिया काढून टाकते.