श्रीरामांच्या अयोध्येत एका खास विवाहसोहळ्यासाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत. हा विवाहसोहळा आहे, प्रभू श्रीराम आणि माता जानकी यांचा. प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या लग्नाच्या तिथीला विवाह पंचमी म्हणतात. ही विवाहपंचमी येत्या 6 डिसेंबर रोजी असून त्यासाठी अयोध्येमध्ये आत्तापासून विविह विधी सुरु झाले आहेत. अयोध्येत राम विवाहाचे आयोजन भव्य पद्धतीने केले जाते. राम मंदिरात रामलल्लांचा अभिषेक झाल्यानंतर प्रथमच राम विवाह उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे यंदा 6 डिसेंबर रोजी होणारा विवाह पंचमीचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. हा सोहळा बघण्यासाठी अयोध्यानगरीमध्ये लाखो भाविका दाखल झाले आहेत. अयोध्येत विवाह पंचमीला मोठे महत्त्व आहे. दरवर्षी विवाह पंचमी हा सण मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला अशी मान्यता आहे. (Janakpur)
प्रभू राम आणि माता सीता यांच्या विवाह सोहळ्याची तयारी अयोध्येत उत्साहात सुरू आहे. हा विवाह ज्या तारखेला होतो तिला विवाह पंचमी असेही म्हणतात. हा पौराणिक धार्मिक इतिहास लक्षात घेऊन दरवर्षी या तिथीला प्रभू राम आणि माता सीता यांचा विवाहसोहळा आयोजित केला जातो. यासाठी अयोध्येतील रस्त्यांपासून ते गल्ल्यापर्यंत प्रभू रामाच्या लग्नाची गीते गायली जात आहेत. पुढच्यावर्षी प्रभू श्रीरामांच्या मंदिराला वर्ष पूर्ण होत असल्याने या सोहळ्याला अधिक उत्साह आला आहे. हा विवाह सोहळा विवाह पंचमीच्या दिवशी अयोध्येतील जवळपास हजारो मठ मंदिरांमध्ये साजरा होणार आहे. अर्थात अयोध्येत काही मंदिरे प्रभू श्रीरामांची म्हणून जशी ओळखली जातात, तशी काही मंदिरे ही माता सीता यांच्या नावानंही ओळखली जातात. या दिवशी कुठे प्रभू राम लग्नाला जातील, तर कुठे माता सीता प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाणार आहेत. यासाठी सर्वच मंदिरात श्रीराम आणि माता सीता यांच्यासाठी नवीन दागदागिन्यांची आणि वस्त्रांची खरेदी कऱण्यात आली आहे. काही ठिकाणी खास बनारसी वस्त्रांची सजावट पहायला मिळणार आहे. सोबत बनारसची शहनाई वाजवली जाणार आहे. तर काही मंदिरातील मनोरंजन कार्यक्रमात पंजाबचा भांगडाही ठेवला आहे. याशिवाय अयोध्येतील बहुतांश मठांमध्ये रामकथेचे आयोजन केले असून विवाहपूर्व विधीही सुरु आहेत. (Social News)
अयोध्येतील प्रसिद्ध रंगमहल मंदिरात गेली 300 वर्षाहून अधिक काळ हा सोहळा आयोजित केलेला आहे. या मंदिरात खास मंडप उभारण्यात आला असून येथील सिंदूर दान समारंभासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या सोहळ्यानिमित्त रामलिलाही या मंदिरात होते. अयोध्येच्या जानकी महल ट्रस्टनेही राम विवाह सोहळ्याची जोरदार तयारी केली आहे. येथे 7 डिसेंबर पर्यंत या विवाहसोहळ्यासाठी विविध कार्यक्रम करण्यात आले आहेत. महायज्ञ, रामलीला, गणेशपुजनासह या विवाहविधींना सुरुवात होईल. नंतर फुलवारी लीला, वैवाहिक गीत आणि रामलीला होणार आहे. 5 डिसेंबर रोजी हळदी, तिलक आणि मेहंदीचा सोहळा होणार आहे. 6 डिसेंबर रोजी मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. 7 डिसेंबर रोजी छप्पन भोग दर्शन सोहळा होणार आहे. 8 डिसेंबर रोजी माता सीतेला निरोप देण्यात येणार आहे. (Janakpur)
=====
हे देखील वाचा : जाणून घ्या कुंभमेळ्याचा इतिहास आणि त्याचे महत्व
========
विहुती भवन, दशरथ महल, जानकी घाट, रामजानकी मंदिर, लक्ष्मण किल्ला या मंदिरांमध्येही राम विवाहाचे भव्य समारंभ होणार आहेत. याशिवाय कनक भवन, मणिरामदास जींचे छावणी, रामवल्लभकुंज, अमावा राम मंदिर, हनुमानबाग, रामदर्शन कुंज, सियारामकिला, रासमोदकुंज या मंदिरातही प्रभू श्रीरामांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांचा विवाह सोहळा होत असतांना माता सिता यांचे माहेर म्हणून ओळखल्या जाणा-या नेपाळमधील जनकपूरमध्येही यावर्षी प्रथमच ‘विवाह पंचमी’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भगवान रामाची मिरवणूक अयोध्येहून जनकपूरकडे रवाना झाली आहे. जनकपूर शहराला नवरीसारखे सजवले जात आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास मंडप तयार आहेत. विवाहसोहळ्यातील विधींसाठी तिरुपतीहून खास चाळीस वैदिक ब्राह्म आले आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येहून खास 500 पाहूणे गेले आहेत. (Social News)
सई बने