आपल्या देशात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल कशात होत असले तर ती लग्न समारंभात. भारतात लग्नसमारंभ मोठ्या थाटात साजरी केले जातात. अगदी कपड्यांपासून ते घर, गाडीपर्यंत खरेदी या लग्न समारंभासाठी होते. पण लग्न करण्यासाठी योग्य मुहूर्त लागतात. आणि हे शुभमुहूर्त पुढच्या महिन्यापासून येत आहेत. आता पितृपक्ष संपल्यावर येणा-या नवरात्रीपासून लग्नसमारंभाच्या खरेदीची सुरुवात होणार आहे. यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल ही सोने खरेदीत होणार आहे. यंदा विवाहसोहळ्यांसाठी 12 नोव्हेंबरपासून शुभ मुहूर्त काढण्यात आले आहेत. हे शुभमुहूर्त 16 डिसेंबर पर्यंत असून या कालावधीत थोडे थोडके नाही तर काही लाखांच्या घरात लग्न होण्याची शक्यता आहे. (Indian Wedding Ceremonies)
यातून कोटींच्या घरात आर्थित उलाढाल होण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता बघूनच भारतातील बाजार आता सज्ज होऊ लागला आहे. नवरात्र, दिवाळी आणि त्यानंतर सुरु होणारे लग्नाचे मुहूर्त यामुळे भारतातील बाजारपेठा तयार होत आहेत. भारतातील लग्न समारंभात लाखोंची उलाढाल होते. यात अगदी सामान्यांपासून ते मोठ्या व्यापा-यांपर्यंत सर्वांनाच उद्योगाची संधी मिळते. हा भारतातील लग्न सोहळ्यांचे दिवस आता सुरु होणार आहेत. दिवाळीनंतर हा हंगाम सुरु होणार आहे. नोव्हेंबरमध्ये 12, 13, 17, 18, 22, 23, 25, 26, 28 आणि 29 या तारखांना लग्नाचे शुभमुहूर्त असणार आहेत. शिवाय डिसेंबर महिन्यात 4, 5, 9, 10, 11, 14, 15 आणि 16 या तारखांना शुभमुहूर्त असणार आहेत. (Social News)
या तारखांना मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ देशभरात होणार असून आता पितृपक्ष संपला की यासंदर्भातील नोंदणी सुरु होणार आहे. यासाठी पहिली नोंदणी ही लग्नाच्या हॉलची करण्यात येणार आहे. त्यानंतर नवरात्रीमध्ये सोन्याची मोठी खरेदी होईल, अशी आशा देशभरातील सुवर्ण विक्रेत्यांना आहे. देशात लवकरच सुरु होणार हा वेडिंग सीझन भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरणार आहे, असा दावा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये 48 लाख विवाह अपेक्षित आहेत. यातून 6 लाख कोटी रुपयांचा व्यापार होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी देशात 35 लाख विवाहांसह एकूण व्यवसाय 4.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता. यावर्षी त्यात आणखी भर पडणार असल्याची माहिती आहे. (Indian Wedding Ceremonies)
या वर्षातील शुभ विवाह तारखांची संख्या वाढल्याने व्यवसायात तेजी येण्याची शक्यता आहे. यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने देशातील 75 प्रमुख शहरी व्यापारी संघटना आणि विविध सेवा कर्मचारी आणि व्यावसायिक संस्था कडे झालेल्या आगावू नोंदींचा अभ्यास केला आहे. भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये खाद्यपदार्थांवर मोठा खर्च करण्यात येतो. त्यासाठी परदेशी खानसामे आणि पदार्थही मागवण्यात येतात. मात्र यावर्षी हा बहुतांश परदेशी जाणारा पैसा स्थानिक व्यवसायिकांना देण्यात येण्याची शक्यताही आहे. देशातील अनेक भागातील लोकप्रिय खाद्यपदार्थ विक्रेत्यांना या वर्षी लग्नसमारंभातून अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. (Social News)
======
हे देखील वाचा : लग्नासाठी पुरुषांचंही अपहरण होतंय !
======
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया यांनी यांनी यासाठी ज्या क्षेत्रात मागणी वाढणार आहे, त्यांची यादीच जाहीर केली आहे. यानुसार कपडे, साड्या, इतर पोशाख, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि ग्राहकोपयोगी वस्तू, सुका मेवा, मिठाई आणि नमकीन, किराणा आणि भाज्या, भेट वस्तू, बँक्वेट हॉल, हॉटेल आणि इतर लग्न स्थळे, सजावट सामान, खानपान सेवा, फुलांची सजावट, वाहतूक, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी, ऑर्केस्ट्रा आणि बँड, लाईट सेवा आणि अन्यमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 10 टक्के भर पडणार असल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने स्पष्ट केले आहे. डिसेंबर महिन्यातील मुहूर्तानंतर नव्या वर्षाच्या पहिल्या दोन आठवढ्यात लग्नाचे मुहर्त नाही आहेत. त्यानंतर 16 जानेवारी 2025 पासून लग्नाचा हंगाम सुरु होणार आहे. या सर्वांचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिली आहे. (Indian Wedding Ceremonies)
सई बने