ओयोद्धेत आज राम मंदिर साकार झाले आहे आणि लाखो राम भक्तांचं स्वप्न पूर्ण झाले आहे. हे मंदिर व्हावे म्हणून अनेकांनी लाठा काठ्या खाल्ल्या, अनेक कारसेवकांनी आपल्या प्राणांची आहुती झाली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री हे सुद्धा कारसेवेसाठी गेले होते. पर्रिकरांच्या मातोश्री राधाबाईसुद्धा कारसेवेसाठी गेल्या होत्या. अयोध्येत राधावाईंनी पोलिसांच्या लाठ्याही खाल्ल्या होत्या. An Extraordinary Life या पर्रिकरांच्या चरित्रात लेखक सद्गुरु पाटील आणि मायाभुषण नागवेणकर यांनी हा किस्सा सांगितला आहे. पर्रिकर गोव्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. आधी संघात असलेल्या पर्रिकरांनी भाजपचे काम सुरू केले होते. (Ram Mandir)
अयोध्येत बाबरी मशीद आणि राम मंदिराचा मुद्दा तापत होता. संपूर्ण देशात यावरून राजकारण तापलं होतं. गोव्यातही पर्रिकरांनी गणेश मंदिराचा मुद्दा तापवला होता. मापुशामध्ये एका रहिवासी भागात काही लोक दरवर्षी गणेश चतुर्थी साजरा करायचे. भक्त वाढत गेले आणि तिथे एका पत्र्याच्या शेडखाली लोकांनी गणपतीचा फोटा लावला आणि दररोज आरती सुरू केली. इथे एक गणपती मंदिर असावे असे काही भक्तांनी सुचवले. पण तेव्हा तिथल्याच काही लोकांनी या गोष्टीला विरोध केला. यावरून वाद झाला. तेव्हा मनोहर पर्रिकारांनी ३०० भाजपच्या कार्यकर्त्यांसह ठिकाण गाठलं आणि जोरदार भाषणही केलं. पोलिस तिथे आले आणि त्यांनी लाठीचार्ज केला अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी सोडल्यानंतर पर्रिकर कार्यकर्त्यांसह परत तिथे आले आणि त्यांनी महाआरती केली. या घटनेमुळे पर्रिकर अनेकांच्या लक्षात राहिले. (Ram Mandir)
======
हे देखील वाचा : चमत्कारी नागवासुकी मंदिर
======
९० च्या दशकात पर्रिकर ३५० कार्यकर्त्यांसह अयोध्येत गेले. तेव्हा पर्रिकरांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मातोश्री राधाबाईही कारसेवेसाठी गेल्या होत्या. अयोध्या स्टेशनवर अनेक कारसवेक आराम करत होते. पर्रिकरांच्या मातोश्रीही स्टेशनवरच झोपल्या होत्या. तेव्हा पोलिस तिथे आले आणि गर्दी पांगवण्यासाठी त्यांनी लाठीचार्ज केला. राधाबाई यांनाही पायाला जोरात लाठी लागली आणि त्यांचा पाय सुजला होता. अयोध्या स्टेशनवर पर्रिकर आणि त्यांच्या आईची ताटातूट झाली. अर्ध्या तासानंतर पर्रिकर आणि त्यांच्या आईची भेट झाली. पुढे पर्रिकर आणि त्यांच्या मातोश्री गोव्यात परत आल्या. उपचार घेतल्यानंतर राधाबाईंची जखम बरी झाली. जेव्हा जेव्हा विषय निघायचा तेव्हा तेव्हा राधाबाई आपल्या पायावरच्या व्रण दाखवायच्या. राम मंदिरावेळी ही दुखापत झाली होती ते आठवणीने सांगायच्या. (Ram Mandir)