Home » जेवल्यानंतर लगेच भूक लागते? नियंत्रण मिळण्यासाठी वाचा खास टिप्स

जेवल्यानंतर लगेच भूक लागते? नियंत्रण मिळण्यासाठी वाचा खास टिप्स

बहुतांशजणांना जेवल्यानंतर लगेच भूक लागते. खरंतर, हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. आरोग्य तज्ज्ञ यामागील काही कारणे सांगतात. पण जेवल्यानंतर लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण कसे मिळवायचे याबद्दलच्या खास टिप्स जाणून घेऊया...

by Team Gajawaja
0 comment
Avoid this mistakes after dinner
Share

Health Care Tips : ओव्हर इटिंगच्या कारणास्तव आपले वजन वाढले जातेच. याशिवाय आरोग्यासंबंधित काही समस्या मागे लागू शकतात. काहीजण असे मानतात की, पोटात किडे झाल्याने जेवल्यानंतर भूक लागते. यामागे काही कारणे असू शकता. आरोग्य तज्ज्ञ असे मानतात की, तुम्ही डाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यास सातत्याने भूक लागू शकते. याशिवाय तणावामुळेही भूक लागू शकते. अशातच माइंडफुल इटिंगच्या टिप्स फॉलो करण्यासाठी पुढील ट्रिक लक्षात ठेवा.

स्वत:ला हाइड्रेट ठेवा
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कमी पाणी प्यायल्याने भूक लागू शकते. याशिवाय शरिरात पाण्याची कमरता निर्माण झाल्यास डिहाइड्रेशनची समस्या उद्भवू शकते. यामुळे दररोज कमीत कमी तीन लीटर पाणी प्या. यामुळे शरिरातील टॉक्सिंस बाहेर पडण्यास मदत होते.

फायबर आणि प्रोटीनचे सेवन
वारंवार भूक लागणे हे शरिरात पोषण तत्त्वांची कमतरता असल्याचे कारण असू शकते. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन आणि फायबरसारख्या पदार्थांचे सेवन करत नसाल तर उगाचच भूक लागू शकते. फायबर आणि प्रोटीनचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होऊ शकते.

जेवण करणे टाळू नका
सध्याच्या व्यस्त लाइफस्टाइलमध्ये बहुतांशजण जेवण करणे टाळतात. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय जेवणामध्ये खूप गॅप असल्यास भूक अधिक वाढू शकते.

हर्बल टी
हर्बल टी चा डाएटमध्ये समावेश करा. मीलनंतर एका तासांनी ग्रीन टी चे सेवन करू शकता. वारंवार भूक देखील लागत नाही. ग्रीन टी चे सेवन केल्याने अधिक अॅक्टिव्ह वाटते.


आणखी वाचा :
डिप्रेशनमध्ये जाण्याआधी दिसून येतात ही 6 लक्षणे
जाणून घ्या हिरव्या मुगाचे आरोग्यदायी फायदे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.