Relationship Advice : नात्यात प्रेमासह लहान-मोठे वाद होत राहतात. पण पार्टनरची समजूत काढणे काहीजणांसाठी मोठा टास्क असतो. यावेळी पार्टनरला कसे मनवायचे असा प्रश्न पडतो. प्रत्येकजण वेगवेगळे मार्ग आणि ट्रिक शोधून पार्टनरचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण पार्टनरचा राग शांत करताना एखादी चूक केली तर वाद वाढलाही जाऊ शकतो. यामुळे पार्टनरचा राग 5 मिनिटांत शांत होण्यासाठी पुढील काही ट्रिक्स वापरु शकता.
पार्टनरचे ऐका
पार्टनरचा मूड बिघलेला असेल किंवा रागात असेल तेव्हा सर्वप्रथम त्याचे ऐकून घ्या. अशा स्थितीत काही बोलण्याआधी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, त्याच्या भावना समजून घ्या. यावेळी पार्टनरला दाखवून द्या तुम्ही त्याची खरंच काळजी करता.
पार्टनरची समस्या शांतपणे सोडवा
पार्टरनची समस्या सोडवताना डोक शांत ठेव. पार्टनरवर आरोप-प्रत्यारोप करणे टाळा. यामुळे नात्यातील वाद वाढला जाऊ शकतो. शांतपणे आणि समजूतदारपणाने पार्टनरचे म्हणणे ऐकून घेत त्याची समजण्याचा प्रयत्न करा. घाईघाईत कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळा.
एकत्रित वेळ घालवा
पार्टनरचा राग शांत करण्यासाठी त्याच्यासोबत एकत्रित वेळ घालवा. त्याच्या आवडीचे कार्यक्रम अथवा एखाथी रेसिपी तयार करा. जेणेकरुन पार्टनरचा मूड ठिक होण्यास मदत होईल. (Relationship Advice)
पार्टनरला कधी-कधी गिफ्टही द्या
पार्टनरला आनंदित ठेवायचे असल्यास त्याच्या भावना समजून घेत कधी-कधी गिफ्टही द्या. पार्टनरला तुमच्या मनात त्याच्याबद्दल नक्की काय भावना आहेत हे मोकळेपणाने बोला. याशिवाय पार्टनरच्या प्रत्येक सुख-दु:खात त्याच्यासोबत रहा.