Home » पत्नीची हौस पती थेट तुरुंगात !

पत्नीची हौस पती थेट तुरुंगात !

by Team Gajawaja
0 comment
Lord Ronald Rowland
Share

जगभरात जे ड्रग, कोकोन वापरले जात आहे त्यापैकी १८ कोकोन एकट्या ब्राझिलमध्ये वापरले जाते. ब्राझिलमधील युवा पिढी या ड्रग्जच्या जाळ्यात चांगलीच अडकली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबत ब्राझिलमध्ये अनेक ड्रग माफीयाही तयार झाले आहेत. या ड्रग माफियांना ब्राझिलमध्ये ड्रग लॉर्ड म्हणून ओळखले जाते. या ड्रग लॉर्डकडे अरबो रुपयांची संपत्ती आहे. ड्रगच्या व्यवहारातून ही संपत्ती कमावली असून असे अनेक ड्रग लॉर्ड पोलीसांच्या निशाण्यांवर आहेत. मात्र ब्राझिलच्या युवा पिढीला ड्रगच्या विळख्यात टाकणारे माफीया पालोसांच्या तावडीत लागत नाहीत. असाच एक ब्राझिलियन ड्रग लॉर्ड रोनाल्ड रोलँड काही दिवसापूर्वी अलगद पोलीसांच्या जाळ्यात अडकला आहे. (Lord Ronald Rowland)

रोनाल्ड रोलॅंड काही वर्षापासून फरार आहे. ब्राझिलमध्ये ड्रगचे त्याचे मोठे जाळे आहे. त्याच्या या व्यवसायात त्याच्या पत्नीचीही त्याला साथ आहे. मात्र याच पत्नीमुळे तो पोलीसांच्या जाळ्यात अडकला. सोशल मिडियावर पत्नीनं त्याच्यासोबत एक फोटो शेअर केला, त्यासोबत त्या सुंदर जागेचे नावही टाकले. मग काय, पोलीस याच क्षणाची वाट बघत होते. लगेच या रोनाल्डला अटक करण्यात आली आहे. हजारो युवकांच्या आयुष्याला ड्रगचे ग्रहण लावणारा रोनाल्ड अतिशय अलिशान आयुष्य जगत होता. देश-विदेशात फिरण्याचा त्याचा शौक आहे. ड्रगच्या पैशातूनच तो त्याचा हा शौक पूर्ण करीत असे.

ब्राझिलियन ड्रग लॉर्ड रोनाल्ड रोलँड याच्या शोधात ब्राझिलियन पोलीसांनी जगभर संपर्क केला होता. गेल्या दोन वर्षापासून रोनाल्ड ब्राझिलबाहेर पळाल्याची माहिती होती. ड्रग माफिया रोनाल्ड याला पकडण्यासाठी दोन वर्षात जगभरातील पोलीस आणि एजन्सी अपयशी ठरल्या. मात्र त्याची दुसरी पत्नी, आंद्रेजा डी लिमा जोएल च्या एका चुकीमुळे रोनाल्डला अटक झाली. आंद्रेजा लिमा हिनं रोनाल्डसह आपले फोटो सोशल मिडियावर शेअर केले. पोलीसांनी तिच्या सोशल मिडियावरल लक्ष ठेवले होते. यात ही दोघं ज्या देशात आहेत, त्या देशाचे नाव आणि तेथील स्थळांचेही नाव टाकण्यात आले होते. ब्राझिलियन पोलीसांनी लगेच त्या देशातील पोलिसांबरोबर संपर्क साधला आणि रोनाल्ड आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. (Lord Ronald Rowland)

रोनाल्ड रॅगनने ड्रगच्या माध्यमातून पाच वर्षांत £८६०.२ दशलक्ष किंमतीची संपत्ती कमावली आहे. ही संपत्ती त्यानं १०० हून अधिक शेल कंपन्या आणि व्यवसायांद्वारे विकली. त्याची पत्नी आंद्रेजाही या सर्व गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होती. २०१२ पासून रोनाल्ड ड्रग माफीय म्हणून ओळखला जातो. तो एका स्थानिक एअरलाइनमध्ये पायलट होता. त्यानंतर त्यानं ड्रग व्यवसायात आपले नशीब आजमावले. यात तो एवढा यशस्वी झाला की त्याला ड्रग गॉड म्हणून ओळख मिळाली.

जगात सर्वाधिक ड्रगच्या व्यवहार ब्राझीलमध्ये होतो. ब्राझीलमधील युवावर्ग या ड्रगच्या जाळ्यात अडकला असून यासंदर्भात ब्राझीलमध्ये विशेष जागरुकता मोहीमही सुरु करण्यात आली आहे. या देशातील नागिरक वर्षाला ९२००० किलोग्रॅम कोकोनचे सेवन करत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात काम करणा-या संघटनांनी देशातील सर्वात अवघड स्थित असल्याचे वर्णन केले आहे. ब्राझिलमध्ये आर्थिक मंदिची भीती आहे. त्यामुळे नोक-यांमध्ये शाश्वती राहिलेली नाही. अशा तणावापासून दूर रहाण्यासाठी तरुणवर्ग कोकेन किंवा ड्रगचा आधार घेत आहेत. पाचपैकी चार ब्राझिलियन नागरिक क्रॅक, ऑक्सी सारख्या महागड्या कोकेन पावडर खरेदी करीत आहेत. (Lord Ronald Rowland)

==================

हे देखील वाचा : जेनेरिक औषधांची अमेरिकेत क्रेझ

================

ब्राझिलमध्ये हे कोकेन बोलिव्हिया, पेरु, कोलंबिया या देशांतून पाठवण्यात येते. कोकेनच्या सेवनाचे प्रमाण ब्राझिलमध्ये जास्त आहे, तसेच त्यामुळे गुन्हागारीही वाढीस लागली आहे. या देशात वर्षभरात ६०००० खून झाले आहेत. हा धक्कादायक अहवाल असून यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोकोनच्या अतिरिक्त वापरामुळे ब्राझिलमधील आरोग्य व्यवस्थेवरही ताण पडत आहे. काही तरुण ठराविक आजारांनी रुग्णालयात येण्याचे प्रमाण वाढले आहे.ब्राझिलच्या शहरी भागातही या वाढत्या ड्रगचा वापर दिसत आहे. यामुळे या देशात संघटीत गुन्हेगारी वाढीस लागली आहे. यातच अनेक c नागरिकांना फसवून त्यांच्याकडून कोकेनची वाहतूक करण्यात येत आहे. त्यातही रोनाल्डसारखे ड्रग गॉडची संख्याही या देशात वाढली आहे. (Lord Ronald Rowland)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.