पावसाळा म्हटले की, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटते. पाऊस कोणाला आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. या ऋतूमध्ये फक्त उत्साह आणि आनंदच असतो. सगळीकडे हिरवाई, सणवार घेऊन येणारा हा पाऊस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. एकीकडे उन्हापासून त्रासलेल्या धरित्रीला शांत करणारा आणि पावसाळा दुसरीकडे माणसांसाठी चांगलाच त्रासदायक ठरतो. ( How To Get Rid Of Pests )
पाऊस म्हटले की लगेच मागे येतात ते डास, माशा, विविध किडे. यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन विविध, त्यातून आजार तयार होतात. आपल्या घरात स्वछता राहिली तरच घर प्रसन्न आणि निरोगी राहते. मात्र घरात घाण असली तर त्यातून विविध आजारांना आमंत्रण मिळते.
पावसाळ्यामुळे घरात, घराबाहेर मोठ्या प्रमाणावर डास, माशा, किड्यांची पैदास होते. हे सर्व घरात येतात आणि खाद्यपदार्थांवर बसतात. किचनमधील विविध वस्तूंचा ताबा घेतात आणि त्या खराब करतात. घरात राहणाऱ्या लोकांना यामुळे त्रास होतो, मात्र पाहुण्यांसमोर देखील हे चांगले वाटत नाही. जाहिराती पाहून आपण विविध प्रोडक्ट आणतो घरी मात्र प्रत्यक्षात त्याचा फारसा काहीही उपयोग होत नाही.
पण हाच त्रास आपण काही छोट्या छोट्या उपायांनी मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो आणि पर्यायाने आपल्या घरात चांगली स्वछता आणि आनंद टिकवू शकतो. घरातली फरशी पुसताना जर आपण काही गोष्टी केल्या तर आपण या त्रासातून सटका मिळवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा काही उपायांबद्दल.
- घरातील माशा घालवण्यासाठी पुदीना आणि तुळस यांचा उपयोग गुणकारी ठरू शकतो. पुदीना आणि तुळस यांची बारीक पूड तयार करावी. ही पूड पाण्यात मिसळावी. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून घरातील ज्या ठिकाणी माशा सर्वात जास्त आहेत, तिथे फवारावे. या पाण्यामुळे माशा नाहीशा होतात आणि घर स्वच्छ राहते.
- आपण रोजच घरातली फरशी पुसतो. तर ही फरशी पुसताना तुम्ही जर पाण्यात व्हिनेगर मिसळले तर त्याचा नक्कीच फायदा होईल. पाण्यात टाकलेल्या व्हिनेगरच्या वासामुळे घरातील कानाकोपऱ्यात असलेले कीटक, डास आणि माशांही घरातून नाहीशा होतील.
- फरशी पुसताना पाण्यामध्ये चांगल्या प्रतीच्या फिनाइलचे काही थेंब टाकून घर नीट पुसून काढा. फिनाइलच्या वासाने माशा, किडे, डास नष्ट होतील.
- घरातील फरशी पुसताना पाण्यात मीठ आणि बेकिंग सोडा घालून संपूर्ण घर पुसावे. यामुळे घरात पावसाळी किडे, माशा आणि किडे येणार नाही.
- लवंगाच्या वासाने देखील घर स्वच्छ राहू शकते. लिंबू कापून त्याला 5-6 लवंगा टोचून माश्या, किडे असलेल्या जागी ठेवाव्या या वासाने ते घरातून बाहेर जातील.
- दालचिनीचा वासाने देखील फायदा होऊ शकतो. यासाठी घरात दालचिनीचे तुकडे किंवा पावडर घराच्या कोपर्यात टाकून ठेवू शकता.
======
हे देखील वाचा : पावसाळ्यात हेल्दी राहण्यासाठी डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल
======
- कापूरचा वापर देखील एक प्रभावी उपाय आहे. यासाठी 10-12 कापूर वड्या घेऊन त्या बारीक वाटून त्याची पावडर तयार करा. ही पावडर एक लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर घरातील ज्या ठिकाणी माश्या, डास, किडे जास्त दिसतात त्या ठिकाणी फवारावे.
- हळद आणि मीठ सम प्रमाणात घेऊन ते एकत्र करा. आता ही पावडर जिथे जिथे डास, माशा, किडे येत असतील तिथे आणि घराच्या कोपऱ्यात टाकून ठेवा यामुळे देखील या त्रासापासून बचाव करता येईल.