Vitamin D Deficiency : शरिरात कोणत्याही प्रकारचे व्हिटॅमनची कमतरता निर्माण झाल्यास समस्या उद्भवू शकतात. आजकाल व्हिटॅमिन डी ची शरिरात कमतरता निर्माण होणे सामान्य बाब झाले आहे. यामुळे शरिरातील हाडं ठिसूळ होणे ते रोगप्रतिकारशक्ती कमी होते. व्हिटॅमिन डी मुळे शरिरात ऑस्टियोपोरोसिस आणि रिकेट्ससारखे आजार दूर ठेवण्यास मदत करते. याशिवाय व्हिटॅमिन डी मुळे तुम्ही सर्दी-खोकला अथवा ताप अशा समस्यांपासूनही दूर राहता. व्हिटॅमिन डी स्नायू बळकट होण्यासही मदत करतात.
आपल्या शरिराला व्हिटॅमिन डी सूर्यांच्या किरणांपासून मिळते. याशिवाय जेवणातून बोलायचे झाल्यास टूना फिश, अंड्याचा पिवळा भाग आणि मशरुममध्ये व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात असते. पण पुरेशा प्रमाणात शरिराला व्हिटॅमिन डी न मिळाल्यास काही समस्या उद्भवू लागतात. याशिवाय शरिरात काही लक्षणे दिसून येतात. अशातच जाणून घेणे गरजेचे आहे की, व्हिटॅमिन डी शरिरात कमी झालेय हे कसे ओखळता येते?
लक्षणे काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरिरात थकवा निर्माण होते. उर्जेचा स्तर कमी होऊ लागतो. हाडं आणि स्नायू दुखण्यास सुरुवात होण्यासह समस्या वाढली जाते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे तुमच्या मेंदूवरही परिणाम होतो. यामुळे मूड स्विंग्स, उदास राहणे अथवा डिप्रेशन अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
याव्यतिरिक्त व्हिटॅमिन डी चा संबंध न्यूरोट्रान्समीटर्ससोबत असतो. हे न्यूरोट्रान्समीटर्स मेंदूंच्या भावना कंट्रोल करण्याचे काम करतात. जेव्हा शरिरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी नसते तेव्हा न्यूरोट्रान्समीटर्सचे काम प्रभावित होण्यास सुरुवात होतो. यामुळे मानसिक आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागतात. दीर्घकाळ उदास राहणे अथवा डोकेदुखीची समस्याही होऊ शकते. (Vitamin D Deficiency)
असे रहा दूर
-मासे, अंड आणि मशरुमचे सेवन करा
-दूध आणि डेअरी प्रोडक्ट्सचे सेवन करा
-डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घ्या
-वेळोवेळी हेल्थ चेकअप करा