Home » लग्नाआधी मुलींना जबरदस्तीने दिले जाते खायला, कारण ऐकून व्हाल हैराण

लग्नाआधी मुलींना जबरदस्तीने दिले जाते खायला, कारण ऐकून व्हाल हैराण

प्रत्येक तरुणीसाठी लग्नाचा दिवस फार महत्त्वाचा असतो. यावेळी साजश्रृंगार केला जातो. पण तुम्हाला माहितेय का, एका ठिकाणी लग्नाआधी मुलींना जबरदस्तीने खायला दिले जाते. यामागील कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

by Team Gajawaja
0 comment
Marriage Rituals
Share

Marriage Rituals : सर्वसामान्यपणे एखाद्या मुलीचे लग्न ठरल्यानंतर ती जिम किंवा योगाभ्यास करून वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करते. कारण लग्नामध्ये चारचौघांमध्ये अधिक उठून दिसायचे असते. यासाठी काही तरुणी स्ट्रिक्ट डाएटही फॉलो करतात. पण तुम्हाला माहितेय का, तरुणीला लग्नाआधी जबरदस्तीने खायला देत तिचे वजन वाढवले जाते. यामागील कारण ऐकून तर तुम्ही हैराणच व्हाल.

लग्नामध्ये नवरी जाड दिसण्याची प्रथा
प्रत्येक देश आणि समाजात लग्नासंदर्भात वेगवेगळ्या प्रथा असतात. अशातच अफ्रिका देशातील मुर्तानियामधील लेबलु येथे तरुणींना लग्नासाठी वजन वाढवावे लागते. यासाठी मुलीला अत्याधिक प्रमाणात आणि जबरदस्तीने खायला ही दिले जाते.

मुलीला अत्याधिक तेलकट आणि असे पदार्थ खायला देतात ज्यामुळे तिचे वजन वाढले जाईल. खरंतर, लेबलु येथील मुलींचा जाडेपणा त्यांचे सौंदर्य वाढवते असे म्हटले जाते. याशिवाय मुलीच्या शरिरावक अत्याधिक स्ट्रेच मार्क आणि वाढलेले वजन यामुळे ती अधिक सुंदर दिसते असे मानले जाते. काही वेळेस 12-13 वर्षांच्या तरुणीलाही ऐवढे खायला दिले जाते की, कधीकधी ती उलटी देखील करते. अशा सर्व गोष्टी मुलींसोबत करणे सामान्य मानले जाते. खरंतर, जेवढी जाडी मुलगी तेवढेच नवऱ्याचे तिच्यावर अत्याधिक प्रेम असते असे मानले जाते.(Marriage Rituals)

प्रथेच्या विरोधात काही संघटनांचा विरोध
या प्रथेच्या विरोधात काही संघटनांनी आवाजही उठवला आहे. खरंतर, डब्लूएचओनुसा जेथे सामान्य महिला प्रतिदिन 2 हजार कॅलरीजचे सेवन करते तेथेच प्रथेनुसार महिलेला 16 हजार किलोपर्यंतच्या कॅलरीजचे सेवन करण्यास भाग पाडले जाते. खरंतर, अत्याधिक वाढलेल्या वजनामुळे महिलांमध्ये उच्च रक्तदाब, हृदयासंबंधित आजार आणि हायपरटेंन्शची समस्या वाढली जाऊ शकते.


आणखी वाचा :
ओसामाच्या नावाच्या बिअरची लंडनमध्ये रेकॉर्डतोड विक्री…
भारतातील या हिल स्टेशनला फिरायला जाताय? काढावा लागेल E-Pass, असा करा अर्ज

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.