२०२० ते २०२२ चायनामधून पसरलेल्या ‘कोरोना’ने साऱ्या जगाला वेठीस धरलं होतं. या महामारीतून साऱ्या जगाला सावरायला तब्बल दोन ते तीन वर्षं लागली. जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा बऱ्याच अफवा आणि काही चुकीच्या गोष्टी पसरल्या होत्या.
चीनी लोक हे तेव्हा वटवाघूळ खायचे आणि त्याच्या माध्यमातूनच हा व्हायरस पसरत असल्याचं आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. यामध्ये नेमकं किती खरं किती खोटं याची अद्याप पुष्टी झालेली नाही, पण तेव्हा अशा बातम्या प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. चीनच्या प्रयोगशाळेत वटवाघूळावर प्रयोग सुरू असल्याचंही सांगितलं गेलं होतं.
आता वटवाघूळानंतर चीन पुन्हा एकदा अशाच एक वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. चीनमध्ये सध्या लाखो गाढवांच्या कत्तली (China Donkey Smuggling) होत असल्याचं सांगितलं जात आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण, जाणून घेऊया आजच्या लेखामधून!
‘रॉयटर्स’नी दिलेल्या माहितीनुसार चीनची नजर आता आफ्रिकेतील गाढवांवर पडली आहे आणि ई-जियाओ नावाच्या पारंपरिक औषधाच्या निर्मितीसाठी चीनकडून् लाखो गाढवांच्या (China Donkey Smuggling) कत्तली करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात असल्याचं सांगितलं जात आहे.
गाढवांच्या चामडयातून मिळणारे कोलेजन वापरुन हे औषध तयार केले जाते. याचा वापर ब्युटि प्रॉडक्ट तसेच खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. ‘ई-जियाओ’मुळे रक्ताची गुणवत्ता तसेच रोगप्रतिकारशक्ति सुधारते असा समज चीनी लोकांचा आहे.
चीनमध्ये पाठवली जाणारी ही गाढवं (China Donkey Smuggling) ही आफ्रिकेतील सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे या गाढवांच्या निर्यातील आफ्रिकेच्या लोकांकडून विरोध आहे. या विरोधामुळेच चीनकडून या गाढवांची अवैध मार्गाने तस्करी होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘ई-जियाओ‘ हा प्रकार बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो. जेली, टॉफी, केकसारख्या गोष्टी बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. याबरोबरच ज्यांना पेयाच्या माध्यमातून याचा वापर करायचा असेल त्यासाठी वेगळ्या स्वरूपातही ते उपलब्ध होते. चीनमध्ये
ही एक चैनीची गोष्ट म्हणून वापरली जाते. १६४४ ते १९१२ या कालावधीत उच्चभ्रू लोकांनी याला पसंती दर्शवली होती.
===
हेदेखील वाचा : एकेकाळी दाऊदवर भारी पडलेला महाराष्ट्राचा ‘सुपारी किंग’
===
गेल्या काही वर्षात याची प्रसिद्धी पुन्हा वाढली आहे. चीनी टेलिव्हिजन मालिकांमधून ‘ई-जियाओ’ला प्रमोट करण्यात येत आहे. यामुळेच ‘ई-जियाओ’ची मागणी गेल्या दशकात ३० पटीने वाढलेली दिसल्याचं पाहायला मिळत आहे.
एका ब्रिटिश संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ‘ई-जियाओ‘चे उत्पादन करण्यासाठी दरवर्षी सुमारे ५.९ दशलक्ष गाढवांच्या (China Donkey Smuggling) कातडीची चीनला गरज असते. यामुळेच चीनमध्ये इतर देशांतून होणाऱ्या गाढवांच्या आयातीला प्रोत्साहन तसेच यासाठी सूटही दिली जाते.
एका प्रसिद्ध पशूवैद्यकीय तज्ञाने ‘रॉयटर्स’ला दिलेल्या माहितीनुसार नायजेरीयाच्या राजधानीमध्ये चामडयाच्या मागणीमुळे या गाढवांची कत्तल केली जाते. २०१९ मध्ये इथल्या सरकारने गाढवांच्या निर्यातीवर बंदी घातली होती, पण तरी अवैध मार्गाने गाढवांना (China Donkey Smuggling) दक्षिण नायजेरीयाच्या परिसरात नेलं जायचं, तिथे त्यांची कत्तल केली जात आणि नंतर त्यांची कातडी चीनला पाठवली जात असते.
आफ्रिकेच्या ग्रामीण परिसरात गाढव हे लोकांची वाहतूक करण्याचे परवडणारे साधन म्हणून सर्वात लोकप्रिय आहे. परंतु आता चीनकडून होणाऱ्या मागणीमुळे यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होत आहे.
आफ्रिकेकडून लादली जाणारी बंधनं आणि एकूणच तस्करी करताना भेडसावणाऱ्या समस्या पाहता नुकतंच चीनने गाढवाची (China Donkey Smuggling) कातडी मिळवण्यासाठी आपला मोर्चा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या देशांकडेही वळवला आहे.
पाकिस्तानातून गुप्त पद्धतीने चीनला गाढवांची कातडी (China Donkey Smuggling) पाठवली जात असल्याचंही सांगितलं जात आहे. २०२२ मध्ये कराचीतून हाँगकाँगला पाठवली जाणारी १० मेट्रिक टन गाढवांच्या कातडीची शिपमेंट पकडण्यात आली होती. आफ्रिकेच्या युनियनने या निर्यातीवर घातलेली बंदी संपूर्ण खंडात लागू होण्यासाठी आणखी बराच काळ लागू शकतो त्यामुळे सध्या चीनच्या या गाढव तस्करीला आळा घालणं फार कठीण झालं आहे.