चीन(China) या देशानं जगावर सत्ता मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. अगदी छोट्यातील छोट्या वस्तूंचे उत्पादन करुन जगभर आपले व्यवसायाचे जाळे उभारले. पण जगावर राज्य करु पाहणारा चीन (China) स्वतःच्याच जाळ्यात अडकला आहे. गेल्या काही वर्षात चीनमध्ये एक मूल धोरण होते. त्यामुळे चीनने (China) लोकसंख्या नियंत्रणात आणल्याचा दावा केला. मात्र आता चीनची लोकसंख्या ही झपाट्यानं कमी होत आहे. परिस्थिती अशी आहे की, पुढच्या वीस वर्षाच चीनमधील गावे ओस पडण्याची शक्यता आहे.
चीनमधील अनेक गावांमध्ये मुलं जन्माला येण्याचे प्रमाण अगदी हातावर मोजण्याइतके झाले आहे. त्यामुळेच चीन (China) सरकार हादरले असून आता चीनने विवाहित जोडप्यांना तीन मुलं जन्माला घालावीत असे आवाहन केले आहे. एवढ्यावरच चीन सरकार थांबले नाही, तर देशात लोकसंख्या वाढावी म्हणून अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये चक्क गर्भवती महिलांसाठी सौदर्यस्पर्धा घेण्यात येत आहे.
चीनमधील (China) सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने देशातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या दशकापासून एक मूल हे धोरण काटेकोरपणे राबवले. पण त्याचा परिणाम असा झाला की चीनमधील (China) जन्मदर एकदम घटला. असाच जन्मदर खाली येत राहिला तर चीनमधील (China) शहरे पुढच्या काही वर्षात ओस पडतील अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चीनमध्ये एक मूल धोरण 1979 मध्ये लागू करण्यात आले. त्याच्या प्रचारासाठी विविध पावले उचलण्यात आली. सिचुआन प्रांतात, एकच मूल जन्माला घालण्याची शपथ घेतलेल्या जोडप्यांना अधिक धान्य देण्यात आले. 1995 मध्ये एकच अपत्य झालेल्या जोडप्यांना ‘सन्मान प्रमाणपत्र’ देण्यात आले.
1982 मध्ये चीननं या धोरणाचा संविधानात समावेश केला. जन्म नियंत्रण ही प्रत्येक चिनी नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. यानंतर एक मूल धोरण आक्रमकपणे राबवण्यात आले. पण या धोरणाचे अनेक वाईट परिणाम झाले. मुख्य म्हणजे, ज्या जोडप्यांना मुलगी झाली, त्या मुलींना मारण्यात आले, किंवा त्यांना अनाथ म्हणून सोडण्यात आले. याचा सर्व परिणाम चीनच्या (China) लिंग गुणोत्तरामध्ये झाला. येथे मुलींची संख्या झपाट्यानं कमी झाली.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षानं 1980 च्या दशकात बनवलेल्या या एक मूल धोरणाचे परिणाम आता अवघा चीन (China) भोगत आहे. चीनमध्ये अनेक वर्षापासून हे एक मूल धोरण काटेकोरपणे पाळले गेले. एकपेक्षा जास्त मुल असलेल्या विवाहितांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत होतो. या मुलांच्या शाळेचा खर्च, आरोग्याचा खर्च हे सर्व पालकांना करावे लागत होते. एखाद्या जोडप्याला एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास सरकार त्यांच्यावर दंड लावत असे. दंड भरू न शकणाऱ्या पालकांना अटकही होत असे. एखाद्याला एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्याची नोकरी काढून घेतली जात असे. शिवाय जबरदस्तीने गर्भपात आणि नसबंदी करण्यात येई.
चीन सरकारच्या या कडक धोरणामुळे लोकसंख्या कमी होत असतांना चीनमध्ये (China) अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. जन्मदर कलालीचा खाली आलाच शिवाय कामगारांची कमतरता जाणवू लागली आहे. यासाठी चीनमध्ये आता लोकसंख्या वाढवण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. त्यासाठी ‘प्रो बर्थ कल्चर’ नावाच्या योजना राबवण्यात येत आहेत. यातून गर्भवती महिलांसाठी सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये तरुणींना मूल होण्याचे फायदे सांगून रॅप व्हिडिओ बनवले जात आहेत. याशिवाय दोन किंवा तीन मुले असलेल्या कुटुंबांना प्रोत्साहन देणाऱ्या सार्वजनिक सेवा जाहिराती सरकारी टिव्हीवरुन दाखवण्यात येत आहेत.
=========
हे देखील वाचा : Netflix वर इंटरनेटशिवाय ‘या’ ट्रिकने पाहता येतील सिनेमे, वेब सीरिज
=========
चीनमध्ये (China) सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टिव्ही वाहिन्यांवर झिओकांग हे चित्र दाखवण्यात येत आहे. मोठ्या कुटुंबांना चीनमध्ये झिओकांग म्हणून ओळखले जाते. चीनमध्ये 2023 च्या लोकसंख्येनुसार लोकसंख्या 20 लाख 80 हजारांनी घटून 1.4097 अब्ज झाली आहे. चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये (China) गेल्या वर्षी 90 लाख 20 हजार मुलांचा जन्म झाला आहे. 2022 च्या आकडेवाडीनुसार हा जन्मदर 5.6 टक्के कमी आहे. त्यामुळेच आता चीन एक मूल धोरणावरून दोन अपत्य धोरणाकडे आणि तीन अपत्य धोरणाकडे वळला आहे.
कोरोनाच्या लाटेनंतर चीनमध्ये (China) घटणा-या लोकसंख्येबाबत गंभीरपणे विचार होऊ लागला. एक मूल धोरणाचा येथील जनतेच्या मनावर खोल परिणाम झाला आहे. शिवाय वाढत्या महागाईमुळे मुलांना जन्म देण्यासाठी तरुण पिढी उत्सुक नाही. चीन सरकारनं आपलं धोरण बदलून या विवाहित जोडप्यांना अधिक मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. चीनसरकारच्या एका अहवालानुसार 2030 पर्यंत अशीच घटती लोकसंख्या राहिली तर चीनमधील (China) अनेक गावं आणि शहरं ओस पडणार आहेत. ही स्थिती टाळण्यासाठी आता चीनचे सरकार प्रयत्न करीत आहे.
सई बने