Vastu Shashtra Tips : वास्तुशास्रात काही अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचे पालन केल्यास आयुष्यात नेहमीच आनंद येतो. याशिवाय तुम्ही सकारात्मक आयुष्य जगता. पण आयुष्यात केलेल्या काही चुकांमुळे तुमच्या पैशांचे फार मोठे नुकसान होऊ शकते. अशातच पर्समध्ये वास्तुनुसार काही गोष्टी ठेवाव्यात आणि काय ठेवू नये याबद्दल जाणून घेऊया अधिक…..
पर्समध्ये काही वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे तुमचे खर्च अधिक वाढू शकतात. जी लोक वास्तुच्या नियमांचे पालन केल्यास आयुष्यात समस्या येणार नाही. वास्तुनुसार काही अशा गोष्टी तुम्ही पर्समध्ये ठेवाव्यात ज्यामुळे पैशासंबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात.
पर्समध्ये चाव्या ठेवू नका
पर्समध्ये तुम्ही चाव्या ठेवत असाल तर ही सवय लगेच बदला. वास्तुशास्रानुसार, पर्समध्ये चाव्या ठेवणे अशुभ मानले जाते. याशिवाय तुम्हाला आर्थिक नुकसानही पोहचू शकते. चावी ठेवण्यासाठी घरात एक विशेष स्थान असते. अन्यथा आर्थिक समस्या वाढल्या जाऊ शकतात.
पूर्वज आणि देवतांचे फोटो
वास्तुनुसार, पर्समध्ये पूर्वज आणि देवतांचे फोटो ठेवू नये. पर्समध्ये पूर्वजांचे ठेवले असल्यास आपण ती कुठेही ठेवल्यास त्यांचा अपमान होऊ शकतो. याशिवाय देवतांचे फोटो देखील पर्समध्ये ठेवू नका.
जुनी आणि फाटलेली बिल
जेव्हा तुम्ही कधी एखादे सामान खरेदी करता त्यावेळी पर्समध्ये त्याचे बिल ठेवतो. अशातच वास्तुनुसार, तुमच्या पर्समध्ये बिल ठेवल्यास तुमचे सतत पैसे खर्च होतात. याशिवाय पैशांमुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. (Vastu Shashtra Tips)
औषध
वास्तुशास्रानुसार, तुम्ही कधीच पर्समध्ये औषध ठेवू नका. असे करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. याशिवाय आयुष्यात काही समस्या उद्भवण्यासह पैशांचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला औषध ठेवायची असल्यास घरातील एखाद्या ठिकाणी ठेवा.
फाटलेल्या नोटा
तुमच्या पर्समध्ये फाटलेल्या नोटा कधीच ठेवू नका. याशिवाय जुनी नाणी देखील ठेवू नका. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
टोकदार वस्तू
पर्समध्ये कधीच टोकदार वस्तू ठेवू नका. जसे की, सुई, कैची किंवा चाकू. वास्तुनुसार तुम्ही पर्समध्ये टोकदार वस्तू ठेवल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. याशिवाय अशा वस्तू पर्समध्ये न ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.