Health Care Tips : आजकाल बहुतांश लोक कामाच्या वाढत्या प्रेशरमुळे एंग्जायटी आणि पॅनिक अटॅकचे शिकार होतात. कामच्या प्रेशरसोबत दुसऱ्यांच्या पुढे जाण्याच्या विचाराने काही जणांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते. सामान्य वाटणारी समस्या हळूहळू पुढे जाऊन मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरली जाते. यामुळेच व्यक्ती एंग्जायटी आणि पॅनिक अटॅकचे शिकार होतात. बदलत्या काळानुसार एंग्जायटी आणि पॅनिक अॅटकच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. पण या दोन्ही समस्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत. जाणून घेऊया याबद्दल अधिक…..
खरंतर बहुतांश लोकांना पॅनिक अटॅक आणि एंग्जायटीमधील फरक कळत नाही. याशिवाय काहीजण एंग्जायटीला पॅनिक अटॅकही बोलतात. पण याची लक्षणे फार वेगळी असतात.
एंग्जायटी म्हणजे काय?
एंग्जायटी म्हणजे खरंतर जुने दु:ख किंवा वाईट प्रसंगांमुळे ट्रिगर होते. जुन्या गोष्टींबद्दल विचार केल्याने तुमच्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण होते आणि एंग्जायटीची समस्या वाढली जाते. काहीवेळेस आपण अधिक तणाव घेतो तेव्हा स्नायू अधिक खेचल्यासारखे वाटतात आणि अटॅक येण्याचा धोका वाढला जातो. जुने दु:ख, मानसिक ट्रॉमा किंवा गंभीर परिस्थितीच्या कारणास्तव एंग्जायची अटॅकची समस्या निर्माण होऊ शकते.
एंग्जायटीची लक्षणे
एंग्जायटीवेळी तुमच्या हृदयाचे ठोके वाढले जातात. याशिवाय अचानक खूप घाम येणे, हात थरथरणे, उगाचच भीती वाटत राहणे किंवा श्वास घेण्यास समस्या निर्माण होणे. (Health Care Tips)
पॅनिक अटॅक म्हणजे काय?
पॅनिक अटॅक हा एखाद्या जुन्या वाईट प्रसंग किंवा दु:खाशी संबंधित नाही. हा अचानक येणारा अटॅक आहे. याचा परिणाम शरिरावर वेगाने दिसतो. काहीवेळेस एखाद्या व्यक्तीने आपल्याला सोडून जाण्याच्या भीतीनेही पॅनिक अटॅक येऊ शकतो. हा एक फोबिया असतो. जो व्यक्तीला कधीही होऊ शकतो.
पॅनिक अटॅकची लक्षणे
पॅनिक अटॅकमध्ये तुमच्या शरिराचे ब्लड प्रेशर वाढणे, उलटी येणे, अचानक घाम येणे, भीती वाटणे आणि हृदयाचे ठोके वाढले जातात.