Skin Care Tips : सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी बहुतांश महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. याशिवाय काही त्वचेसंबंधित ट्रिटमेंटही केल्या जातात. पण उन्हाळ्यातील उनं, हिवाळ्यात पडणारी कोरडी त्वचा आणि त्वचेसंबंधित काही समस्यांमुळे त्वचेचा ग्लो निघून जातो.
चेहऱ्यावरील ग्लो पुन्हा मिळवायचा असल्यास काही गोष्टी आवर्जुन केल्या पाहिजेत. यासाठी चेहऱ्यावरील मेकअप हटवणे ते फेस मास्क पर्यंतच्या काही गोष्टींचा समावेश असतो. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….
चेहऱ्यावरील मेकअप काढा
त्वचेची काळजी घेण्यासाठी मेकअप सर्वाधिक मोठा मुद्दा आहे. झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप काढून झोपावे. यामुळे पिंपल्सच्या समस्येपासून दूर राहाल. आपल्या त्वचेवर लहान-लहान रोमछिद्र असतात. जे मेकअपमुळे झाकले जातात. जर तुम्ही रात्री मेकअप व्यवस्थितीत काढून न झोपल्यास तर त्वचेचे सौंदर्य कमी होऊ शकते. झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑइलचे तेल लावून मेकअप काढा. यामुळे त्वचा हेल्दी राहिल.
चेहरा स्वच्छ धुवा
मेकअप काढल्यानंतरही चेहरा स्वच्छ होत नाही. यामुळे चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचे आहे. चेहरा धुतल्याने त्वचेवरील रोमछिद्र उघडली जातात. यामुळे चेहऱ्याचे आरोग्य उत्तम राहाते. याशिवाय चेहऱ्याला उत्तम क्लिंजरदेखील लावा.
मॉइश्चराइजर लावून झोपा
तुमच्या ब्युटी किटमध्ये एक नाइट क्रिम असावी. यामुळे मृत कोशिकांना हाइड्रेट, पोषण तत्त्वे मिळतात. यामुळे त्वचा ग्लो देखील होते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मॉइश्चराइजर क्रिम लावून झोपा. लक्षात ठेवा रात्री जी क्रिम चेहऱ्याला लावाल त्यामध्ये एसपीएफ असल्यास लावू नका.
डोळ्याखाली क्रिम लावा
चेहऱ्यासह डोळ्यांखालच्या त्वचेचीही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण डोळ्यांखालील त्वचा पातळ आणि नाजूक असते. यामुळे दररोज रात्री फेसला मॉइश्चराइजर करण्यासह डोळ्यांखाली अंडर आय क्रिम लावू शकता. (Skin Care Tips)
फेस मास्क
त्वचेला ग्लो येण्यासाठी आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलण्यासाठी फेस मास्क फार महत्त्वाचे आहे. यामुळे आठवड्यातून एक-दोन वेळेस फेस मास्क चेहऱ्याला जरुर लावा.
पुरेशी झोप
स्किन केअर करण्यासाठी त्वचा हेल्दी राहण्यासाठी पुरेशी झोप देखील फार महत्त्वाची आहे. दररोज सात ते नऊ तासांची झोप घ्यावी असा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. पुरेश्या झोपेसह हेल्दी आहाराचे सेवन करावे.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)