एक काळ असा होता, जेव्हा Nokia 3310 सारख्या फोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा. हा फोन पडला तरीही त्याच्या स्क्रिनला नुकसान पोहोचण्याचा धोका नव्हता. तो पुन्हा वापरता येऊ शकत होता. पण आताच्या स्मार्टफोनचा वापर हा दीर्घकाळ केला जात नाही. आताच्या फोनसाठी दिली जाणारी स्क्रिन अत्यंत नाजुक असते. (Smartphone Use)
फोन हातातून पडल्यानंतर स्क्रिन फुटण्याचा धोका अधिक असतो. पण फुटलेल्या स्क्रिनचा स्मार्टफोन तुम्ही वापरताय का? तर आधी हे वाचा.
फुटलेली स्क्रिन वापरण्यााधी हे नक्की वाचा
-फुटलेल्या स्क्रिनचे मोबाइल हळूहळू काम करणे बंद करू शकतात. याशिवाय टच स्क्रिन होणे बंद होणे अथवा एखादी कमांड फोनला दिली तरीही तसे न होणे अशा काही गोष्टी होऊ शकतात.
-फोनवर लावण्यात आलेली स्क्रिन फोनला बाहेरच्या एलिमेंटपासून बचाव करते. यामुळे डिव्हाइस खराब होण्याची शक्यता फार कमी होते. अशातच जर स्क्रिन फुटलेली असल्यास एखादे लिक्विड फोनच्या आतमध्ये गेल्यास डिव्हाइस काही प्रकारे डॅमेज होऊ शकते. फोनमध्ये शॉर्ट सर्किटही होऊ शकते.
-फुटलेल्या स्क्रिनचा वापर करत असाल तर तुमच्या हाताच्या बोटाला दुखापत होऊ शकते. जेव्हा फुटलेल्या स्क्रिनवरून फोनला एक्सेस करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या बोटांना जखम होऊ शकते. (Smartphone Use)
-फुटलेल्या स्क्रिनमुळे फोनवरील काही गोष्टी व्यवस्थितीत दिसत नाहीत. यामुळे एखादा मेसेज वाचताना अथवा सोशल मीडियाचा वापर करताना डोळ्यांवर अधिक ताण पडला जाऊ शकतो. यामुळे डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात.
-इंटरनॅशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC)ने फोनमधील रेडिओफ्रिक्वेंसीला व्यक्तीसाठी संभाव्यत: कार्सिनोजेनिक मानले आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटी असे मानते की, फोनच्या वापरामुळे आरोग्याला अधिक नुकसान पोहोचणार नाही या संदर्भात अधिक रिसर्च करावे लागणार आहेत.
आणखी वाचा: फोनवर व्हिडीओ, गाणी ऐकताना सतत जाहिरात दाखवली जाते? टाळण्यासाठी करा ही सेटिंग