बचत करणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. भारतात प्रत्येक वर्गातील, वयोगटातील महिला-पुरुष मंडळी बचत करतात. बचतीचे विविध ऑप्शन्सही आपल्याला दिले गेले आहेत. ज्या योजनेत गुंतवणूकीचे नियम बदलले गेले आहेत त्याचबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. खरंतर सीनियर सीटिझन सेविंग स्किम, पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट आणि पब्लिक प्रोविडेंट फंडाच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. सरकारने या योजनेतील गुंतवणूकीच्या नियमात बदल केले आहेत. जर तुम्ही सुद्धा यामध्ये गुंतवणूक करू पाहत असाल तर बदललेल्या नियमांबद्दल येथे आवश्यक जाणून घ्या. (Saving schemes rules)
पीपीएफच्या नियमांत बदल
पब्लिक प्रोव्हिटेंड फंडाच्या नियमांत मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद करण्याच्या नियमात बदल झाला आहे. नोटिफिकेशननुसार, पीपीएफ स्किम २०२३ अंतर्गत बदल करण्यात आला आहे. ज्यामध्ये वेळेआधी खाते बंद केल्यास दंड आकारला जाणार नाही. नव्या नियमानुसार गुंतवणूकदाराने जर पाच-पाच वर्षासाठी खात्याची मर्यादा वाढवली असेल तर दंड लागणार नाही.
वरिष्ठ नागरिक बचत योजना
वरिष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने अकाउंट सुरु करण्याचा कालावधी वाढवला आहे. ९ नोव्हेंबरला जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनद्वारे व्यक्ती रियाटरमेंटच्या तीन महिन्यात अकाउंट खाते सुरु करू शकतो. या योजनेचा लाभ आता त्यांना घेता येणार आहे. सर्कुलरपूर्वी अकाउंट सुरु करण्याचा कालावधी एका महिन्याचा होता. या योजनेअंतर्गत व्याज दराची गणना मॅच्युरिटी डेट किंवा वाढलेल्या मॅच्युरिटी डेटच्या आधारावर ठरवली जाणार आहे. (Saving schemes rules)
पोस्ट ऑफिस सेविंग्स अकाउंट
नोटिफिकेशननुसार, एखाद्याने पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली असेल आणि वेळेआधी अकाउंट विड्रॉल करणार असेल तर व्याजाचे पैसे पोस्ट ऑफिसच्या सेविंग्स अकाउंटमधये ट्रांसफर केले जातील. तर पाच वर्षांच्या टाइम डिपॉजिट मध्ये गुंतवणूक केली असेल आणि चार वर्षांमध्ये आपले खाते बंद केले असेल तर व्याजाची तीन वर्षाचे टाइम डिपॉझिट अकाउंटच्या आधारावर कॅलकुलेट केले जाईल.’
हेही वाचा- गुगल पे सोबत बँक खाते लिंक असेल तर आधी हे वाचा