सुगंध आपल्या शरीराला-मनाला प्रेरित करतो. उत्तम सुंगधामुळे मनात उत्तम विचार सुद्धा येऊ शकतात. बहुतांशवेळा जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या आवडीचा परफ्यूम जरुर लावतो. पण तुम्हाला माहितेय का, आवडीच्या परफ्युममुळे आरोग्यासंबंधित काही आजार होऊ शकतात. काही लोकांसाठी हे एलर्जीचे कारण ठरू शकते. (Perfume side effect)
खरंतर परफ्युममध्ये सर्वसामान्यपणे आढळणारे कंपाउंड म्हणजे, बेंजाइल अल्कोहोल, एसीटोन, इथेनॉल, एथिल एसीटेट, बेंजाल्डिहाइड, फॉर्मेल्डिहाइड आणि कधीकधी मेथिलीन क्लोराइड किंवा लिमोनेन असते. सुगंधात आढळणाऱ्या रसायनामध्ये फेथलेट्सचा समावेश आहे. हे एंडोक्राइन डिसर्पचर आहे. कार्सिनोजेन बेंजोफेनोन आणि स्टाइरीन सुद्धा यामध्ये असतात.
परफ्यूमचा गंध हा सूजेची समस्या निर्माण करू शकतो. ही गंबीर डोकेदुखीचे कारण ही ठरू शकते. या व्यतिरिक्त स्किन इंन्फेक्शन निर्माण होऊ शकते. काही प्रकरणी कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट एक्जिमाचे कारण ठरू शकते. याच कारणास्तव खाज आणि स्किन रॅशेज होऊ शकतात. बहुतांश लोकांना याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतात. जी लोक परफ्यूमचा अत्याधिक वापर करतात त्यांनी त्यामधील रासायनिक सामग्रीबद्दल सतर्क राहिले पाहिजे. काही लोकांना यामुळे जळजळची समस्या होऊ शकते. अशा लोकांमध्ये भीती आणि तणावाची लक्षणे सुद्धा दिसून येऊ शकतात. (Perfume side effect)
किती पर्यंत होऊ शकते ही समस्या
काही हलकी लक्षणे काही काळापर्यंत राहतात. ती ठिक होण्यासाठी काही आठवडे लागतात. परफ्यूम एलर्जीच्या हलक्या लक्षणांमध्ये खाज, दाणे येणे आणि जळजळची समस्या होऊ शकते. याच कारणास्तव डोळ्याच्या आसपास आणि गळ्याजवळ खाजेची समस्या होऊ शकते.
काय करावी ट्रीटमेंट
जर तुम्हाला परफ्यूमच्या एलर्जीपासून दूर रहायचे असेल तर सर्वात प्रथम उत्तम आणि नैसर्गिक परफ्युमचा वापर करावा. या व्यतिरिक्त जर परफ्यूममुळे एलर्जी झाल्यास एखाद्या तज्ञांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा- हेअर कलर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी