Home » Make up kit दुसऱ्यांसोबत शेअर केल्याने होईल नुकसान

Make up kit दुसऱ्यांसोबत शेअर केल्याने होईल नुकसान

मेकअप करताना तुम्ही बहुतांशवेळा पाहिले असेल लोक एकाच ब्रशचा वापर करून प्रत्येकाला टचअप करत असतात. घरी किंवा ऑफिस मध्ये सुद्धा कधीकधी आपण आपला मेकअप किट शेअर करतो.

by Team Gajawaja
0 comment
Make up kit
Share

मेकअप करताना तुम्ही बहुतांशवेळा पाहिले असेल लोक एकाच ब्रशचा वापर करून प्रत्येकाला टचअप करत असतात. घरी किंवा ऑफिस मध्ये सुद्धा कधीकधी आपण आपला मेकअप किट शेअर करतो. परंतु असे करणे योग्य नाही. मात्र जर ते प्रोडक्ट्स ट्युबमध्ये असतील किंवा काढून लावायचे असतील तर शेअर करू शकता. पण थेट अप्लाय केलेले प्रोडक्ट्स कधीच दुसऱ्यांसोबत शेअरकरू नका. अन्यथा काही ब्युटी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Make up kit)

मेकअप किट का शेअर करू नये?
-इंन्फेक्शनचा धोका
इंन्फेक्शनचा धोका मेकअप किट शेअर केल्याने वाढला जातो. जसे की, आय इंन्फेक्शन किंवा स्किन इंन्फेक्शन होऊ शकते. काजळ किंवा मेकअप ब्रशच्या माध्यमातून एकमेकांच्या स्किनला असणाऱ्या समस्याही तुमच्या पर्यंत पोहचू शकतात.

ओठांवर दाणे येणे
जर तुम्ही लिपस्टिक शेअर करत असाल तर ओठांवर इंन्फेक्शन होऊ शकते. जसे की, ओठांवर दाणे येऊ शकतात.

स्किन संबंधित समस्या
वार्ट किंवा एखादे फंगल इंन्फेक्शन मेकअपच्या माध्यमातून होऊ शकते. या व्यतिरिक्त शेअरिंग केल्याने असे सुद्धा नुकसान होऊ शकते की, प्रोडक्ट्स नक्की कोणत्या-कोणत्या व्यक्तींसाठी वापरले गेले आहे. त्यामुळे स्किन संबंधित समस्या उद्भवू शकतात. असे करताना बॅक्टेरिया आणि फंगस सुद्धा शेअर होतात. विनाकारण स्किन प्रॉब्लेम्स सुरु होतात.

मेकअपच्या या गोष्टी शेअर करणे टाळा
मेकअपच्या किटमधील तुमचा मस्कारा, आयशॅडो, आयलाइनर शेअर करण्यापासून दूर रहा. अन्यथा आय इंन्फेक्शन होऊ शकते. तसेच फेस पाउडर, लिपस्टिक, मेकअप ब्रश शेअर करणेही नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे थेट स्किनला कॉन्टॅक्ट होणाऱ्या गोष्टी अजिबात शेअर करू नका.

या व्यतिरिक्त मेकअप किटची काळजी घेणे सुद्धा अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही तो एखाद्या ठिकाणी व्यवस्थितीत ठेवावा. लक्षात ठेवा तो, सुक्या आणि थंड ठिकाणी ठेवा, जर तुम्ही तो बाथरुममध्ये ठेवत असाल तर ओलाव्यामुळे खराब होऊ शकतो. तसेच मेकअप किट कधीच कारमध्ये ठेवू नका.जर तुम्ही मेकअपसाठी सिंथेटिक ब्रश वापरत असाल तर तो सुद्धा स्वच्छ करा. नॉर्मल वॉटरने तुम्ही तो स्वच्छ करू शकता. (Make up kit)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेकअपचा किट दीर्घकाळ वापरणे टाळा. कारण त्याची सुद्धा एक्सपायरी डेट असते. प्रोडक्ट खराब झाले असेल ते तुम्हाला वास घेऊन किंवा हाताने स्पर्श करून कळू शकते. क्रिम, नेलपॉलिश, मस्कारा आणि फाउंडेशन वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे.


हेही वाचा- त्वचेला नुकसान पोहचवू शकतात तुमच्या ‘या’ चुका


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.