नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘करण विथ कॉफी’ च्या नव्या सीजनमधील एक व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. त्यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने केलेल्या वक्तव्यावरुन फॅन्स ओपन मॅरेज आणि ओपन रिलेशनशिपवरुन वाद घालत आहेत. व्हिडिओमध्ये दीपिका पादुकोणने असे म्हटले होते की, लग्नापूर्वी ती पती रणवीर सिंह याच्यासोबत ओपन रिलेशनशिपमध्ये होती. चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओखाली विविध कमेंट्स केल्या आहेत. त्याचसोबत दोघे ओपन मॅरेजमध्ये आहेत असे ही म्हटले आहे. अखेर ओपन मॅरेज नक्की काय आहे आणि याचा ट्रेंन्ड सध्या का वाढला जातोय याबद्दलच जाणून घेऊयात. (Open Relationship)
आपल्या हिंदू धर्मात लग्न हे सर्वात पवित्र मानले जाते. त्यावेळी काही धार्मिक नियम, रीती-परंपरा यांचे पालन करत स्री आणि पुरुषांमध्ये लिखित किंवा अलिखित सामाजिक कराराच्या माध्यमातून नवरा-बायको म्हणून घोषित केले जाते. या संबंधित अथवा रिलेशनशिपबद्दल जगभरात विविध परंपरा आहेत.
तसेच विवाहाचे काही प्रकार असतात. रीती-रिवाज, कराराचे प्रकार, नवरा-बायको यांच्यामधील संबंध, जबाबदारीची व्याख्या, नवरा-बायकोची संख्या या आधारावर लग्न किंवा स्री-पुरुषांच्या संबंधांमध्ये वर्गीकरण केले जाते. तर स्री-पुरुषांमध्ये सेक्स व्यतिरिक्तही काही संबंधांना फार महत्त्व असते. आज पाश्चात्य संस्कृतित मुक्त जीवन जगण्याला मान्यता आहे. त्यामुळे लोक सुद्धा त्याच दृष्टीकोनातून विवाहाची व्याख्या करत आहेत.
लिव्ह इन रिलेशनशिप
आधुनिक जीवनशैलीत लिव्ह इन रिलेशनशिप हा काही नवा शब्द नाही. यामध्ये एक महिला आणि पुरुष एकमेकांच्या सहमतीने लग्नाशिवाय एकत्रित राहतात. या दरम्यान ते एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरुन लग्न झाल्यानंतर त्यांचे एकमेकांशी पटेल की नाही यामधून कळले. काही वेळेस असे दिसून येते की, केवळ विवाहाच्या नात्यापासून दूर राहण्यासाठी काही कपल्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात.
रिलेशनशिपच्याही पलीकडे काही…
दोन प्रौढ मुलगा-मुलगी एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहू शकता. एकमेकांना डेट करू शकतात किंवा कोणत्याही स्वरुपात एकत्रित राहू शकतात. सुरुवातीला मैत्रीचे नाते असते. त्याचे नंतर रुपांतर लिव्ह इन अथवा लग्नात होऊ शकते. परंतु आता प्रश्न असा आहे की, अखेर ओपन रिलेशनशिप नक्की कुठे येते? (Open Relationship)
ओपन रिलेशनशिप किंवा ओपन मॅरेज नक्की काय?
शब्दावरुनच कळते की, ओपन मॅरेज किंवा ओपन रिलेशनशिप मध्ये एकमेकांच्या प्रति कोणतेही नियम आणि महत्त्व नसते. यामध्ये पार्टनर आपल्या मर्जीने दुसरा पार्टनर शोधू शकतात. अथवा काही काळासाठी दुसऱ्यासोबत राहू शकतात. असे मानले जाते की, काही काळासाठी एखाद्यासोबत राहिल्याने दोन्ही पार्टनरला एकमेकांबद्दलच्या अफेक्शनमध्ये कोणताही फरक पडेल अशी अपेक्षा नसते.
ओपन मॅरेज किंवा रिलेशनशिपला पाश्चात्य संस्कृतित काही नावांनी ओळखले जाते. ज्यामध्ये स्विंगिंग, बहुल विवाह असे. परंतु याचे खास पैलू असा की, यामध्ये एकमेकांसोबत लॉयल राहून तुम्ही दुसऱ्या व्यक्तींना डेट करू शकता.
हेही वाचा- वैवाहिक आयुष्यात सुखी राहण्यासाठी संवाद हवाच…