जेव्हा तुमचे एखाद्यासोबत वाद, भांडण होतात तेव्हा तुम्हाला अतिशय राग येतो. अशावेळी तुमच्या तोंडून काहीही बोलले जाते. तेव्हा रागात आपण काय बोलतो आहोत हे कळत नाही. मात्र राग शांत झाल्यावर आपण जे काही बोललो त्याचा पश्चाताप होतो. अशातच रागावर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही पुढील काही टीप्स जरूर फॉलो करू शकता. (control on anger tips)
-श्वासावर नियंत्रण ठेवा
तणावाच्या स्थितीत अशा प्रकारे श्वास घ्या जेणेकरुन तुम्ही शांत व्हाल आणि तुम्हाला स्वत: वर नियंत्रण मिळवता येईल. दीर्घश्वास घेण्याचा प्रयत्न करा. पाच सेकंद तरी आपल्या श्वास रोखून धरा आणि सोडा. असे दोन ते तीन वेळा करा. यामुळे तुम्ही शांत व्हाल.
-व्यावहारिक रहा
तुम्ही तुमचा राग कंट्रोल केला नाही तर गोष्टी बिघडू शकतात. त्यामुळे आधी काही गोष्टी समजून घ्या. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्या स्थितीवेळी व्यावहारिक रहा. कधीही मोठ्या आवाजात बोलू नका. तुम्ही तुमची बाजू नम्रपणे मांडा आणि समोरच्या व्यक्तीला ही तसेच वागण्यास सांगा.
-बोलण्यावर विचार करा
धैर्य मोडण्यापेक्षा स्वत:लाच विचारा वास्तवात हे किती वाईट आहे. रागाऐवजी तुमची उर्जा या गोष्टीसाठी लावा की, स्थिती कशी सुधारली जाईल. जर तुमचे मन चलबिचल होत असेल तर घाई करण्याऐवजी शांतपणे विचार करा.
-आजूबाजूच्या स्थितीचा विचार करा
जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा आजूबाजूला काय स्थिती आहे हे पाहत नाही. याचा परिणाम तुमच्या व्यक्तीमतत्त्वावर होतो. यामुळे तुमच्यासोबत कोणीही नाते टिकवू पाहत नाही. म्हणूनच तुम्हाला जर अधिक राग येत असेल तर सर्वात प्रथम तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराच. पण त्याचसोबत आजूबाजूच्या स्थितीचा ही विचार करा.
-तुमच्यावर लक्ष केंद्रित करा
जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही तुमच्यावरचा ताबा नियंत्रम करू शकत नाहीत तर समोरच्या व्यक्तीला बोलू द्या. तेव्हा तुम्ही काय रिअॅक्ट कराल याचा विचार करा. तेव्हा स्वत:च बरोबर आहात असे मानून चालू नका. दुसऱ्याचे मत सुद्धा ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. (control on anger tips)
-ईमानदार रहा
तुम्ही तुमचा मुद्दा जरूर मांडा. पण त्यावेळी राग व्यक्त करू नका, अथवा शिविगाळ करणे टाळा. यामुळे वाद वाढू शकतो. ऐवढेच नव्हे तर खोटं अजिबात बोलू नका. कारण एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला पुढे सुद्धा काही गोष्टींबद्दल खोटं बोलावे लागते.