सणांच्या वेळी आपण जेव्हा खरेदी करायला जातो तेव्हा कळत नाही नक्की काय खरेदी करावे. काहीवेळेस असे ही होते की, तुम्ही जे खरेदी करायला गेला आहात ते न घेता दुसरेच काहीतरी घेता. त्यामुळे घरी आल्यानंतर तुम्हाला वाटते की, याची खरंच काही गरज नव्हती. उगाचच आपण ते खरेदी केले. अशातच महिन्याभराचे बजेट या खरेदीमुळे बिघडले जाते. अशा प्रकारची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही स्मार्ट शॉपिंगचा पर्याय निवडला पाहिजे. त्यामुळे वेळ आणि पैसे या दोघांची ही बचत होईल. (Shopping tips)
ऑफरला बळी पडू नका
सणासुदीच्या काळात मार्केट मध्ये बहुतांश गोष्टींवर सूट दिली जाते. त्यावर उत्तम ऑफर ही मिळतात. या ऑफर्सला पाहून आपण एखादी वस्तू खरेदी करतो. मात्र जर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार चालायचे असेल तर सर्वात प्रथम हे पहा की, तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींची गरज आहे. गरजेच्या वस्तू या ऑफरच्या नादात घेणे टाळा.
गरजेच्या वस्तूंची लिस्ट तयार करा
तुम्ही गरजेच्या वस्तूंची एक लिस्ट तयार करा की, नक्की कोणत्या गोष्टींची गरज आहे. कारण बहुतांश वेळा असे होते की शॉपिंगला गेल्यानंतर मार्केटमध्ये विविध प्रकारच्या गोष्टी पाहून आपण आकर्षित होतो आणि त्या खरेदी कराव्यात असे वाटते. याच कारणास्तव महत्वाचे सामान घेणे राहून जाते. त्यामुळे हे अत्यंत गरजेचे आहे की, तुम्ही गरजेनुसार एक लिस्ट तयार करा आणि त्यानुसारच खरेदी करा. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि अनावश्यक वस्तू ही खरेदी करणार नाहीत.
घरातूनच खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत ठेवा
जेव्हा तुम्ही खरेदीला जाता तेव्हा आपल्यासोबत खाण्यापिण्याच्या वस्तू जरूर ठेवा. कारण बाजारात खरेदी करताना भूक लागते. अशातच तुम्ही एखादा पदार्थ खरेदी करून खायचा जरी विचार केला तरी त्यासाठी वेळ आणि पैसे दोन्ही गोष्टी जातात. त्यामुळे घरातूनच काही हलका नाश्ता करून जा. (Shopping tips)
बजेट जरूर तयार करा
सणासुदीच्या काळात खरेदीसाठी नक्कीच बजेट बनवले पाहिजे. यामुळे तुम्हाला कळेल की. किती पैसे आणि कसे खर्च करायचे आहेत. जर तुम्ही बजेट तयार केले नही तर तुम्हाला कळणार नाही की, तुम्ही किती पैसे खर्च केले आहेत. याच कारणास्तव तुमचे महिन्याभराचे बजेट बिघडले जाईल. यासाठी स्मार्ट खरेदी करण्यासाी आधीच बजेट तयार करा.
हेही वाचा- Ready to wear साडी खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष
खरेदी करताना सामानांची तुलना करा
आजकाल बहुतांश गोष्टी आपल्याला ऑनलाईन मिळत असल्याने काही प्रकारच्या व्हराइटीसह त्याला पर्याय ही मिळतात.त्यामुळे खरेदी करताना सामानांची तुलना जरूर करा. ऑनलाईन असो किंवा ऑफलाइन गोष्टींच्या किंमतीत किती अंतर आहे हे पहा. जेणेकरुन उत्तम खरेदी करण्यासह तुमचे पैसे सुद्धा वाचतील.