चेकचा वापर आपण बहुतांशजण करतोच. प्रत्येकाला बँकेचे खाते सुरु केल्यानंतर ग्राहकाला पासबुक, एटीएम कार्डसह चेकबुक दिले जाते. जेणेकरुन ऑनलाईन आणि कॅश ट्रांजेक्शनसह याच्या माध्यमातून सुद्धा पैशांचे ट्रांजेक्शन केले जाऊ शकतात. एखाद्या मोठ्या रक्कमेच्या पेमेंटसाठी चेकबुकचा अधिक वापर केला जातो. मात्र चेकचा जेव्हा तुम्ही वापर करता तेव्हा काही गोष्टींबद्दल काळजी घेणे आवश्यक असते. (Signature on cheque mistakes)
चेक बँकिंग सिस्टिम अशी एक सुविधा आहे ज्याच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी वापरू शकतो. ज्या व्यक्तिला पैसे द्यायचे आहेत त्याचे नाव आणि रक्कम त्यावर लिहिली जाते. त्याचसोबत चेकवर स्वाक्षरी ही करावी लागते. अशातच चेकवर स्वाक्षरी करताना कोणत्या चुका करणे टाळाव्यात याच बद्दल जाणून घेणार आहोत.
-रक्कमेनंतर Only असे जरुर लिहावे
जेव्हा तुम्ही जारी करता तेव्हा संपूर्ण रक्कम किती आहे ते लिहून झाल्यानंतर Only असे जरुर लिहावे. खरंतर चेकवर असे लिहण्यामागील कारण असे की, फसवणूकीपासून दूर राहता येते.
-रिकाम्या चेकवर स्वाक्षारी करु नका
कधीच रिकाम्या चेकवर स्वाक्षरी करू नका. नेहमीच ज्याला चेक देत आहात त्याचे नाव, रक्कम आणि तारीख त्यावर लिहा. चेकवर लिहण्यासाठी नेहमीच आपल्याच पेनाचा वापर करा.
-चुकीची स्वाक्षरी करु नका
पैशांव्यतिरिक्त चेक लिहून देणाऱ्याची स्वाक्षरी ही योग्य असावी. जर ती चुकीची असेल तर तुमचा चेक स्विकारला जात नाही. अशा चेकचे पेमेंट बँक कत नाही. त्यामुळे चेकवर स्वाक्षरी करताना ती बँकेत दिलेल्या स्वाक्षरी सारखीच आहे का हे पहावे.
-योग्य तारीख लिहा
सुनिश्चित करता की, चेकवर योग्य तारीख लिहिली आहे. ज्या दिवशी चेक देत आहात त्याच दिवसाची तारीख लिहा. हे सर्वात महत्त्वाचे असते. एखाद्या कंफ्युजन पासून दूर ठेवता येते आणि चेक कधीपर्यंत क्लिअर होण्यासाठी वैध असेल हे सुद्धा दाखवते. (Signature on cheque mistakes)
-चेकवर स्वाक्षरी करुन कोणालाही देऊ नका
कधीच रिकाम्या चेकवर स्वाक्षरी करुन कोणालाही देऊ नका. यामुळे तुमची फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते.
हेही वाचा- पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेतलयं तर ‘या’ चुका टाळा
-पोस्ट- डेटिंगपासून दूर रहा
चेकला पोस्ट डेटिंग करण्यापासून दूर रहा. कारण बँक तसा चेक स्विकार करत नाही. बँक चेकचे पेमेंट करण्यासाठी तारीख पाहते. जर तुम्ही त्याच दिवशी किंवा मर्यादित कालावधीत चेक टाकल्यास तरच तुम्हाला पेमेंट मिळू शकते. मात्र चुकीची तारीख, महिना किंवा वर्ष टाकले असेल तर तुमचा चेक बाउंस होऊ शकतो.