Home » सकाळी उठल्यानंतर चिडचिड होते?

सकाळी उठल्यानंतर चिडचिड होते?

by Team Gajawaja
0 comment
Wake up in bad mood
Share

तुम्ही सकाळी उठल्यानंतर चिडचि करता का? यावेळी जगभराचा त्रास आपल्याच माथी आल्यासारखे वाटते का? या सारख्या समस्यांचा विचार करुनच असे वाटते की दिवसभर फक्त झोपून रहावे. कधीकधी तर मूड ऑफ ही असतो. एखादी सामान्य गोष्ट सुद्धा फार मोठी वाटते. डॉक्टर असे मानतात की, जी लोक सकाळी उठल्यानंतर खराब मूड मध्ये उठतात त्यांचा संपूर्ण दिवस सुरळीत जात नाही. यामुळे त्यांच्यामध्ये नकारात्मकता निर्माण झालेली असते. याचा थेट परिणाम कामाच्या प्रोडक्टिव्हिटीवर ही होतो. असे तुमच्या सोबत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. यामागे काही कारणं असू शकतात. याच बद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. (Wake up in bad mood)

डॉक्टरांचे असे मानणे आहे की, असे सर्वसामान्यपणे होण्यामागील कारण म्हणजे रात्रीची झोप पूर्ण न होणे अथवा तुम्हाला व्यवस्थितीत झोपण्यास समस्या उद्भवणे. जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा व्यक्ती हा गोंधळलेला वाटतो. थकवा, आळस यामुळे तो अधिक चिडचिड होते. त्याचसोबत अशी समस्या त्या लोकांमध्ये दिसते जी खुप कॅफेन, चहा-कॉफी, दारुचे सेवन करतात. स्मोकिंगची सवय असते पण त्याचसोबत व्यायाम ही करत नाही आणि संतुलित आहार ही घेत नाही त्यांच्यामध्ये सुद्धा ही समस्या दिसते. या व्यतिरिक्त ज्यांची झोपण्याची वेळ ठरलेली नसते ते सुद्धा सकाळी उठल्यानंतर चिडचिड करतात.

झोप पूर्ण न झाल्यास होणाऱ्या समस्या
-सकाळी झोप येणे
-डोके दुखी
-चक्कर येणे
-झोप पूर्ण झाल्याचा परिणाम कामावरच नव्हे तर परिवाराही पडतो
-एंग्जायटी आणि डिप्रेशनची समस्या
-तुमची झोप पूर्ण होत नसेल तर त्याचा थेट परिणाम संपूर्ण शरिरावर होतो
-शरिरातील मेटाबॉलिज्मवर परिणाम होते, त्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉलचा स्तर बिघडणे अशा समस्या उद्भवतात (Wake up in bad mood)

हेही वाचा- तुमचे कुकिंग ऑइल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे?

या समस्येपासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही लाइफस्टाइलमध्ये बदल करणे. योग्य वेळी झोपल्यास तुमची ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुम्ही झोपेची वेळ ठरवा. असे दररोज केल्याने तुमच्या शरिराला याच सवय होईल आणि एक रुटटीन सेट होईल. या व्यतिरिक्त संतुलित आहार घेणे, सकाळी उठून मेडिटेशन करणे आणि दारु-स्मोकिंग करण्यापासून ही तु्म्ही दूर राहिले पाहिजे. या सर्व गोष्टी केल्यानंतरही तुमची यामधून सुटका होत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.