इतिहासात मुगल सल्तनतचे काही किस्से आपण ऐकलेच असतील. त्याच किस्स्यांपेकी एक असलेला म्हणजे जेव्हा हुमायूंचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अकबरचे वय केवळ ४ वर्ष होते. ही ती वेळ होती जेव्हा हेमूने संधी पाहिली आणि दिल्लीवर अधिराज्य केले. मुगल सैनिक चिंतेत होते. अकबरला पळ काढण्याचा सल्ला दिला गेला होता. पण जलालुद्दीन अकबरने यासाठी नकार दिला. संरक्षम बैरम खा यांच्या सोबत मिळून युद्धाची तयारी केली आणि पानीपतचे युद्ध लढले. खरंतर हेमूच युद्ध जिंकला असता जर त्याच्या डोळ्याला एका बाजूने आलेला तीर लागला नसता. (Mughal King Akbar)
हेमू जेव्हा जखमी झाला तेव्हा बैरम खा ने अकबरला म्हटले की, हेमूला ठार कर आणि गाजीची पदवी धारण कर. पण अकबराने यासाठी नकार दिला. हाच अकबर पुढे जाऊन असा मुघल बादशाह झाला जो प्रत्येकवेळी हत्येसाठी नवा मार्ग वापरायचा. अकबरने एखाद्याला किल्ल्याच्या कडेवरुन खाली ढकलले होते तर एखाद्याला पाण्यात बुडवून ठार केले.
वाढत गेला अकबरचा प्रभाव
हेमूच्या पराभवानंतर अकबरचा प्रभाव वाढत गेला. हे तर निश्चित झाले होते की, हिंदू साम्राज्याची स्थापना आता दूरवरचीच गोष्ट झाली होती. अशातच राजपूत शासक सुद्धा अकबरची मैत्री स्विकार करत होते. आता पर्यंत अकबर बैरम खा यांच्या प्रभावाखाली होता. पण जसे आपल्या मुख्य धाय माहम अनगा यांच्या प्रभावाखाली आला त्याचप्रमाणे बैरम खा पासून तो दूर झाला. मक्काच्या यात्रेवर जाताना बैरम खा याची हत्या केली गेलीय आता अकबर पूर्णपणे माहम अनगा आणि हरमच्या स्रियांच्या प्रभावाखाली होता.
जेव्हा किल्ल्याच्या तटबंदीवरून फेकले जाते
माहम अनगाच्या मुलाचे नाव अधम खान होते, महामच्या सांगण्यावरून त्याची माळवा मोहिमेसाठी निवड झाली. अधमने माळवा काबीज केला, पण इतके अत्याचार केले की अकबराला स्वतः तेथे जावे लागले. महामच्या हस्तक्षेपामुळे अधम वाचला, पण त्याला आग्रा येथे बोलावण्यात आले. येथे अकबराने अतागा खानला वकील बनवले. त्यामुळे महाम अनगा, अधम खानचा प्रभाव संपुष्टात येऊ लागला. अधमने कट करून अतागा खानला मारले. याचा अकबराला इतका राग आला की त्याने अधम खानला किल्ल्याच्या तटबंदीवरून हाकलून देण्याचे आदेश दिले. जर तो मेला नाही तर त्याला मरेपर्यंत फेकून देण्याची आज्ञा होती.(Mughal King Akbar)
काकाचा बुडवून ठार केले
अकबराच्या मामाचे नाव ख्वाजा मोअज्जम होते. अकबराने त्याला जहागीर दिली, पण त्याला आपल्या पत्नीला मारायचे होते. अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याला त्या महिलेचा जीव वाचवायचा होता, पण तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही. अकबराला इतका राग आला की त्याने ख्वाजा मोअज्जमला बेदम मारहाण करून बोटीवर नेऊन मरेपर्यंत पाण्यात बुडवत रहा असा आदेश दिला होता.
हे देखील वाचा- जो जिंकला तो विक्रमादित्य
अनारकलीला जिवंत भिंतीत गाढले
अनारकली मुघल सल्तनतची एक नर्तिका होती, जी अकबरची अत्यंत खास असल्याचे म्हटले जायचे. दरम्यान अनारकली बद्दल इतिहासकारांचे विविध तर्क आहेत. परंतु बहुतांशजण यासोबत सहमत आहेत की, अकबर आणि सलीम मध्ये फूट पडण्यामागील कारण अनारकलीच होती. असे सांगितले जाते की, सलीम आणि अनारकली या दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी अकबरने अनारकलीला जिवंत भिंतीत गाढले होते.