Home » जेनेरिक औषधांची अमेरिकेत क्रेझ

जेनेरिक औषधांची अमेरिकेत क्रेझ

by Team Gajawaja
0 comment
America Craze
Share

मेड इन इंडिया जेनेरिक औषधांची आता मोठ्या प्रमाणात विक्री अमेरिकेत होत आहे. गेल्या काही वर्षात भारतात तयार केलेल्या या जेनेरिक औषधांची मागणी अमेरिकेत वाढली आहे. कोरोना आल्यापासून भारतीय औषधांना जास्त मागणी आहे. आयुर्वेदीक औषधांना परदेशात मागणी होतीच आता त्यात जेनेरिक औषधांचीही भर पडली आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेकडून भारताला सर्वाधिक जेनेरिक औषधांची मागणी आली. यामुळे 25.66 लाख कोटींची बचत झाल्याची माहिती अमेरिकेकडून मिळत आहे. भारतीय औषध कंपनीला भारताला प्रथमच निर्यांत मंजूर करण्यात आली आहे.  

अमेरिकन मार्केटमध्ये भारतीय फार्मा कंपन्यांचे वर्चस्व वाढत आहे. अमेरिकेतील औषध निर्माण करणा-या कंपन्यांपेक्षा आता भारतातील औषधांना अधिक पसंती दिली जात आहे. अमेरिकेत भारतीय जेनेरिक औषध कंपन्यांची गुंतवणूक आता 82,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अलीकडेच, अमेरिकेच्या औषध नियामक अन्न आणि औषध प्रशासनाने ही माहिती दिली. अमेरिकेने प्रथमच ग्रॅन्युल्स कंपनीला मेड इन इंडिया टॅगसह औषध निर्यात करण्यास मान्यता दिली आहे.

ग्रॅन्युल्स कंपनीने व्हर्जिनियामध्ये नवीन पॅकेजिंग सुविधाही तयार केल्या आहेत. अमेरिकेच्या औषध निर्माण आणि संशोधन खात्यातर्फे सांगण्यात आले आहे की,  जेनेरिक औषधांच्या वापरामुळे आरोग्य सेवा प्रणालीने 2019 मध्ये सुमारे 25.66 लाख कोटी रुपयांची बचत केली.  आणि दरवर्षी ही बचत वाढत आहे. जेनेरिक औषधांची मागणी वाढली आहे, कारण त्यांची सर्वांना परवडेल अशी किंमत. अमेरिका आणि युरोपमधील कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त किंमतीत औषधे तयार करणाऱ्या म्हणून भारतीय फार्मा कंपन्यांची ओळख आहे. यासोबतच भारतीय कंपन्यांच्या औषधांचा दर्जा हा अतिशय चांगला आहे. ब्रँडेड औषधे परवडत नसलेले अमेरिकन, भारतीय कंपन्यांच्या जेनेरिक औषधांना प्राधान्य देतात. अमेरिकेत आरोग्यसेवांचा खर्च खूप जास्त आहे. त्यातून कोरोनानंतर औषधांची मागणी वाढली आहे. अशात जेनेरिक औषधे ही फायदेशीर पडत आहेत.  त्यामुळे अनेक अमेरिकन नागरिक जेनेरिक औषधांना पसंदी देत आहेत. त्यांचा वापर केल्याने आजार दूर होतोच, शिवाय शरीरावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे या औषधांना मागणी वाढली आहे.  

भारतीय कंपन्याही अमेरिकेत संशोधन क्षेत्रात काम करत आहेत. सन फार्माचे न्यू जर्सी येथील मोठे उत्पादन युनिट औषध संशोधनात मोठी कामगिरी करत आहे. लुईझियाना येथील डॉ रेड्डीज लॅबमधील पेनिसिलीन युनिट मध्यबही औषधांवर संशोधन केले जात आहे. हे सर्व होत असताना जेनेरिक औषधे म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. मुळात जेनेरिक औषधे ही खूप स्वस्त असतात. त्यामुळे या औषधांमध्ये आवश्यक गुणधर्म नाहीत असा गैरसमज वाढला होता. पण या जेनेरिक औषधांमध्ये तितकेच गुणधर्म असतात. मात्र त्यांची किंमत आणि इतर गुणधर्मांबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.  

==========

हे देखील वाचा : ईराणी राष्ट्रापतींची इज्राइलला धमकी, अवीवला नष्ट करण्याचा दिला इशारा

==========

जेनेरिक औषधे ही अशी असतात ज्यांचे स्वतःचे ब्रँड नाव नसते. बाजारात त्यांना फक्त जेनेरिक औषध अशीच ओळख आहे. जेनेरिक औषधांच्या कमी किंमतीमुळे त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आणि हा गैरसमज दूर झाल्यावरच या औषधांना अधिक मागणी येईल असे तज्ञ सांगतात. मूळ औषधांप्रमाणेच गुणधर्म असलेली ही औषधे डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात घेतल्यास इतर ब्रँड औषधांप्रमाणेच प्रभावी ठरतात आणि रुग्णाला फायदा होतो. ब्रँडिंग, पॅकेजिंग, चव आणि रंग हे जेनेरिक आणि ब्रँड औषधांमधील मुख्य फरक आहेत. त्यांच्या विपणन धोरणांमध्ये देखील फरक आहे. जेव्हा एखादे नवीन औषध बाजारात येते, त्यामागे संशोधन, विकास, विपणन, जाहिरात आणि ब्रँडिंगवर खूप पैसा खर्च केला जातो. परंतु जेनेरिक औषधे तयार करताना त्यात संशोधन असते, मात्र ब्रॅंडीग आणि जाहीरातीवरील खर्चात कपात करण्यात येते. शिवाय, मूळ उत्पादकांनी मानवांवर आणि प्राण्यांवरील सर्व क्लिनिकल चाचण्या आधीच पूर्ण केल्यामुळे, जेनेरिक फार्मास्युटिकल्सच्या उत्पादनाच्या खर्चामध्ये मानव आणि प्राण्यांवर वारंवार होणाऱ्या क्लिनिकल चाचण्यांचा खर्च समाविष्ट होत नाही.  परिणामी त्यांच्या किंमती या ब-याच कमी असतात. जेनेरिक औषधे मोठ्या प्रमाणावर विपणन, जाहिरात आणि विक्री धोरणाशिवाय सोप्या पद्धतींनी विकली जातात. या सर्वांचा त्याच्या किंमतीवर परिणाम होतो. आता भारतातही मोठ्या प्रमाणात ही जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत.  मात्र भारतात तयार होणा-या या औषधांवर परदेशात अधिक भरवसा ठेवला जात आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. अमेरिकेपाठोपाठ युरोपमध्येही जेनेरिक औषधांचा खप वाढला आहे. यामुळे भारतातील जेनेरिक औषधांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.