सोशल मीडियात सध्या फूड ब्लॉगर फूड संदर्भातील विविध फोटो-व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच काहींनी तर आयस्क्रिम डोसा, गुलाबी चहा, गुलाबजाम सँन्डविच असे विविध पदार्थ शेअर केले होते. असे फूडचे कॉम्बिनेशन पाहून कोणाला हे खावेसे वाटणार नाही. पण आयस्क्रीम खाण्याचे शौकीन असलेल्यांना त्याचे विविध प्रकार खाणे फार पसंद करतात. अशातच सोन्याचे वर्ख लावलेली कुल्फी ही विक्री केली जात आहे. सराफा बाजारात कुल्फी, फालुदा विक्री करणारे गोल्डमॅनच्या नावाने प्रसिद्ध आहेत. बंटी यादव असे त्यांचे नाव असून ते सोन्याचे दागिने घालून कुल्फीची विक्री करतात. या दागिन्यांची किंमत ही कोटींच्या घरात आहे. ऐवढेच नव्हे तर या दुकानात गोल्डन कुल्फी सुद्धा खायला दिली जाते. खरंतर सराफा बाजारात नाइट चौपाटीवर बंटी यादव रात्रीच्या वेळेस दुकान लावतात आणि रात्री उशिरा पर्यंत सोन्याची कुल्फी आणि फालुद्याची विक्री करतात. (Gold work kulfi)
गोल्ड कुल्फी बद्दल बंटी असे सांगतात की, मला ऐवढे सोनं घातल्यानंतर काही लोकांनी असे विचारले तुम्ही सोन्याची कुल्फी का बनवत का नाहीत? कुल्फी बनवण्यासाठी त्यांनी आयुर्वेदिक, एलोपॅथिक अशा डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेतला आहे.
सोन्याचे वर्ख असलेल्या कुल्फीची किंमत
बंटी यादव यांनी शुद्ध २४ कॅरेट गोल्डचे वर्ख तयार केले. जे कुल्फीवर लावून ग्राहकांना ती दिली जाते. यामध्ये विविध फ्लेवर्स ही येतात. त्याला ही सोन्याचा वर्ख लावला जातो. या कुल्फीची किंमत ३५१ रुपये आहे.
त्यांच्या दुकानात ५० रुपये ते ११० रुपये पर्यंत मिळते. ते असे सांगतात की, सुरुवातीला केवळ केसर पिस्ता कुल्फी असायची. बिझनेस जसा वाढत गेला तसे पान, मलाई, जांभूळ, काजू, केवडा, काजू, गुलकंद, चॉकलेट, शुगर फ्री असे कुल्फीच सुद्धा बनवतात. तर स्पेशल पान कुल्फी तर पानापासून तयार केली जाते. (Gold work kulfi)
हे देखील वाचा- उन्हाळ्यात पोट फुगलेले दिसते आणि भुक ही लागत नाही? ‘या’ गोष्टींचे करा सेवन
६० वर्ष पूर्ण होणार आहेत दुकानाला
बंटी यादव यांनी असे म्हटले की, त्यांचे आजोबा किशोर लाल यादव यांनी १९६५ मध्ये या दुकानाची सुरुवात केली होती. त्यानंतर वडील रमेशचंद्र यांनी हे दुकान सांभाळले. २००० वर्षांपासून ते हे दुकान सांभाळत आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, सोने घालण्याची आवड केवळ मलाच आहे. पण वडील आणि आजोबांना केवळ कुल्फीच विक्री करणे आवडायचे.