Home » गुंतवणूकीशिवाय करता येईल ‘हा’ व्यवसाय, होईल उत्तम नफा

गुंतवणूकीशिवाय करता येईल ‘हा’ व्यवसाय, होईल उत्तम नफा

by Team Gajawaja
0 comment
Business Idea
Share

तुम्ही व्यवसाय करायचा विचार करत असाल तर आधार कार्डच्या व्यवसाय करु शकता. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे सध्या आधार कार्ड हे एका महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनले आहे. नवजात मुलं असो किंवा वृद्ध त्यांचे सुद्धा आधार कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु आधार कार्डमध्ये काही चुक झाल्यास तर आपल्याला ती UIDAI च्या शाखेत जाऊन सुधारता येते. अशातच आधार कार्डची शाखा घेऊन व्यवसाय करणे हा उत्तम ऑप्शन आहे. भारतात या व्यवसायात खुप नफा मिळू शकतो. (Business Idea)

सर्वात प्रथम काय कराल?
जर तुम्हाला आधार कार्डची शाखा सुरु करत व्यवसाय करायचा असेल तर प्रथम तुम्हाला UIDAI द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. त्यानंतरच सर्विस सेंटर सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाते. जेव्हा तुम्ही ती परिक्षा उत्तीर्ण होता तेव्हा तुम्हाला आधार एनरॉलमेंट क्रमांक आणि बायोमेट्रिक वेरिफिकेशन करावे लागते. त्यानंतर कॉमन सर्विस सेंटर मधून रजिस्ट्रेशन करावे लागते.

कशा प्रकारे अर्ज कराल?
-सर्वात प्रथम https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action येथे भेट द्यावी लागेल
-Create new user चे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यास एक नवी फाइल सुरु होईल
-आता तुम्हाला Share code enter करण्यास सांगितले जाईल
-Share code साठी तुम्हाला https://resident.uidai.gov.in/offline-kyc येथे जाऊन ऑफलाइन ई-आधार डाउनलोड करावे लागेल
-डाउनलोड केल्यानंतर XML File आणि Share Code दोन्ही डाउनलोड होतील (Business Idea)

ID पासवर्डच्या माध्यमातून करा लॉगिन
आता या आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून Aadhar Testing & Certification च्या पोर्टलवर सहज लॉगइन करु शकता. त्यानंतर तुमच्या समोर Continue चा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करा. पुढील स्टेपसाठी तुमच्या समोर एक फॉर्म दाखवला जाईल. त्यामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती द्या. आता तुमचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करा. फॉर्म पूर्ण भरुन झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून पहा की, तुम्ही सर्व माहिती योग्य भरली आहे की नाही. त्यानंतर Proceed to submit form वर क्किल करा.

दरम्यान, १० वर्ष जुन असलेले आधार कार्ड सरकारने अपडेट करण्याची सुचना दिली आहे. जेणेकरुन याच्या माध्यमातून केले जाणारे घोटाळे आणि फसवणूकीच्या प्रकरणांवर आळा घातला जाईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने असे म्हटले आहे की, लोकांनी आधार कार्डमध्ये डेमोग्राफिक डिटेल जसे की, नाव, पत्ता आणि आपला मोबाईल क्रमांक अपडेट करावा लागणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.