भगवान शंकराची पूजा आणि विशेष कृपा आयुष्यभर रहावी म्हणून श्रावण महिना, प्रदोष व्रत, सोमवार, मासिक शिवरात्री आणि महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उत्सवाला फार महत्व दिले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या वेळी देशभरात सर्व ज्योतिर्लिंग आणि शिवालयात भक्तांची फार मोठी गर्दी होते. तेथे विधिगत पूजा केली जाते. परंतु महाशिवरात्री का साजरी केली जाते याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.
महाशिवरात्रीचा अर्थ
महाशिवरात्री मधील रात्रीचा अर्थ आहे रात्र किंवा विश्राम करण्याची वेळ. महाशिवरात्री हा असा दिवस आहे जेथे आपण साधनेच्या माध्यमातून आपण दिव्य चेतनेच्या शरणात जातो. दिव्य चेतनेच्या शरणात जाण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे ध्यान आणि समर्पण. समर्पण म्हणजे असा विश्वास ठेवणे की, एक शक्ति आहे जी प्रत्येक वेळी आपली काळजी घेत आहे आणि सुरक्षा करत आहे. साधना आणि समर्पणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये शांती निर्माण होते. यामुळेच महाशिवरात्रीचा सार अनुभव करण्यास ही मदत होते.
महाशिवरात्री का साजरी केली जाते?
असे मानले जाते की, या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. शास्रानुसार, महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकर कोटी सुर्यांच्या समान प्रभाव असणाऱ्या ज्योतिर्लिंगाच्या रुपात प्रकट झाले होते. त्यानंतर पासूनच प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. (Mahashivratri)
असे ही म्हटले जाते की, देवी पार्वती सतीचा पुर्नजन्म आहे. देवी पार्वतीला भगवान शंकराला पतीच्या रुपात प्राप्त करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी शंकराला आपले करण्यासाठी काही प्रयत्न ही केले होते. पण शंकर प्रसन्न झाले नाहीत. त्यानंतर देवी पार्वतीने त्रियुगी नारायण पासून ५ किमी दूर गौरीकुंडत घोर तपस्या केली होती आणि शंकराला मोहात पाडले.याच दिवशी शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला होता.
महाशिवरात्रीचे महत्व
महाशिवरात्री आध्यात्मिक लोकांसाठी फार महत्वाची असते. तर पारिवारिक परिस्थितीत मग्न असलेली लोक ही महाशिवरात्री शंकराच्या विवाहाच्या उत्साप्रमाणे साजरे करतात. तर सांसारिक महत्वकांक्षांमध्ये मग्न असलेली लोक महाशिवरात्रीला शंकराच्या द्वारे आपल्या शत्रुवरील विजयाच्या दिवसाच्या रुपात साजरे करतात.
हे देखील वाचा- शिवलिंगाभोवती अर्धवतुर्ळाकार फेरी का मारली जाते?
परंतु आध्यात्मिक लोकांसाठी महाशिवरात्री खास असते. कारण हा तोच दिवस आहे ज्या दिवशी ते कैलास पर्वतासह एकात्म झाले होते. ते एका पर्वतासारखे स्थिर आणि निश्चल झाले होते. योगिक परंपरेत, शंकराला अन्य देवतांप्रमाणे पूजले जात नाही. त्यांना आदि गुरु मानले जाते. पहिले गुरु ज्यांनी ज्ञान संपन्न केले. अनेक सहस्र वर्षांच्या ध्यानानंतर, एके दिवशी ते पूर्णपणे शांत झाले. तोच दिवस महाशिवरात्रीचा होता.