आपण जेव्हा एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा त्याच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाचा पुरेपुर प्रयत्न करतो. तर सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे लग्न करण्याऐवजी कपल लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे पसंद करतात. जेणेकरुन लग्नापूर्वी त्यांना आपल्या पार्टनर बद्दलच्या काही गोष्टी अगदी जवळून कळतात. पण हा निर्णय सुद्धा आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरु शकतो. असे नव्हे की, प्रत्येक लग्न हे यशस्वी होतेच. त्यात ही काही चुका झाल्यास तर नवरा-बायको विभक्त होण्याचा निर्णय घेतात. त्यालाच आपण घटस्फोट असे म्हणू शकतो. पण लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये तुम्ही लग्न न करता तुमच्या पार्टनर सोबत राहत असता. परंतु यावेळी ही तुम्हाला काही तडतोड करतच पार्टनर सोबत रहावे लागते. त्यामुळे लग्न की लिव्ह-इन-रिलेशनशिप असा प्रश्न सध्याच्या बहुतांश कपल्सला पडतो. तर याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.(Live-in-relation vs Marriage)
लग्न म्हणजे समाजाने स्विकारलेले रुप
भारतात अद्याप ही काही ठिकाणी लग्नापू्र्वी कपल्सला एकत्रित राहण्यास परवानगी दिली जात नाही. त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. तर लग्न झाले असेल तर त्या कपलला सामाजिकच नव्हे तर कायदेशीर स्विकारले जाते. आपल्या समाजात लग्न एक असे बंधन आहे जे कधीच मोडले जाऊ नये असे म्हटले जाते. त्यामुळे आपण पाहतो की, एकाच छताखाली खुप जण राहतात पण ते वेगवेगळे आयुष्य जगत असतात.
परिस्थिती असो किंवा अन्य काही कारणं असो आपल्या पार्टनरपासून दूर कसे जायचे असा प्रश्न पडतो. यावेळी समाज काय बोलेल याचा विचार अधिक केला जातो. मात्र आता जग बदलत चालल्याने बहुतांश कपल्स लिव्ह-इन-रिलेशनशिपचा आधी विचार करतात.
-कायदेशीर कपल व्हा
जुन्या पीढी नुसार लग्नापूर्वी तुम्ही अशा काही गोष्टी करता ज्या लग्नानंतर केल्या जातात. त्याला काहीतरी नाव मिळावे म्हणून तुम्ही एक कायदेशीर कपल व्हा. यासाठी काही कायद्यांनुसार तुम्ही एकमेकांना स्विकारता. नव्या जनरेशन नुसार लग्न हे शारिरीक संबंध आणि मुलं जन्माला घालण्यासाठी नव्हे.
पाश्चिमात्य कल्चर मध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे सर्वसामान्य बाब आहे. ते लग्नाशिवाय ही मुलं जन्माला घालू शकतात. पण आपण भारतीय समाजात डोकावले तर असे करणे गुन्हा मानले जाते.
नात्यात अडकणे गरजेचे नसते
लग्न करणे हा आयुष्यातील सर्वाधिक मोठ्या निर्णयांपैकी एक आहे. त्यामुळे बहुतांश तरुण यापासून दूर राहतात. अशातच घरातील मंडळी पत्नीपासून घटस्फोट घेऊ नको असे ही काही गोष्टी घडल्यानंतर सांगतात. त्यांचे असे म्हणणे असते की, समाजाच्या अनुरुप तुम्हाला चालायचे आहे. त्यामुळे तु्म्ही काही चुकीचे करु शकत नाहीत.
पण लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये तुम्हाला काही गोष्टींबद्दल अधिक विचार करण्याची गरज भासत नाही. कारण तेथे कोणतीही बंधन नसतात.(Live-in-relation vs Marriage)
लिव्ह-इन- मध्ये मात्र असुरक्षिततेची भावना असते
जर दोन व्यक्तींना लग्नाऐवजी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये रहायचे असते तर त्यांच्यामध्ये प्रथम एकमेकांवर विश्वास असला पाहिजे. तो नसेल तर पार्टनरला वारंवार असुरक्षित वाटत राहतो. काही वेळेस लिव्ह-इन मध्ये भांडण झाल्यानंतर नकारात्मक विचार ही मनात येऊ लागतात. यामध्ये प्रेग्नेंसी हा फार मोठा आणि चिंतेचा विषय ठरतो.
हे देखील वाचा- सासू-सुनेमधील नाते अधिक घट्ट होण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर पहा
लग्न आणि लिव्ह-इन बद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. एखाद्याला लग्न करुन आयुष्य जगणे हे योग्य वाटू शकते. तर दुसऱ्याला लिव्ह-इन रिलेशनशिपचा विचार करतात. प्रत्येकाचा आपल्या आयुष्यात या गोष्टींबद्दल निर्णय घेण्यामागे काही हेतू सुद्धा असू शकतो. त्यामुळे त्या व्यक्तीने घेतलेल्या निर्णयावर टीका करणे आपले काम नव्हे.